Type Here to Get Search Results !

तथागत गौतम बुद्ध जयंती मराठी माहिती | बुद्ध पौर्णिमा संपूर्ण मराठी माहिती | Tathagata Gautam Buddha Jayanti Marathi Information | Buddha Poornima Full Marathi Information

 तथागत गौतम बुद्ध जयंती मराठी माहिती | बुद्ध पौर्णिमा संपूर्ण मराठी माहिती | Tathagata Gautam Buddha Jayanti Marathi Information |  Buddha Poornima Full Marathi Information

जगाला शांततेचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त थोडक्यात माहिती पाहणार आहोत.



कूळ

१. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक ही राज्य नव्हते.


२. सबंध देश निरनिराळ्या अनेक लहानमोठ्या राज्यांत विभागला गेला होता. त्यांपैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती, तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती. 

३. राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण सोळा होती. त्यांची नावे - अंग, मगध, काशी, कोशल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरू, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होत.


४. ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत-कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशीनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भाग.

 ५. ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद असे म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना 'संघ' किंवा 'गणराज्य' असे म्हणत होते.

६. शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवीत होते.

७. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोदनाची होती. 

०८. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते.परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले.

०९.कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते.

११. तत्कालीन राज्यांत कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा पसेनदी (प्रसेनजित) व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad