डॉ बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 2023 जयंती भाषण मराठी |Dr Babasaheb Ambedkar 14th April 2023 Birth Anniversary Speech Marathi
नमस्कार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महती सांगताना
त्यांच्याबाबत नेहमी म्हटल्या जाते की, बाबासाहेब म्हणजे महत्त्वाकांक्षी,
लक्ष्यवेधी, जिद्दी, निश्चयी, धोरणी, धाडशी, कष्टाळू, अभ्यासू, विचारी,
स्वाभिमानी, कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, अत्युच्च पदव्यांचा एकनिष्ठ साधक, बहुज्ञानी,
जनहितासाठी ज्ञानाचा सदुपयोगकर्ता, लोकहितदक्ष महानायक, जागरूक जननेता,
सत्याग्रही, झुंजार जनांदोलनकारी, न्यायाचा कडवा रक्षक, अन्यायाचा निर्भय शत्रू,
मानवतेचा मित्र, द्रष्टा समाजसुधारक, उपेक्षितांचा उद्धारक, दलितांचा भाग्यविधाता,
स्त्रियांचा कैवारी किती महती सांगितली तरी ती कमी पडेल असे आमचे बाबासाहेब आंबेडकर होते.आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2023 साठी एकमद सहज सोप्या भाषेत सर्वांना समजले असे भाषण कसे असावे ते पाहणार आहे.
डॉ - बाबासाहेब आंबेडकर भाषण(toc)
भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर भाषण – मुद्दे
•जीवन परिचय
• बालपण व प्राथमिक शिक्षण
• आंबेडकर नावाचा इतिहास
•पदवी शिक्षण
•डॉ . बाबासाहेब
आंबेडकर यांचे गुरू कोण ?
• सामाजिक कार्य
• अनमोल विचार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महती सांगताना
त्यांच्याबाबत नेहमी म्हटल्या जाते की, बाबासाहेब म्हणजे महत्त्वाकांक्षी,
लक्ष्यवेधी, जिद्दी, निश्चयी, धोरणी, धाडशी, कष्टाळू, अभ्यासू, विचारी,
स्वाभिमानी, कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, अत्युच्च पदव्यांचा एकनिष्ठ साधक, बहुज्ञानी,
जनहितासाठी ज्ञानाचा सदुपयोगकर्ता, लोकहितदक्ष महानायक, जागरूक जननेता,
सत्याग्रही, झुंजार जनांदोलनकारी, न्यायाचा कडवा रक्षक, अन्यायाचा निर्भय शत्रू,
मानवतेचा मित्र, द्रष्टा समाजसुधारक, उपेक्षितांचा उद्धारक, दलितांचा भाग्यविधाता,
स्त्रियांचा कैवारी किती महती सांगितली तरी ती कमी पडेल असे आमचे बाबासाहेब आंबेडकर होते.
व्यासपीठावर
उपस्थित मान्यवर आणि समस्त समुदायाला जय भीम.विश्वरत्न , विश्व भूषण , भारतरत्न ,
महाविद्वान,बोधिसत्व ,महानायक, अर्थशास्त्री,महान इतिहासकार ,भारतीय संविधानाचे
शिल्पकार ,क्रांतिसूर्य , युगपुरूष
परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी
प्रणाम. तसेच जगाला शांततेचा संदेश देणारे
तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो.
नमन आपल्या“बाबासाहेबांना.”.!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर – जीवन परिचय
•ज्ञानसूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४
एप्रिल १८९१ साली मध्यप्रदेश मधील महू या ठिकाणी झाला.
•सध्या ती जन्म भूमी
भिम जन्म भूमी म्हणून ओळखल जाते.
•डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाबाई सकपाळ
•वडिलांचे नाव - रामजी सकपाळ
•आजोबा यांचे नाव - मालोजीराव सकपाळ .
पत्नीचे नाव – रमाबाई (माता रमाई)
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण -
आंबेडकरांचे
कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील
रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबावडे या गावचे होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत
नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव
रामजी, तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजीराव सकपाळ इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई
म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ
शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या
घरातील व्यवहारांत शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते.
मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई
या मुलीचा जन्म झाला होता. 1848 च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे
अपत्य होते. मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी
सैन्यात नोकरीस लागला. रामजी सकपाळ हे मालोजीरावांचे तिसरे अपत्य. रामजी सकपाळ
हे फार उद्योगी व महत्त्वाकांक्षी गृहस्थ होते. प्रथम सैन्यातील महार पथकात साधे
सैनिक होते. कालांतराने ते लष्करी छावणीतील शाळेत मुख्याध्यापक झाले आणि
सुभेदार-मेजर या पदापर्यंत चढले.
आंबेडकर नावाचा
इतिहास
त्यांचे आडनाव 'आंबेडकर' नव्हते. तर त्यांचे खरे नाव होते 'आंबावडेकर'. आंबावडेकर या नावाचे खेड
तालुक्यातील दापोलीजवळ पाच मैलांवर एक लहानसे खेडे आहे. त्यामुळे आम्हाला
'आंबावडेकर' याच नावाने लोक ओळखीत असत. या आंबावडेकर आडनावाचे ‘आंबेडकर' हे नाव
कसे झाले त्याला इतिहास आहे. 'आंबेडकर'
नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते. ते त्यांना फारसे काही शिकवीत नसत, पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या खूप प्रेम होते. मधल्या सुट्टीत त्यांना भाकरी
खाण्यासाठी शाळेपासून दूर असलेल्या त्यांच्या घरी जावे लागते. हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हते. पण
तेवढाच वेळ बाहेर भटकायला मोकळीक मिळे म्हणून भाकरीसाठी मधल्या सुट्टीत घरी
जाण्याची फार मजा वाटायची. पण आमच्या या मास्तरांनी एक युक्ती योजली. ते
आपल्याबरोबर भाजी-भाकरी बांधून आणीत असत व रोज मधल्या सुट्टीत कधीही न चुकता मला
बोलावून घेऊन आपल्या फराळापैकी भाजी-भाकरी त्यांना खायला देत. अर्थातच शिवाशिवी होऊ नये म्हणून ते आपली
भाजीभाकरी वरूनच त्यांच्या हातावर टाकीत. त्यांच्या सांगायला अभिमान वाटतो की, त्या
प्रेमाच्या
भाजीभाकरीची काही अवीट गोडी असे. त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून
येतो. खरोखर आंबेडकर मास्तरांचे त्यांच्या फार प्रेम होते. एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की,
आंबावडेकर नाव आडनीड आहे. त्यापेक्षा 'आंबेडकर हे माझे नाव छान आहे. तेच तू यापुढे
लाव. आणि त्याप्रमाणे त्यांनी कॅटलॉगमध्ये तशी नोंदही करून टाकली.
शिक्षण -
•1896 नोव्हेंबर - बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण
साताऱ्यास झाले. रामजींनी सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे
नाव दाखल केले.
•2) 1898 - साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण
पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातील इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल
केले.
•3) 7 नोव्हेंबर 1900 - बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ
असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल
(आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये आंबडवेकर असे आडनाव नोंदवले. या शाळेत कृष्णा
केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते.
15 नोव्हेंबर 1904 भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा
उत्तीर्ण केली. त्यांचे माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन
हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले.
•एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य
विद्यार्थी होते. आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज 18 तास अभ्यास करत
असत.
•1907 - भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची
परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव
आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या
अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले.
•3 जानेवारी 1908 भीमरावांनी एल्फिन्स्टन - महाविद्यालयात
प्रवेश घेतला. महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा 75 पेक्षा
जास्त गुण मिळत असे.
•1912 - त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि
अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली
1913 जानेवारी - राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य
विषय आणि पर्शियन व इंग्रजी हे तिर विषय घेऊन भीमराव, एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी.
ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी. ए. ची पदवी संपादन करणारे
अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.
उच्च शिक्षण -
•4 एप्रिल 1913 - बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी
परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, त्यात आंबेडकर एक होते.
•प्रत्येकास दरमहा 11.50 पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली.
त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार
म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी 18 एप्रिल 1913 रोजी सह्या
केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत एकूण
तीन वर्षांची होती.
•15 मे 1915 एम. ए. च्या पदवीसाठी - भीमरावांनी एन्शंट
इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया
विद्यापीठाला सादर केला...
•2 जून 1915 या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने
एम. ए. ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया
कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.
•9 मे 1916 - आंबेडकरांनी, कोलंबिया विद्यापीठामध्ये
समाजशास्त्राचे प्राध्यापक ए. ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित
झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात, "कास्ट्स इन इंडिया : देअर
मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि
वृद्धी)" नावाचा शोधलेख वाचला. शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे, 1917
इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हा शोधलेख पुस्तकाच्या
रुपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू कोण ?
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचे आयुष्य तीन
गुरु आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे. त्यांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरू 'बुद्ध' होत. दुसरे गुरु 'कबीर'
आणि तिसरे गुरु म्हणजे 'ज्योतिबा फुले' होत.... त्यांची तीन उपास्य दैवतेही आहेत. पहिले दैवत 'विद्या', दुसरे
दैवत 'स्वाभिमान', आणि तिसरे दैवत म्हणजे 'शील' होय.
मी या स्थितीत आलो याचे कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये. प्रयत्नाने व कष्टाने मी वर चढलो.
पहिला गुरू बुद्ध
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन फक्कड गुरू केले. माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली. माझ्या उन्नतीला जे कारणीभूत झाले. त्यापैकी माझा पहिला सर्वश्रेष्ठ गुरू गौतम बुद्ध. दादा केळूसकर नावाचे माझ्या वडिलांचे विद्याव्यासंगी स्नेही होते. त्यांनी बुद्धाचे चरित्र
लिहिले होते. मला एका प्रसंगी त्यांनी ते बक्षीस दिले. ते पुस्तक वाचल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला. उच्च-नीचतेला त्या धर्मात स्थान नाही. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी या ग्रंथांवरचा माझा विश्वास उडाला. मी बौद्धधर्माचा उपासक बनलो. जगामध्ये बौद्धधर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगावयाचे असेल तर त्या धर्माचा भारताने। स्वीकार करावा असे मला आजही वाटते.
दुसरा गुरू कबीर
माझा दुसरा गुरू कबीर साहेब. त्यांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता. गांधींना मी नुसते गांधी न म्हणता 'महात्मा गांधी' म्हणावे अशी मला आग्रहाची पत्रे आली व येतात, पण त्या बाबतीत कोणाचे म्हणणे मी जुमानले नाही. मी त्यांच्यापुढे कबीराचीच उक्ती ठेवून मानस होना कठीण है। तो साधू कैसा होत।।
तिसरा गुरू म. फुले
माझे तिसरे गुरू म.जोतिबा फुले. त्यांचे मला मार्गदर्शन झाले. या तीन गुरूंच्या शिकवणीने माझे जीवन बनले आहे.
तीन उपास्य दैवते
तीन गुरूप्रमाणे माझी तीन उपास्य दैवतेही आहेत. माझे पहिले उपास्य दैवत विद्या. विद्येशिवाय काही होऊ शकत नाही. या देशात प्रचंड बहुसंख्येने समाज विद्याहीन आहे. ब्राह्मण बुद्धाला शूद्र मानीत. पण बौद्धधर्मात जातपात नाही आणि विद्या शिकण्यास कोणालाही मनाई नाही. अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरुरी आहे. ब्राह्मणांनी इतरांना विद्या शिकण्यास मनाई केली. शिकणाऱ्यांच्या जिभा कापल्या. याचा परिणाम म्हणून आजही या देशात ९० टक्के लोक अशिक्षित आहेत. ब्रह्मदेशात बौद्धधर्म आहे. तेथे ९० टक्के लोक सुशिक्षित आहेत. हिंदुधर्म व बौद्धधर्मातील हे अंतर आहे.
खरा प्रेमी ज्या उत्कंठतेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो तशा उत्कटतेने माझे पुस्तकावर प्रेम आहे. शत्रूलाही कबूल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे. तुम्ही माझ्या दिल्लीच्या निवासस्थानी आलात तर तेथे तुम्हाला माझा वीस हजार निवडक पुस्तकांचा संग्रह दिसेल. मी विनयपूर्वक विचारतो, अशी संपत्ती दुसऱ्या कुणाजवळ आहे, दाखवा!
माझे दुसरे उपास्य दैवत विनयशीलता हे आहे. पण हे खरे की, मी नेहमीच विनयशील असतो असे नाही. मात्र विनय म्हणजे लीनता, लाचारी नव्हे. मी लीनता त्याच समजतो. माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे असे मला वाटते. समाजकार्याचे ध्येय मी डोळ्यांपुढे ठेवले. पण चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही. समाजकार्यासाठी मी नोकरीत अडकलो नाही. परळला १० बाय १० च्या खोलीत मी कैक वर्षे काढली. कण्याची भाकरी आणि कण्याचा भात खाल्ला. पण मी कधी कोणाकडून स्वतःसाठी थैली घेतली नाही. या देशात आलेल्या सर्व व्हाईसरॉयशी आणि गव्हर्नरांशी माझा नेहाचा संबंध होता. पण मी माझ्याकरिता त्यांच्याकडे कधी कसलीही याचना केली नाही. दुसऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेतल्या. मी कधी कोणाचे नुकसान केल्याचा अगर कोणाच्या बाबतीत अपकृत्य केल्याचा तुम्हाला एकही दाखला मिळणार नाही. मला सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होता आले असते. पण त्यात अडकून समाजकार्याच्या दृष्टीने काय होण्यासारखे आहे, असा मी विचार केला. मी माझ्या बुद्धीप्रमाणे चाललो, परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधी विचार केलेला नाही. परमेश्वराला न मानणारा मी माणूस आहे. म्हणून शीलसंवर्धन हे मी माझे तिसरे उपास्य दैवत समजतो.
डॉ . बाबासाहेबआंबेडकरयांनी जनतेस दिलेले हक्क
•रोजगार कार्यालय ची स्थापना - Employment
Exchange—
•कर्मचारी राज्य बीमा Employees
State Insurance (ESI).
•काम ची वेळ 12 तास होती ती कमी करून 8 तास केली. Working Hours 12 to 8 Hrs.
•महिलांना प्रसूति रजा - Maternity
Leaves
•ट्रेड यूनियन्स ला मान्यता Compulsory
Recognition for Trade of Union.
• महागाई भत्ता - Dearness
Allowance (DA)
•सुट्टीचे वेतन - Paid Holidays
•हैल्थ इंश्योरेंस - Health
Insurance
•आंदोलनाचा अधिकार Legal Strike
Act –
•प्रोविडेंट फंड Provident Fund
(PF) –
श्रमिक कल्याण कोष Labour Welfare Fund
•तंत्रज्ञान प्रशिक्षण योजना Technical
Training Scher –
•'सेन्ट्रल
सिंचाई आयोग- Central
Irrigation Commission
•वित्त आयोग ची स्थापना Provision of Finance Commiss-•
•मतदानाचा अधिकार- Right to Vote
•भारतीय सांख्यिकी कानून Indian
Statistical Law –
•सेन्ट्रल तकनीकी पॉवर बोर्ड Central Technical Power Board –
•भारतीय रिजर्व बैंक की स्थापना - Reserve Bank of India
•सर्वात मोठा ग्रंथ संविधान .
•डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला खूप काही दिले आहे आपल्याला ते पुढे घेऊन जायचे आहे.
शैक्षणिक जागृती
•आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या
कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या
प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत.
आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे
कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या
लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन
दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा
प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा
संदेश दिला.प्राचीन हिंदू
समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर
केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास
गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार
करुन आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली.
सामाजिक कार्य
- सत्याग्रह
•सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह 1930नाशिकमधील
काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी
केला होता. त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, महाराष्ट्रातील
स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक ते दाबण्याचा निर्धार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा
स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता.
•पर्वती मंदिर सत्याग्रह 192913 ऑक्टोबर 1929-
आंबेडकरांच्या प्रेरणेने पर्वती सत्याग्रह सुरू झाला. सत्याग्रहात शिवराम जानबा
कांबळे, एम. एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज
योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी भाग घतलाअंबादेवी मंदिर सत्याग्रह 1927
1925 अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात -
प्रवेशासाठी अस्पृश्यांनी माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली
आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनास आंबेडकर, दादासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख या
ब्राह्मणेतर आंदोलनाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.
महाड सत्याग्रह
आणि चवदार तळे
रायगड
जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्यावर अस्पृश्यांना इतरांप्रमाणे पाणी भरता यावे,
आपल्या हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला व अस्पृश्यतेचा म्हणून त्यांनी पुरस्कार
करणारी मनुस्मृती जाळली. त्यांच्या काही अनुयायांसह त्यांच्यावर सनातन्यांनी खटला
भरला. खटला जिद्दीने लढवून त्यांनी स्वतःची व आपल्या सहकाऱ्यांची निर्दोष सुटका
करून घेऊन चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा अस्पृश्यांचा हक्क प्रस्थापित
केला.कायदेमंडळाचे1) 1923 ऑगस्ट ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई सभासद असलेले
समाजसुधारक रावबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात
सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी
प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक
पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना
परवानगी असावी. असा ठराव मंजूर करुन घेतला.2) 5 ऑगस्ट 1923 - रावबहादुर बोले यांनी
मुंबई विधिमंडळात ज्या नगरपालिका आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी
करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे.
असा दुसरा ठराव मांडला.3) 1927 - डॉ. आंबेडकर मुंबई प्रांतिक विध सदस्य असताना
त्यांनी पिण्याच्या पाण्यासा दू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास
सरुवात
•देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास
सुरुवात केली. संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर
पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता.
• 19 मार्च 1927- बोले ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने
आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले होते. परंतु
सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही. अस्पृश्यांना
त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी महाड येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली
कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली. या कुलाबा
परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत
सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते उपस्थित होते.
या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या
अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.20 मार्च 1927 आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली - परिषदेतील
सर्वांनी चवदार तळ्याकडे कूच केली. बाबासाहेबांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी
आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व
आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना
महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदूंना सहन झाली नाही यांनी दलितांसाठींच्या
भोजनामध्ये माती मिसळली व ने येत दलितांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ले केले. या
आंदोलनाद्वारे आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात
अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी
केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम
जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव
विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे
इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचे महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते.
मनुस्मृतीचे
दहन
•25 डिसेंबर 1927 महाड येथे अस्पृश्यांचे अधिवेशनात
आंबेडकर यांचे उपदेशपर भाषण झाले. अस्पृश्योद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आपण
जागरुकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे.
अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेही हीत आहे. अशा आशयाचे त्यांचे
भाषण झाले. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी
मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पां. न. राजभोज यांनी
अनुमोदन दिले. त्यानंतर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. दहनभूमीवर (
सरणावर ) म्हणजे वेदीवर मनुस्मृती ठेऊन तिचे दहन करण्यात आले आणि हे काम
आंबेडकरांचे ब्राह्मण गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच-सहा सहकाऱ्यांनी पूर्ण केले. मनुस्मृतीचे जाहीरपणे
दहन केले
आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर
होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे. स्मृतिकाराने अस्पृश्यांवर
केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख केला जातो.
ग्रंथप्रेमी बाबासाहेब
बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांना आपण दलितांचा सूर्य, दलितांची अस्मिता, दलितोद्धारक म्हणून ओळखतो. तसेच कायदेपंडित, भारतीय घटनेचे शिल्पकार, मानवतेचे पुजारी, समतेचे पुरस्कर्ते, भारतरत्न म्हणूनही त्यांचा मोठा लौकिक आहे. परंतु यापेक्षाही बाबासाहेब आंबेडकर हा माणूस एक ग्रंथवेडा होता. त्यांना निरनिराळ्या ग्रंथांचे वेड होते. त्यांचे ग्रंथांवर खूप प्रेम होते. त्यांनी अनेक ग्रंथांतील ज्ञान आत्मसात केले होते. ग्रंथ हेच गुरू अशी त्यांची धारणा होती. मुंबई येथे दादर विभागात 'राजगृह' नावाचे बाबासाहेबांचे घर आहे. हे घर म्हणजे अनेकविध ग्रंथांचे भांडारच आहे जणू! ग्रंथसंपत्ती मिळविताना बाबासाहेबांना अतिशय कष्ट पडले. त्यासाठी ते प्रसंगी उपाशीदेखील राहत. ग्रंथासाठी त्यांचे मन तळमळे.
डॉ बाबासाहेब परदेशात असताना
बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असतानाची गोष्ट. त्यावेळी त्यांच्याजवळ पुस्तके घेण्यासाठी पैसे नसत. पुस्तकाशिवाय अभ्यास कसा होणार? म्हणून त्यांनी एक मार्ग अवलंबिला होता. ते दररोज ग्रंथालयात जात. तेथील पुस्तके मिळवून वाचीत अभ्यास करीत. जितका वेळ ग्रंथालय उघडे राहावयाचे तोपर्यंत ते तेथेच वाचीत बसायचे. वाचता वाचता त्यांना भूकही लागे. तेव्हा ते आपल्याजवळ पाव ठेवायचे. भूक लागली म्हणजे गुपचूप, कुणालाही न दिसेल असे, ग्रंथपालची नजर चुकवून पावाचे तुकडे खायचे. एके दिवशी गोया ग्रंथपालने बाबासाहेबांना पाव खाताना पाहिले. ग्रंथपालाला थोडे आश्चर्य वाटले. नंतर ग्रंथपालाने त्यांना जवळ बोलावले. ग्रंथपाल त्यांना म्हणाला, मिस्टर, हे ग्रंथालय आहे. ते समोरचे बोर्ड बघा. समोरच्या भिंतीवरचा सूचनावजा बोर्ड होता, येथे काही खाऊ नये, घाण करू नये, स्वच्छता राखा. बाबासाहेबांनी भिंतीवरचा तो फलक पाहिला, वाचला आणि मान खाली घातली, हा येथला नियम तुम्ही मोडला आहे. अपराध केला आहे. तुम्हाला शिक्षा करावी लागेल. समजलात? ग्रंथपालाने सांगितले. क्षमा करा. यापुढे मी सूचनेचे पालन करीन. उपाशी राहून येथे वाचत बसेन, मग तर झाले? बाबासाहेब म्हणाले. अपराध करणाऱ्याला क्षमा करता येत नाही, ग्रंथपाल, शिक्षा करा. पण एक विनंती आहे, बाबासाहेब.माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद करू नका. ग्रंथाशिवाय मी जगू शकत नाही. म्हणून या व्यतिरिक्त कोणतीही शिक्षा द्या. मी ती भोगायला तयार आहे. बाबासाहेबांनी सांगितले. ग्रंथावरील हे अजोड प्रेम पाहून गोरा ग्रंथपाल मनातून सुखावला. ग्रंथाच्या वेडाने ग्रंथपाल भारावून गेला. म्हणाला, मिस्टर आंबेडकर, तुम्ही उद्यापासून माझ्याबरोबर जेवायचे ही तुम्हाला शिक्षा आहे. मी तुमचे जेवण आणत जाईन गोया ग्रंथपालाने सुनावलेली शिक्षा ऐकून बाबासाहेबांचे डोळे पाणावले. ते पुढे सरसावले आणि त्या ग्रंथपालाचे हात आपल्या हातात घेऊन बाबासाहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली. असा हा ग्रंथवेडा बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस आपला आदर्श असावयास पाहिजे, नाही का?
बाबांचे व्यक्तिमत्व
मिरजेला जेवणखान झाल्यानंतर मला मुंबईला येण्याचा आदेश बाबासाहेबांनी दिला. मिरजेहून पुढे मला मुंबईस जावे लागेल याची मला कल्पना नव्हती. शिवाय दिवसभर मी प्रवासातच होतो. त्यामुळे अंथरूण, पांघरूण, कपडे वगैरे काहीच घेतलेले नव्हते. आमचा मुंबईचा प्रवास रेल्वेने सुरू झाला होता. वेळ रात्रीची होती. थंडीचेच ते दिवस होते. झोपण्याच्या वेळी पांघरण्यासाठी काही तरी द्या, म्हणून मी बाबासाहेबांना विनंती केली. बाबासाहेब आपल्या केबीनमध्ये गेले व त्यांनी एक रग मला आणून दिला. दिवसभराच्या प्रवासाच्या दगदगीने व आदल्या रात्रीच्या जागरणामुळे मी अतिशय थकलो होतो. बाबासाहेबांनी दिलेला राग घेऊन सलूनमधील एका बाकावर मी झोपलो. मला चांगलीच झोप लागली होती. सकाळी ५ वाजता मला जाग आली. गाडी सुरूच होती. मनाला वाटणारा क्षीण पार नाहीसा झाला होता. बाबासाहेब उठलेले आहेत की झोपलेले आहेत हे सहज पाहण्यासाठी म्हणून मी उठून त्यांच्या केबीनच्या दाराशी गेलो व सहज डोकावून पाहिले. मी आत पाहत असता माझ्या अंतःकरणाला धक्का बसेल अशा प्रकारचे दृश्य दिसले.
बाबासाहेबांनी एका बाकावर टॉवेल अंथरला होता. उशाला एक उशी होती. अंगातील शर्टासह फक्त तेवढ्यावरच ते झोपलेले दिसले. स्वतःसाठी पांघरावयास आणलेला रंग त्यांनी मला दिला होती. दिवसभर त्रास झालेला असतानाही आणि अंगात थोडा ताप असतानाही तशा त्या कुडकुडत्या थंडीत बाबासाहेब उघड्यावरच झोपले हे पाहून मला फार दुःख झाले. मनाला फार वेदना झाल्या. अजाणपणे मी या महापुरुषाला त्रास दिला. स्वतः त्रास घेऊन दुसऱ्यांना त्यांनी सुख दिले. स्वतः थंडी सहन केली व मला उबारा दिला. मला दुःख होत होते. काय करावे ते समजत नव्हते. १०-१५ मिनिटे मी तसाच निःस्तब्धपणे केबिनच्या दाराशी उभा होतो. मन भरून आले होते. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. एवढेच काय ते फक्त माझ्या हातात होते. माझ्याकडून चूक झाली होती. ती दुरुस्त करणे आता शक्य नव्हते. बाण केव्हाच सुटला होता. बाबासाहेबांच्या ठिकाणी एखादा सर्वसामान्य मनुष्य असता तर त्याने सांगितले असते, माझ्याकडे पांघरण्यासाठी एकच रंग आहे आणि तुला कोठून देऊ? सामान्य आणि असामान्य माणसांत जो फरक असतो तो हाच. असामान्य गुणाच्या योगेच असामान्य माणसे महात्मा ठरतात आणि त्यांच्या जीवनामुळे हजारों माणसे हजारो वर्षे उजवून निघतात ज्याच्यापुढे नेहमी नतमस्तक व्हावे अशा विभूतीपैकी बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व होते.
टॉबी आणि पाडस
टॉबी बासाहेबांचा आवडता कुत्रा होता. बाबासाहेब टॉबीवर मुलाप्रमाणे प्रेम करीत. ऑफिसला किंवा घरी आल्यावर जर टॉबी दिसला नाही तर बाबा बेचैन होत असत. कारण टॉबी हा बाबासाहेबांचा अत्यंत विश्वासू असा शरीर रक्षक व सहचारी होता. अहोरात्र टॉबी बाबासाहेबांच्या सहवासात असायचा. ऑफिसमधून बाबा घरी निघाले तर टॉबी वाटाड्याप्रमाणे त्यांच्या पुढे असायचाच.
१९३० साली बाबासाहेबांना मी (वराळे) एक हरणाचे पाडस धारवाडहून नेऊन दिले. बाबासाहेबांना ते फार आवडले. बाबासाहेबांच्या वडिलांच्या वेळेपासून त्यांच्या घरी एक पितळेचा पिंजरा होता. त्यात ते पोपट पाळत असत. लहान मुले आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या अंगाखांद्यावर कशी खेळतात त्याप्रमाणे टॉबी व हरणाचे पाडस बाबासाहेबांच्या बरोबर खेळत असत. बाबासाहेब म्हणजे फार मोठा विसावा असे त्यांना वाटत असे. इतका लळा बाबासाहेबांनी या दोन प्राण्यांना लावला होता. संध्याकाळच्या वेळेला दामोदर हॉ लच्या पुढील मोकळ्या हिरळीवर बाबासाहेब बसत असत आणि त्यांच्या अवतीभोवती टॉ बी व पाडस फिरत असलेले दिसे. बाबासाहेबांचे हात-पाय चाटणे, त्यांच्या अंगावर पाय देणे, त्यांच्या तोंडाला देखील स्पर्श करणे वगैरे चाळे त्या प्राण्यांचे सतत चाललेले असत. बाबासाहेबांच्या अंगात त्यावेळी शर्ट असे आणि स्वच्छ पांढऱ्या धोतराची लुंगी नेसलेली असे आणि हे दोन निर्विकार जीव एकसारखे बाबासाहेबांच्या शेजारी घुटमळत असत. बाबासाहेब आणि हे दोन जीव यांच्यातील जिव्हाळा, त्यांचा लपंडाव पाहत असता मन अगदी दर्याद्र व्हायचे. त्यांच्याकडे पाहून प्राचीन काळचा आश्रम माझ्यापढे उभा राहायचा. प्राण्यांच्या सहवासातील साधू-संतांच्या गोष्टी मला आठवायच्या. ते जेवढे तापट, करारी वाटत तेवढेच अंतःकरणाने अतिशय प्रेमळ होते. प्राणिमात्राशी एक अजोड नाते त्यांनी जोडलेले होते. कुटुंबातल्या माणसाप्रमाणेच ते त्यांची काळजी वाहत असत. पावाचे तुकडे, चणे वगैरे त्यांना ते भरवत असत.
