Type Here to Get Search Results !

११ अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023 समजून घेऊ या | Let's understand the 11th Online Admission Process 2023

 ११ अकरावी ऑनलाईन  प्रवेश प्रक्रिया  2023 समजून घेऊ या | Let's understand the 11th Online Admission Process 2023

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपूर्वी १२ वी चा निकाल लागला आहे . त्यामुळे येणाऱ्या सात दिवसांत १० ssc चा निकाल लागणार हे निश्चित झाले आहे. निकाल लागल्यानंतर तुमच्या पुढे प्रश्न असतो तो म्हणजे अकरावी प्रवेश म्हणून च आज च्या लेखामध्ये आपण ११ अकरावी ऑनलाईन  प्रवेश प्रक्रिया  2023 समजून घेऊ या |Let's understand the 11th Online Admission Process 2023 .


११ अकरावी ऑनलाईन  प्रवेश प्रक्रिया  2023 समजून घेऊ या | Let's understand the 11th Online Admission Process 2023
Let's understand the 11th Online Admission Process 2023
११ अकरावी ऑनलाईन  प्रवेश प्रक्रिया  2023 समजून घेऊ या 

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, निश्चित केलेल्या सहा ऑनलाईन प्रवेश क्षेत्रातील (मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती व नाशिक महानगरपालिका) क्षेत्र राज्य मंडळाशी संलग्न सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक विद्यालयांना लागू राहील व त्यांना या प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य राहील अर्थात, वरील क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जातील.



(२.२) राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळांशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रवेश या प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जाणार नाहीत. (अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या इ. ११ वीच्या वर्गात प्र असल्यास त्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल). 

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती - Let's understand the 11th Online Admission Process 2023

(२.३) केंद्रीय ऑनलाईन प्रवेशासाठी, कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम (HSVC) या चार शाखा उपलब्ध असतील. (२.४) खालील प्रकारच्या उच्च माध्यमिक विद्यालयांना सदर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लागू असणार नाही.


(अ) रात्र उच्च माध्यमिक विद्यालय


(ब) सैनिकी उच्च माध्यमिक विद्यालय


(क) विशेष शाळा (दिव्यांग अपंग विद्याथ्र्यांसाठीच्या शाळा )


. (२.५) विहित ऑनलाईन प्रवेश क्षेत्रातील राज्य मंडळ संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही मंडळातून इ. १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे लागेल. त्यासाठी खालील क्षेत्रनिहाय वेब पोर्टलचा वापर करावा.


मुंबई महानगर क्षेत्र (MMR) : 



पुणे, पिंपरी-चिंचवड मनपा




नागपूर महानगरपालिका



अमरावती महानगरपालिका 


नाशिक महानगरपालिका

https://nashik.11thadmission.org.in

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची कार्यपद्धती (CAP) :११ अकरावी ऑनलाईन  प्रवेश प्रक्रिया  2023 समजून घेऊ या 

(२.६) इयत्ता ११वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्य मंडळाचा इयत्ता १० वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल लागल्यानंतर सुरू होईल. तथापि ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग २ निकालापूर्वीपासूनच भरता येईल. त्यासाठी वेळोवेळी जाहीर होणारे वेळापत्रक पाहा. (२.७) राज्य मंडळ इ. १० वी परीक्षेच्या ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यांना भाग-२ ( पसंतीक्रम) भरता येईल व त्यानंतर इ. ११वी केंद्रीय प्रवेशाकरिता पुढीलप्रमाणे विविध फेन्यांचे आयोजन करण्यात येईल.


१) शून्य फेरी सदर फेरी नियमित फेन्या सुरू होण्यापूर्वी आयोजित करण्यात येईल व प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल. या फेरीमध्ये कोणतेही प्रवेश होणार नाहीत. परंतु नियमित फेरी-१ साठी प्रवेश अर्ज भाग- २ भरणेची कार्यवाही या कालावधीमध्ये करता येईल. तसेच सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून अंतिम केले जाईल. व्यवस्थापन संस्थांतर्गत इन हाऊस व अल्पसंख्याक कोटांतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन Apply करता येईल. २) तीन नियमित फेऱ्या शून्य फेरीत पसंतीक्रम दिल्यानंतर ३ नियमित फेऱ्यांचे आयोजन केले जाईल. नियमित फेऱ्यांमध्ये सर्व शाखांचे प्रवेश गुणवत्तेनुसार आरक्षणानुसार व विद्यार्थ्यांच्य पसंतीक्रमानुसार केले जातील. (सुलभतेसाठी प्रवाह तक्ता ९ पाहा.) प्रत्येक फेरीपूर्वी पसंतीक्रम (भाग-२) मध्ये बदल करता येईल.

३) विशेष फेरी नियमित ३ फेन्या संपल्यानंतर विशेष फेरीचे आयोजन केले जाईल. नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांबरोबरच प्रतिबंधित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या फेरीमध्ये सहभागी होता येईल. (सर्वासाठी खुली ) या फेरीमध्ये प्रवेश गुणवत्तेनुसार होतील आरक्षण लागू नसेल.

 (४) आवश्यकता भासल्यास एटीकेटी तसेच उर्वरित विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त विशेष फेरीचे आयोजन केले जाऊ शकते.


(२.८) द्विलक्षी विषयांचे प्रवेश समांतर प्रवेश प्रक्रिया राबवून उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावरून गुणवत्तेनुसार करण्यात येतील. त्यासाठी सर्वसाधारण निवड यादीतून प्रवेश घेतलेले विद्यार्थी ऑनलाईन विकल्प देऊ शकतील.


(२.९) प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक वेब पोर्टलवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचे नियमित अवलोकन व पालन करावे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad