Type Here to Get Search Results !

अकरावी प्रवेश महत्त्वाची कागदपत्रे 2023 24 | 11th Admission Important Papers 2023 24

अकरावी प्रवेश महत्त्वाची कागदपत्रे 2023 24 | 11th Admission Important Papers 2023 24

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो  दहावी निकाल ssc निकाल साठी काही दिवस राहिले आहेत. दहावीचा निकाल लागला की धावपळ होते ते अकरावी प्रवेश ची . मंग अकरावी प्रवेश  साठी काय काय  कागदपत्रे लागणार आहे याचा विचार आपण करत असतो. म्हणून च आज च्या लेखामध्ये आपण अकरावी प्रवेश महत्त्वाची कागदपत्रे 2023  11th Admission Important Papers 2023 कोण कोणती आहेत ती पाहणार आहोत. 
अकरावी प्रवेश महत्त्वाची कागदपत्रे 2023 24
अकरावी प्रवेश महत्त्वाची कागदपत्रे 2023 24



अकरावी प्रवेश महत्त्वाची कागदपत्रे 2023 (toc)
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
1) SSC Mark sheet or equivalant -
 दहावी पास झाल्याचे गुणपत्रिका .

2) SSC Leaving Certificate -

शाळा सोडल्याचा दाखलLeaving Certificate हे तुम्हाला शाळेमधून मिळते. कॉलेज ला प्रवेश ( अकरावीला प्रवेश ) घेताना गरजेचे आहे

3) Caste Certificates - जात प्रमाणपत्र - 
अकरावी प्रवेश साठी अति महत्वाचे कागदपत्र आहे  .आरक्षण चा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळ जात प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. SC, ST, VJNT, OBC, SBC 

4) Non Creamy Layer Certiticate - VI/NT, OBC, SBC - 

विमुक्त जाती , भटक्या जमाती इतर मागास वर्ग ,प्रवर्ग ( विजाभज, इमाव, या प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्रासोबतच उन्नत व प्रगत गटात मोडत नसले बाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.

5) EWS Eligibility Certificate - EWS

आर्थिक दुर्बल घटकांसाठी पात्रता प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

(सर्व प्रमाणपत्रे संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेली असावीत.)

6) Disability Certificate of Civil Surgeon - Divyang/Disabled 

दिव्यांग (अपंग): जिल्हा शल्य चिकित्सक अधिष्ठाता यांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच अध्ययन अक्षम असलेल्या विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

7) Collectors certificate - Project affected/

Earthquake affected

प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वतीने संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी दिलेल्या विहित नमुन्यातील दाखल्याच्या आधारे प्रकल्पग्रस्त व्यक्तीला अथवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील तिच्यावर अवलंबून असणान्या व्यक्तीला प्रवेश सवलतीच्या संदर्भात द्यावयाच्या दाखल्याचे प्रमाणपत्र आणि भूकंपग्रस्त असलेबाबत सक्षम प्राधिकान्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.


8) Parents Transfer order and Joining report -  Employees Transferred to online area

बदलीने आलेल्या राज्यशासन / केंद्रसरकार / खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पाल्य या आरक्षणांतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची बदली मागील वर्षी १ ऑक्टोबर, नंतर (त्या वर्षाची इ. ११वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर) झालेली असावी, तसेच बदली होऊन आलेल्या कर्मचान्यांच्या पाल्यांनी संबंधित ऑनलाईन प्रवेश क्षेत्राबाहेरूनच इ.१०वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याचाचत कर्मचाऱ्याचे बदली आदेश व बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्याचा अहवाल प्रवेशाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

9) Service Certificate or District - Defence Servicemen and Ex. Ser

Sainik Board Certificate - vicemen

आजी/माजी सैनिकांच्या पत्नी / पाल्य :

(१) आजी सैनिक सेवेत असल्याचा दाखला.

(२) माजी सैनिक जिल्हा सैनिक चौडचे प्रमाणपत्र सेवामुक्ती दाखला.

10) Collectors Certificate -  Freedom Fighters

स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांवर अवलंबून असलेल्या व स्वातंत्र्यसैनिकांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीचे पाल्य स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य म्हणून इ. ११ वी प्रवेशासाठी आरक्षणाचा लाभ घेताना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

11) Certificate issued by district sports officer - Plyer Students

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी खेळाडू विद्यार्थ्यांना राखीव जागांवर प्रवेश देत असताना त्याचा प्राधान्यक्रम

i) अंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील पदकविजेते खेळाडू

(ii) आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सहभागी खेळाडू व त्यानंतर iii) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील पदकविजेते खेळाडू असा राहील. या आरक्षणांतर्गत इ. ११ वी प्रवेशासाठी संबंधित स्पर्धा विजेतेपदाचे प्रमाणपत्र अथवा सहभागाचे प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा विभागीय क्रीडा उपसंचालक यांच्याकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.

12) Certificate issued by women and family 
welfare department - Orphan

अनाथ मुले या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांनी विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांचे (शासन निर्णय २-४-२०१८) प्रमाणपत्र


अकरावी प्रवेश घेताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी व अधिक माहिती साठी खालील निळ्या blue लिंक ला भेट द्या ⬇️ 















Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad