अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 राखीव जागा आरक्षण माहिती मराठी | XI Admission Process 2023 Reserved Seat Reservation Information Marathi
सर्व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रवेश हे प्रचलित नियमानुसार वैधानिक ( घटनात्मक) व विशेष आरक्षणांची टक्केवारी विचारात घेऊन अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 राखीव जागा आरक्षण दिले जाते या विषयी माहिती मराठी (XI Admission Process 2023 Reserved Seat Reservation Information Marathi) मध्ये आज आपण पाहणार आहोत.
अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 राखीव जागा आरक्षण माहिती मराठी |
अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 राखीव जागा आरक्षण माहिती मराठी | XI Admission Process 2023 Reserved Seat Reservation Information Marathi
आरक्षित जागे विषयी माहिती
क्र | प्रवर्ग | आरक्षित जागा | रायगड जिल्हा क्षेत्र |
---|---|---|---|
१. | अनुसूचित जाती (SC) | १३ % | ११ % |
२. | अनुसूचित जमाती (ST) | ७% | ९ % |
३. | विमुक्त जाती-अ (VJ-A ) | ३% | ३ % |
४. | भटक्या जमाती व (NT-B) | २.५ % | २.५% |
५. | भटक्या जमाती व (NT-C) | ३.५% | ३.५% |
६. | भटक्या जमाती व (NT-D) | २% | २% |
७. | विशेष मागास प्रवर्ग (SBC) | २% | २% |
८. | इतर मागासवर्गीय (OBC) | १९ % | १९ % |
९. | आर्थिक दुर्बल घटक (EWS) | १०% | १०% |
अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 राखीव जागा आरक्षण माहिती मराठी | XI Admission Process 2023 Reserved Seat Reservation Information Marathi
१) समांतर आरक्षण हे कप्पीकृत असल्याने उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जागा निश्चित करताना केवळ
सामाजिक आरक्षणाची संख्या नमूद न करता समांतर आरक्षणाच्या जागांची निश्चिती करून घेतली जाईल. २) सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १३-८-२०१४ व दिनांक १९-१२-२०१८ च्या परिपत्रकानुसार समांतर आरक्षणाच्या जागा संबंधित सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गातून भरणे आवश्यक आहे.
३) सामाजिक व समांतर आरक्षणानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास सामान्य प्रशासन विभागाच्या
दिनांक ५-१२-२०१४ व दिनांक २८-१२-२०१८ च्या शासन निर्णयानुसार उर्वरित रिक्त जागा शुद्ध प्रवर्गात परिवर्तित करण्यात येतील. सदर जागा गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. ४) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी (कोट्यांतर्गत प्रदेश वगळून) उपलब्ध होणाऱ्या जागांवरील. (प्रत्यार्पित केलेल्या जागांसह) सर्व प्रवेश लागू होत असलेल्या आरक्षणानुसार होतील.
४) तांत्रिक आरक्षण (२५% व्यावसायिक)
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम व NSQF अंतर्गत सुरू असलेले व्यावसायिक विषय घेऊन इ.१०वी (Level 2) उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांसाठी HSVC शाखा व द्विलक्षी / Bifocal विषयांसाठी २५% जागा राखीव असतील.
इ.१० वीसाठी विषय सांकेतांक ८१ ते ९४ असे एकूण १४ व्यावसायिक अभ्यासक्रम तांत्रिक कोट्यासाठी
पात्र असतील.