Type Here to Get Search Results !

अकरावी विद्यार्थी नोंदणी व ऑनलाईन प्रवेश अर्ज 2023 कसा भरावा संपूर्ण माहिती मराठी | How to fill 11th student registration and online admission form 2023 complete information Marathi

अकरावी  विद्यार्थी नोंदणी व ऑनलाईन प्रवेश अर्ज 2023 कसा भरावा संपूर्ण माहिती मराठी | How to fill 11th student registration and online admission form 2023 complete information Marathi

अकरावी  विद्यार्थी नोंदणी व ऑनलाईन प्रवेश अर्ज 2023 (toc)

 अकरावी  विद्यार्थी नोंदणी व ऑनलाईन प्रवेश अर्ज 2023 कसा भरावा संपूर्ण माहिती मराठी | How to fill 11th student registration and online admission form 2023 complete information Marathi

अकरावी  विद्यार्थी नोंदणी व ऑनलाईन प्रवेश अर्ज 2023 कसा भरावा
अकरावी  विद्यार्थी नोंदणी व ऑनलाईन प्रवेश अर्ज 2023 कसा भरावा


अ) सर्वसाधारण बाबी :

(१) प्रत्येक विद्यार्थ्यास एकच अर्ज भरता येईल. त्यासाठी प्रथम ऑनलाईन विद्यार्थी नोंदणी करावी...

२) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज वेब पोर्टलवर दोन टप्यांमध्ये भरावयाचा आहे भाग १ (वैयक्तिक माहिती) व भाग-२ (पसंतीक्रम),

३) अर्जाचा भाग - १ भरण्याची सुविधा विद्यार्थी नोंदणीनंतर उपलब्ध होईल. या भागातील माहिती एकदाच भरून प्रमाणित (verty) करून घ्यावयाची आहे. ही प्रक्रिया इ.१०वीं परीक्षेच्या निकालापूर्वीच सुरू होऊ शकते.. 

अर्जाचा भाग-२ भरण्याची सुविधा भाग-१ प्रमाणित करून घेतल्यानंतर उपलब्ध होईल. तसेच प्रत्येक फेरीपूर्वी भाग-२ मधील माहिती / पसंतीक्रम अद्ययावत करता येईल.


ब) ऑनलाईन नोंदणी कशी करावी : 


(१) प्रवेश प्रक्रियेची माहितीपुस्तिका वेब पोर्टलवर उपलब्ध आहे त्यांचे वाचन करा.


(२) नमुना अर्ज भरण्यापूर्वी माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचा व संपूर्ण प्रवेश प्रक्रिया समजून घ्या. यासाठी आपल्या शाळेची अथवा मार्गदर्शन केंद्राची मदत घ्या


(३)  प्रवेशासाठी क्षेत्र निश्चित करा व योग्य वेब पोर्टल / वेबसाईट उघडा (STUDENTS REGISTRATION) वेब पोर्टलवर नोंदणी करताना तुमचा इ.१० वीचा बैठक क्रमांक व मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉगीन आयडी तुम्हास प्राप्त होईल, पासवर्ड तुम्हास स्वतः तयार करावयाचा आहे. मिळालेले लॉगीन आयडी व पासवर्ड लॉगीन करण्यासाठी वापरा. (लॉगीन आयडी व पासवर्ड जपून ठेवा.

तुमचा लॉगीन आयडी व पासवर्ड एसएमएस द्वारे तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाठविला जाईल. जर एसएमएस आला नाही, तर नोंदणीनंतर स्क्रीनवर दाखवलेला लॉगीन आयडी नोंदवून ठेवा.

नोंदणी करताना निवडलेल्या सिक्युरिटी प्रश्नाचे उत्तर लक्षात ठेवा. सिक्युरिटी प्रश्न व पासवर्ड याची प्रिंट घ्या व जपून ठेवा (आपला पासवर्ड इतर कोणासही सांगू नका.)


अकरावी 11 प्रवेश अर्ज कसा भरावा (भाग-१):  How to fill 11th student registration and online admission form 2023 complete information Marathi

तुम्हाला मिळालेल्या लॉगीन आयडी व पासवर्डच्या सहाय्याने लॉगीन करा व संगणकावर दिलेल्या सूचनाप्रमाणे टप्याटप्याने ऑनलाईन अर्ज भरा महाराष्ट्र राज्य मंडळाच्या चालू वर्षी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इ. १० वी परीक्षेस नियमित बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा बैठक क्रमांक टाकल्यावर त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप येईल, ती तपासून घ्या. आपोआप येणाऱ्या वैयक्तिक माहितीमध्ये काही दुरुस्ती हवी असल्यास शाळा / मार्गदर्शन केंद्रातून दुरुस्ती करून घ्या. (Grievance Redressal सुविधेचा उपयोग करा.) ज्या विद्याथ्र्यांची माहिती वेब पोर्टलवर बैठक क्रमांक टाकल्यावर येणार नाही, त्यांनी तसेच अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सर्व माहिती स्वतः भरावयाची आहे..


तुम्हाला तुमचा अर्ज भरूनच भरता येईल, तसेच अर्ज भरण्याची सुविध मोबाईल अॅपमध्येही उपलब्ध आहे.


संपूर्ण अर्ज (भाग-१) भरून झाल्यानंतर अर्जातील माहिती (स्वतःचे नाव, आईचे नाव, जन्म तारीख, जात प्रवर्ग, आरक्षण इत्यादी) अचूक असल्याची खात्री करा व शुल्क भरून अर्ज लॉक करा. (११) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. (ती स्पष्ट व वाचनीय असावीत. तसेच त्यांचा आकार ए एमबी पेक्षा


जास्त नसावा.) अपलोड करावयाच्या आवश्यक कागदपत्रांचा तपशील वेब पोर्टल आपोआप दर्शवल


(१२) अर्ज लॉक करण्यापूर्वी तो प्रमाणित करण्यासाठी नजीकचे मार्गदर्शन कह निवडा. जर तुमची इ.१०वीची


शाळा ऑनलाईन क्षेत्रामध्ये असेल, तर तुमचा अर्ज प्रमाणित करण्यासाठी आपोआप तुमच्या शाळेकडे जाईल. त्या ठिकाणाहून अर्ज प्रमाणित (Verify ) करून घ्या. अर्ज Auto Verified झाल्यास तो पुन्हा वेगळ्याने प्रमाणित करून घेण्याची आवश्यकता नाही.


(१३) आपण अपलोड केलेली प्रमाणपत्रे तपासून आपला अर्ज ऑनलाईन प्रमाणित केला जाईल. आपला अर्ज प्रमाणित झाला नसल्यास दिलेल्या नंबरवर फोन करून त्याबाबत मार्गदर्शन केंद्रास/ शाळेस विचारणा करावी.

 २४ तासांनंतर आपण निवडलेले व्हेरिफिकेशन केंद्र बदलता येईल. अर्ज भाग १ भरून झाल्यावर (Dashboard) तपासावा, तेथे VERIFIED असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी फॉर्म प्रमाणित (Verify) करून घेणार नाहीत त्यांचा अर्ज अपूर्ण राहील व असे अर्ज प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. 

तसेच त्यांना भाग-२ ( पसंतीक्रम) भरता येणार नाही: आपल्या अर्जाची प्रिंट काढून स्वतःकडे ठेवावी. प्रवेश अर्ज सादर (Lock Verify ) केल्यानंतर ज्यांना भाग- १ मधील माहितीमध्ये काही दुरुस्ती करावयाची असेल त्यांना आपल्या शाळेकडून अथवा मार्गदर्शन केंद्राकडून दुरुस्ती करून घेता येईल किंवा अर्ज स्वतः UNLOCK करून त्यात बदल करता येईल


 कोणत्याही कामकाजासाठी शाळेत अथवा मार्गदर्शन केंद्रात समक्ष जाण्याचे टाळा. फोनवरून संपर्क साधा व आपली समस्या सोडवून घ्या.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad