११ अकरावी प्रवेश प्रक्रिया फेऱ्या 2023 यांची माहिती | Information about 11th Class Admission Process Round 2023
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या लेखामध्ये आपण अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया समजून घेतली आहे .आज ११ अकरावी प्रवेश प्रक्रिया फेऱ्या 2023 यांची माहिती | Information about 11th Class Admission Process Round 2023 समजून घेणार आहोत .या मध्ये चार फेरीं चा समावेश असतो. चला तर पाहूया कोण कोणत्या फेऱ्या आहेत आणि त्याची प्रक्रिया कशी असते ती .
११ अकरावी प्रवेश प्रक्रिया फेऱ्या 2023 यांची माहिती | Information about 11th Class Admission Process Round 2023
ऑनलाईन अर्ज आवश्यक - ऑनलाइन प्रवेश क्षेत्रामधील उच्च माध्यमिक विद्यालयात (कोणत्याही शाखेसाठी) प्रवेश मिळविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी दिलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. राखीव कोट्यांतर्गत प्रवेश घ्यावयाचा असेल, तरीही ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करणे अनिवार्य आहे. प्रवेश प्रक्रियेच्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरून या प्रक्रियेमध्ये प्रवेश मिळवता येईल.
Information about 11th Class Admission Process Round 2023 |
शून्य फेरी, प्रवेशाच्या नियमित फेऱ्यांच्या पूर्वतयारीसाठी असेल. शून्य फेरीदरम्यान नियमित फेरी - १ प्रवेशाकरिता पसंतीक्रम देण्यासाठी अर्ज भाग २ भरता येईल व कोटा प्रवेशासाठी अप्लाय करता येईल.
केंद्रीय प्रवेशाच्या जागांवर प्रवेश नियमित फेरी १ पासून होतील. द्विलक्षी विषयांचे प्रवेश नियमित फेन्यांतील प्रवेशित विद्यार्थ्यांमधून विद्यालय स्तरावरून समांतरपणे केले जातील.
शून्य फेरी - नियमित फेरी - १ साठी अर्ज (भाग-२ पसंतीक्रम) भरणे कोटा प्रवेशासाठी ऑनलाईन अप्लाय करणे
नियमित फेरी १ - गुणवत्ता , आरक्षण व पसंतीक्रम नुसार असते.
नियमित फेरी २ - गुणवत्ता , आरक्षण व पसंतीक्रम नुसार असते.
नियमित फेरी ३ - गुणवत्ता , आरक्षण व पसंतीक्रम नुसार असते.
विशेष फेरी - गुणवत्ता आणि पसंतीक्रम नुसार असते.
आवश्यकता भासल्यास अतिरिक्त विशेष केल्याचे आयोजन केले जाऊ शकते. (एटीकेटी व उर्वरित विद्याथ्र्यांसाठी).
राखीव कोट्यांतर्गत प्रवेश (QUOTA SEATS):११ अकरावी प्रवेश प्रक्रिया फेऱ्या 2023 यांची माहिती
(२.१०) उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रवेशांसाठी केंद्रीय प्रवेशाच्या CAP जागांव्यतिरिक्त संस्थांतर्गत इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक शाळांसाठी अल्पसंख्याक कोटा राखीव असेल. कोटांतर्गत जागांवरील प्रवेश विद्यालय स्तरावरून गुणवत्तेनुसार केले जातील. (२.११) कोट्यांतर्गत प्रवेशासाठीसुद्धा विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. आणि कोटा
प्रवेशासाठी Apply for Quota करावे. (२.१२) इनहाऊस कोटा (संस्थांतर्गत कोटा) :
१) या कोट्यांतर्गत सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये १०% जागा राखीव असतील. तथापि, त्याच संस्थेची इ.१०वी वर्ग असलेली माध्यमिक शाब्या नसेल, अशा उच्च माध्यमिक विद्यालयात इनहाऊस कोटा लागू होणार नाही.
२) उच्च माध्यमिक विद्यालय चालविणाऱ्या संस्थेने चालविलेल्या माध्यमिक शाळांमधील (त्याच
विभागातील) इ.१०वी उत्तीर्ण विद्यार्थी ह्या कोट्यांतर्गत प्रवेशासाठी पात्र असतील. ३) अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालयांना इनहाऊस कोट्यामधील जागा
प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर भरता येतील तसेच प्रत्यार्पित करता येतील.
(२.१३) व्यवस्थापन कोटा :
१) या कोट्यांतर्गत सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ५% जागा राखीव असतील. यामधील प्रवेश
व्यवस्थापकीय संस्था, त्यांचे अधिकारात करू शकतील. २) अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालयांना व्यवस्थापन कोट्यामधील जागा प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यावर भरता येतील तसेच प्रत्यार्पित करता येतील.
(२.१४) अल्पसंख्याक कोटा
१) अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये केवळ अल्पसंख्याक (धार्मिक/ भाषिक समुदायाच्या
विद्यार्थ्यासाठी या कोट्यांतर्गत ५०% जागा राखीव असतील. २) या कोट्यातून प्रवेशासाठी केवळ अल्पसंख्याक (ख्रिश्चन, जैन, बौद्ध, मुस्लिम, शीख, पारशी इ.
धार्मिक अल्पसंख्याक व भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थी पात्र असतील. ३) अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालयांना अल्पसंख्याक कोट्यांतर्गत उपलब्ध असणान्या जागा नियमित तान फेल्या संपेपर्यंत भरता येतील. अल्पसंख्याक कोट्यातील जागा रिक्त राहिल्यास तीन नियमित फेल्या संपल्यानंतरच CAP कडे प्रत्यार्पित करता येतील.सीनही कोट्यांतर्गत देण्यात आलेले प्रवेश, यथाशीघ्र प्रवेश प्रक्रियेच्या वेब पोर्टलवर नोंदविणे उच्च माध्यमिक विद्यालयास बंधनकारक आहे.
कोट्यांतर्गत प्रवेशासाठी दिशादर्शक - Information about 11th Class Admission Process Round Guidelines for admission under quota
(१) कोटांतर्गत राखीव जागांवरील प्रवेश उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावरून गुणवत्तेनुसार केले जातील. त्यामध्ये ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनाच संधी दिली जाईल. कोटा प्रवेशासाठी ऑनलाईन अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयांना मिळेल.
(२) ज्या संस्थेची माध्यमिक (इ.१०वी) शाळा नसेल त्या संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थांतर्गत इनहाऊस कोटा लागू असणार नाही.
३) अल्पसंख्याक कोटा केवळ अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये, अल्पसंख्याक समुद्र विद्यार्थ्यासाठी राखीव असेल. बिगर अल्पसंख्याक विद्यालयात अल्पसंख्याक कोटा नाही.
४) अल्पसंख्याक विभागाच्या नियमानुसार अल्पसंख्याक कोटा जगांवरील प्रवेशात संबंधित संस्थेस दर्जाच्या अल्पसंख्याक समूहातील विद्यार्थ्यांना अग्रक्रम देण्यात येईल. सदर समूहातील पुरेसे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास इतर अल्पसंख्याक (धार्मिक/ भाषिक) समूहातील विद्याथ्यांना क्रमाक्रमाने प्रवेश देता येतील आणि शेवटी रिक्त जागा खुल्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेशासाठी प्रत्यापित करता येतील.