टॉबी हा बाबासाहेबांचा जणू एक प्रामाणिक सेवक होता. दामोदर हॉलच्या बाबासाहेबांच्या ऑफिसमध्येच त्याचा मुक्काम असायचा. मी ज्या-ज्या वेळी मुंबईस जात असे त्या-त्या वेळी दामोदर हॉलमध्ये मी उतरत असे. रात्री दामोदर हॉलच्या समोरच्या एका हिरवळीवर बाबासाहेब झोपत असत. एक चटई, त्यावर एक कांबळी, पांघरायला एक कांबळी व एक उशी इतकाच काय तो त्यांचा बिस्तरा असायचा. बाबासाहेबांच्या पायाशी आणि त्यांच्याच अंथरुणावर टॉबी रात्रभर बसून असायचा. एखाद्या वॉचमनसारखा तो बाबासाहेबांची राखण करायचा. आजूबाजूला कोठे पालापाचोळ्याचा जरी आवाज झाला तरी टॉबी तिकडे धाव घेत असे व आम्ही त्यावेळी जागे होत असू. अस्पृश्य व स्पृश्य यांच्यात मारामारीचे प्रसंगी निर्माण होऊन वातावरण जरी तंग झाले तरीही बाबासाहेब हिरवळीवर मोकळ्या जागी झोपत असत. त्यांना तेवढा स्वतःबद्दल आत्मविश्वास होता. तेवढे धैर्यही त्यांच्यात होते. टॉबीलाही प्रसंगातील गांभीर्य जणू कळत असावे आणि म्हणूनच तो विशेष सावध असायचा. टॉबीचा आवाज ऐकून मी देखील एखादेवेळी उठून आजूबाजूला पाहत असे. अशा प्रकारे स्वतःच्या जीवात जीव असेपर्यंत टॉबीने माणसाला लाजवील इतक्या इमानाने बाबासाहेबांची सेवा केली. पुढे वेगवेगळ्या वेळी टॉबी आणि पाडस अॅक्सिडंटमध्ये स्वतःच्या प्राणाला मुकले. त्यावेळी स्वतःच्या बालकासाठी पिता जेवढे दुःख करतो तेवढे दुःख बाबासाहेबांना झाले. अक्षरशः बाबासाहेब त्यावेळी ढसाढसा रडले.
माता रमाईच्या आठवणी
अखिल भारतीय पददलितांचे उद्धारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रमाई या पत्नी भारतीय दीनदलितांच्या अभ्युदयासाठी, उन्नतीसाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केले. अनेक हालअपेष्टा भोगल्या. अनेक अपमान, अवमान सहन केले. अनेकदा त्यांच्याबरोबर प्राणघातक संकटेही आली, हे आपणा सर्वांना माहीतच आहेच! तथापि त्यांच्या पत्नी रमाबाई (ऊर्फ रामू व भागीरथी) यांनीही बाबासाहेब आंबेडकरांकरिता अनेक कष्ट सहन केले, अनेक यातना भोगल्या, उपासतापास केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विलायतेहून ‘राउंड टेबल कॉन्फरन्स' हून १९३२ साली साऱ्या जगाला चकित करून, अस्पृश्यांच्या माणुसकीच्या हक्काचा झगडा पेटवून यशस्वी करून मुंबईस परतले होते. अर्थात त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे चाहते, इष्टमित्र, नातेवाईक व हजारो अनुयायी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.या प्रचंड जनसमुदायात माता रमाबाईंनी नसत्या तर नवलच घडले असते! का, की रमाबाईंची बाबासाहेबांबद्दलची भावनाच तशी जाज्वल होती. उदाहरणादाखल ही एक ओवीच पाहा.
भरतार माझा देवावाणी। त्यांची आस्तुरी मी जशी राणी।
साताजन्मींच्या पुण्याईन मिळाला गं साजणी ॥
भरतार माझा गं सईबाई। त्याची आस्तुरी मी गं जाईजुई ।।
राजगृह शोभती। जशी विठ्ठल गं रखुमाई ।।
बाबासाहेब बोटीतून धक्क्यावर उतरताच जनसागराच्या 'आंबेडकरांचा विजय असो! आंबेडकर कौन है, दलितों का राजा है। आंबेडकर झिंदाबाद' इ. घोषणांनी परिसर दणाणून गेला.बाबासाहेबांच्या गळ्यात एकामागून एक हार पडत होते आणि ते नेत्रदीप दृश्य पाहून माता रमाईचे हृदय उचंबळून येत होते आणि डोळ्यात आनंदाश्रू येत होते. आणि हे दृश्य, बाबासाहेबांचे जे अनेक सवर्ण सेही, पाठीराखे होते त्यातील एकाने ('जनतापत्र' चे संपादक सहस्रबुद्धे यांनी) अचूक टिपले होते. कारण सर्वांच्या शेवटी माता रमाबाईंनी बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला होता. परंतु हार घालताना सर्वांची दृष्टी बाबासाहेबांच्या मुखाकडे होती, तर रमाईची दृष्टी बाबासाहेबांच्या पायाकडे.
माता रमाईंना यापूर्वी अशा सभेत भाषणे करण्याची सवय नव्हती. (एकदा केले होते.) त्यामुळे त्या क्षणभर गडबडल्याच! बोलावं अन् ते चांगलं न वठलं तर? आणि न बोलावं तरी पंचाईत, अशी द्विधा अवस्था झाली होती. पण तो प्रसंग या थोर मातेनं मोठ्या चातुर्यानं हाताळला. त्या म्हणाल्या, अध्यक्ष महाराज, दलितांचे बाबा व माझे थोर पती आणि माझ्या सर्व लहान-थोर बंधुभगिनींनो, सहस्रबुद्धे साहेबांनी माझ्यापुढे दोन प्रश्न ठेवलेत
(१) सर्वांच्या शेवटी मी बाबासाहेबांना हार का घातला व २) त्यावेळी माझी दृष्टी बाबासाहेबांच्या पायाकडे का होती? त्यांचे उत्तर मी देत आहे. चुकलं-माकलं तर क्षमा कराल अशी माझी आशा आहे. पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे की, ज्यांना बाबासाहेबांचं दर्शन कधीकाळी होत असतं त्यांनाच मी प्रथम संधी देणं हे माझं कर्तव्य होतं. ते माणुसकीचं आणि सौजन्याचंही होतं. तेव्हा मी सर्वांना संधी दिली व मग मी हार घातला. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असे आपणास माहीतच आहे की, बाबासाहेबांनी साऱ्या दीनदलितांचं, गोरगरिबांच्या उद्धाराचं कंकण बांधलं आहे व मी त्यांची धर्मपत्नी आहे. त्या कंकणाला माझी नजर लागू नये म्हणून मी त्यांच्या पायाकडं नजर वळविली. माझ्या या उत्तरानं सहस्रबुद्धे साहेबांचं समाधान झालं असेल असं मला वाटतं. आणि आता रमाबाईंनी आपले हे छोटे भाषण संपविले.
डॉ बाबासाहेब
यांचे अनमोल विचार
•तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाविना देशाच्या
विकासाची कोणतीही योजना पूर्णत्वाला जाणार नाही.
•आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेचमहत्त्व
शिक्षणप्रसाराला दिले पाहिजे. (मनमाड, 9 डिसेंबर 1945)
•लोकांमधील जात, वंश किंवा रंग यांच्यातील फरक विसरून
सामाजिक बंधृत्वाला सर्वोच्च स्थान दिले गेले तरच राष्ट्रवाद औचित्य साधू शकेल.
शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास,
बाळगा, कधीही धीर सोडू नका, ही आमच्या जीवनाची पंचसूत्री. (नागपुर, 29 जुलै 1942)
•तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही
जाणार नाही. (औरंगाबाद, 9 डिसेंबर 1953)
• प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार, सर्वांगिक
राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे.... म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत
सक्तीचा कायदा करावा. (महाबळेश्वर, 6 में 1929)
आपणाला सामाजिक दर्जा समानतेच्या पायावर मिळवायचा आहे.
आपली आर्थिक गुलामगिरी नाहीशी केली पाहिजे. (मुंबई, 4 नोव्हेंबर 1932)
भाषणाचा शेवट
•बाबासाहेब तुमच्या बद्दल किती लिहिले तरी ते कमीच आहे. तुम्ही दिलेली ज्ञानाची शिदोरी आम्ही नक्कीच पुढे नेऊ. तुमच्या कार्याला त्रिवार नमन .जय भीम .
“ मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,
तु जगाला शिकवली व्याख्या,
माणसातल्या माणुसकीची,
तु देव नव्हतास, देवदूतही नव्हतास,
तु मानवतेची पूजा करणारा, खरा
महामानव होतास”
सर्वांना १३२ व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा .