बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती माहिती मराठी | Buddha Purnima Buddha Jayanti Information Marathi
नमस्कार आज आपण जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म ख्रिस्त पूर्व ५६३ च्या वैशाखी पौर्णिमेला झाला होता.तो दिवस संपूर्ण जगात बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती म्हणून साजरा केला जातो. बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती माहिती मराठी Buddha Purnima Buddha Jayanti Information Marathi माहिती थोडक्यात पाहणार आहोत.
बौद्ध धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, विज्ञानाने जागृत झालेला समाज तो सहर्ष स्वीकारील. मानवासाठी कल्याणकारी असणाऱ्या या धर्मात उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद नाही. समानता हेच तत्त्व या धम्मात व्यापून आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे या धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथातून विस्तृतपणे मांडलेले आहे. गौतम बुद्धांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर, समाजातील मौलिक प्रश्नांवर विवेचन करणारा हा एकमेवाद्वितीय ग्रंथ होय. सबंध मानवास समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा हा एक प्रमाण ग्रंथ आहे.
सर्वांना जय भीम
तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला दिलेल्या बौद्ध धर्म या विषयी बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की
“विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारू शकेल असा एकमेव बुद्धांचा धम्म आहे, त्याशिवाय हा समाज नष्टप्राय होऊन जाईल. या आधुनिक जगात बौद्ध धर्म हा असा एकच धर्म आहे जो मानवजातीचे रक्षण करू शकेल."
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर .
बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती माहिती मराठी
तथागत गौतम बुद्ध कसे होते याचे वर्णन खालील पंक्ती मध्ये केलेले आहे.
चित्त आत बाहेर परिशुद्ध होते।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते ।।
प्रज्ञा शील समाधीने समृद्ध होते ।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते।
वैशाख पौर्णिमेची धन्य रात्र झाली।
सम्बोधि मिळाली बोधिवृक्षाखाली ।
दुर्धर त्या मारासंगे महाबुद्ध होते।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते || १ ||
जागृत सम्पूर्ण जीवनमुक्त होते।
ऋद्धि सिद्धि पारमिता तेजयुक्त होते।
जगी सर्व श्रेष्ठ स्वयमसिद्ध होते ।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते ॥२॥
आत्मा ईश्वराला झूठ मानणारा ।
तिन्ही काळातील ज्ञानी लोक जाणणारा ।
बहुजन हिताय सुखाय वचनबद्ध होते ।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते ॥ ३ ॥
असा महाकारुणिक लोकनाथ महर्षी ।
सर्व शास्त्र विज्ञानाच्या दर्शनास स्पर्थी ।
रोज पायी यात्रा जरी वृद्ध होते ।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते ॥४॥
गगन धुन्ध व्हावे समुद्रातील पाणी।
क्रोध शांत होती अशी होती वाणी।
'सूर्यकान्त त्रिपिटकात हेच शब्द होते।
धम्म सांगणारे असे बुद्ध होते ||५||
गौतम बुद्ध यांचा जन्म
तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म ख्रिस्त पूर्व ५६३ च्या वैशाखी पौर्णिमेला शुद्धोदन व महामाया यांच्या पोटी झाला.
जन्म ठिकाण -
जन्म ख्रिस्ताच्या (ईसा) जन्माच्या जवळपास सहाशे वर्ष आधि सहाव्या शताब्दिच्या मध्यात (५६३ ई. पूर्व) लुम्बिनी उद्यानात झाला होता. हे कपिलवस्तुच्या बाजुला आहे, जे की गोरखपूर जिल्ह्याच्या उत्तरेला आहे. मानवतेच्या महानतम शिक्षकाच्या जन्मस्थानच्या रूपामध्ये याची स्मृति बनवून राखण्यासाठी आणि तिर्थस्थानच्या प्रति आपल्या पुजेच्या भावनेच्या अभिव्यक्ति साठी २३९ ई.पू. मध्ये सम्राट अशोकांनी येथे एक दगडी स्तंभ उभा करवून घेतला होता. त्या खांबावर हे शब्द उत्कीर्ण आहेत- येथे भगवंतांचा जन्म झाला होता.
सिद्धार्थला जन्म देण्याचे सात दिवसा नंतरच त्यांच्या मातेचा शरीरान्त झाला. दयाळू मावशी प्रजापती गौतमी द्वारे त्यांचे लालन-पालन झाले. त्यांना सुखात ठेवण्याच्या प्रयत्नात कोणत्याही प्रकारची कमी नव्हती.
विवाह जीवन
१. दंडपाणि नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती.
२. यशोधरेने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणि तिच्या लग्नाच्या चिंतेत होता.
३. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणिने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशांतील युवकांना निमंत्रणे धाडली.
४. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते.
५. सिद्धार्थ गौतमालाही सोळा वर्षे पूर्ण झाली होती. त्याच्या मातापित्यालादेखील त्याच्या विवाहाची अशी काळजी लागली होती. ६. त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणिग्रहण करण्यास
सांगितले. त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला.
७. जमलेल्या सर्व युवकांतून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले.
८. दंडपाणि विशेष प्रसन्न नव्हता. या विवाहाच्या यशस्वितेबद्दल तो साशंक होता. ९. त्याला वाटले, “सिद्धार्थाला साधुमुनींच्या सहवासाचे विशेष वेड आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते, तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल?"
१०. सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, “साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे?" यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते..
११. सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणिला सांगितले. दंडपाणिने तशी संमती दिली.
१२. गौतमाच्या प्रतिस्पर्थ्यांची यामुळे निराशा तर झालीच; परंतु आपला अपमान झाला
असे त्यांना वाटले.
१३. त्यांना वाटले की, त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती; पण तिने तसे काही केले नाही. १४. त्या वेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणि यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची
निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. १५. परंतु दंडपाणि जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की, धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणिला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले.
१६. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वांत अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल, हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनाला आणून दिले.
१७. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले.
१८. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले. १९. गौतमाची पाळी सर्वाच्या शेवटी आली परंतु त्याची निसर्वश्रेष्ठ ठरली.
२०. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोदन व दंडपाणि या दोघांनाही आनंद झाला.
त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला.
सोळा वर्षे वयामध्ये त्यांचा विवाह कोलिय-कन्या यशोधरा सोबत संपन्न केल्या गेला. त्यांना राहुल नामक पुत्र झाला.
जवळपास २५ वर्षे वयापर्यंत सिद्धार्थ सुख-सुविधापूर्ण जीवन व्यतित करीत होते.
Buddha Purnima Buddha Jayanti Information Marathi
गृहत्याग
शाक्य संघात प्रवेश
१. शाक्यांचा एक संघ होता. वयाची वीस वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे. २. सिद्धार्थ गौतमाला वीस वर्षे पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते.
३. शाक्यांचे एक सभागृह होते. त्यात्ता ते 'संथागार म्हणत ते कपिलवस्तु नगरात होते. संघाच्या सभाही याच संथागारात होत असत.
४. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोदनाने शाक्यांच्या पुरोहिताला
संघाची सभा बोलावल्यास सांगितले. ५. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली.
६. सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला.
७. तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला. संघाला उद्देशून त्याने पुढीलप्रमाणे भाषण केले "शाक्य वंशातील शुद्धोदनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय वीस वर्षांचे असून तो सर्व दृष्टींनी या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे. म्हणून याला या संघाचे सदस्य करून घ्यावे, असे मी सुचवितो. माझी अशी प्रार्थना आहे की, या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. "
११. शाक्यांचा असा नियम होता की, एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव तीन वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते.
१२. सेनापतीने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले.
१३. तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले.
संघाशी संघर्ष
संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक अशी घटना घडली की, जी शुद्धोदनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली.
रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे.
आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहे आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत. पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्याविरुद्ध यू पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे. "
4
सिद्धार्थाच्या वयाला अठ्ठावीस वर्षे झाली. त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकांत नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या.
सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, "या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसन्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या भेटतो. जो दुसऱ्याला करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो, जो दुसऱ्याला जिंकतो त्यासा जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो."
सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, "संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये, असे मला वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी अतिक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे खरे असेल तर आपणसुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते."
सेनापतीने उत्तर दिले, "होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती.
सिद्धार्थ गौतम म्हणाला, "यावरून स्पष्ट होते की, आपण दोषांपासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवितो की, आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे. "
सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले; परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, "माझी खात्री आहे की, कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत
त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. यामुळे मूड व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली.
ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले.
सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, "हा प्रस्ताव मान्य करू नये.
देशत्यागाची तयारी
कोलियांशी युद्ध करण्याविरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील यांची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले. एक सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे; दुसरा देहान्त शासनाला अथवा देश त्यागाला संमती; आणि तिसरा आपल्या कुटुंबीयांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे.
त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, “कृपाकरून माझ्या कुटुंबीयांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू या. मत्ता देहान्ताची वा देशत्यागाची यांपैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या, ती मी खुशीने स्वीकारीन. याविषयी कोशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही याचे मी आपणांस अभिवचन देतो."
सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्या घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता. त्याप्रमाणे तो दुसरे दिवशी आपला आवडता घोड़ा कंठक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाले.
भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन (चालू) अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग - गौतम बुद्ध - बुद्ध पौर्णिमा
१. नंतर भगवान बुद्धांनी परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले. भगवान बुद्धांनी सांगितले की, अष्टांगिक मार्गाचे आठ घटक आहेत.
२. अष्टांगिक मार्गाचे सर्वांत पहिले महत्त्वाचे अंग सम्मा दिठि (सम्यक दृष्टी). याच्या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धांनी आपल्या प्रवचनास सुरुवात केली. ३. सम्यक दृष्टीचे महत्त्व समजण्याकरिता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाले,
४. “परिव्राजक हो, जग ही एक अंधारकोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे.”
५. “ही अंधारकोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की, कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही.”
६. “दीर्घकाल अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे.
नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते.”
७. “मन हे एक असे साधन आहे की, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो.” ८. “तथापि, या अंधारकोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की, त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. "
९. “त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे, अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखविण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते.”
१०. “अशा प्रकारे त्यांची आकलनशक्ती स्वभावतःच सदोष असते."
११. “परंतु परिव्राजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही,हे लक्षात घ्या."
भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन शीलमार्ग (चालू) Buddha Purnima
१. नंतर भगवान बुद्धांनी परिव्राजकांना शीलमार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला. २. त्यांनी त्यांना सांगितले की, शीलमार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय (१) शील, (२) दान, (३) उपेक्षा (४), (५), (६) शांती (०)
सत्य, (८) अधिष्ठान, (९) करुणा आणि (१०) मैत्री.
३. या सद्गुणांचा अर्थ परिव्राजकांनी भगवान बुद्धांना विचारला.
४. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले : ५. "शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील म्हणजे पापभीरुता."
६. “नैष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग." ७. "स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे, इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय." ८. "वीर्य म्हणजे योग्य (सम्यक) प्रयत्न हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न
घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य'
"शांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण
द्वेषाने द्वेष शमत नाही. तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो. "" १०. “सत्य म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण है। सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये. "
११. “ अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय." १२. " करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता. "
१३. "मैत्री म्हणजे सर्व प्राध्यांविषयी मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयीदेखील,
मनुष्यप्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे. ""
भगवान बुद्ध यांचे बारा शिष्य
भगवान् बुद्धाच्या शिष्यांमध्ये बारा शिष्य असे होते जे धर्मोपदेशकाच्या रूपाने फार प्रसिद्धी पावलेत. ते होते अजात कौडिन्य, अश्वजित, सारिपुत्र, मौद्गल्यायन, महाकाश्यप, महाकात्यायन, अनुरूद्ध, उपालि, पिण्डोल भारद्वाज, कौस्थिल, राहुल तथा मैत्रायणीपुत्र. निवृत्त होण्याचे काही काळ आधि सुभद्रशी चर्चा करताना तथागताने म्हटले होते की माझ्या धर्म-विनय पासुन बाहेर या बारा धर्मोपदेशकांच्या सारखे असे उपदेशक जे लोकांमध्ये जागृति निर्माण करू शकतील, लोकांना उत्साहित करू शकतील, अन्यत्र कोठेही नाहीत.
महापरिनिर्वाण -
वैशाखी पौर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहारात तथागतांचे परिनिर्वाण झाले. त्यांचे परिनिर्वाण इ.स. पूर्व ४८३ मध्ये झाले.
पाली भाषेतल्या ग्रंथात असे म्हटले आहे
दिवा तपति आदिच्चो
रत्तिं आभाति चन्दिमा
सन्नद्धो खत्तियो तपति
झायी तपति ब्राह्मणो
अथ सब्बं अहोरत्ति
बुद्धो तपति तेजसा ।।
अर्थ - 'सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेजःपुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयंतेजाने दिवस-रात्र सतत प्रकाशित राहतो.'
महापरिनिर्वाणानंतर बुद्धांच्या अस्थी आठ भागांत विभागण्यात आल्या...
द्रोण म्हणाला, “ज्या तथागतांनी आपणास संयमाचे शिक्षण दिले त्याच नरवरांच्या अस्थींच्या हिश्शासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय !
“आपण सर्वांनी एकमताने, मित्रत्वाने व दिलजमाईने अस्थींचे सारखे आठ हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यांवर स्तूप उभारावेत की, जेणेकरून त्या त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल.” “कुशिनाराच्या मल्लांनी मान्यता दर्शविली आणि ते म्हणाले, "हे ब्राह्मणा! तूच या अवशेषांचे सारखे आठ हिस्से करून सुयोग्य वाटणी कर.”
तथागत गौतम बुद्ध यांच्या कार्याला त्रिवार या अभिवंदन करतो.
खरे तर तथागत गौतम बुद्ध यांच्या विषयी जेवढे लिखान करू तेवढे कमी आहे.
तथागत गौतम बुद्ध व बौद्ध धर्म - पुस्तके बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती
तथागत गौतम बुद्ध व बौद्ध धर्म काय हे समजून घेण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे . खालील पुस्तके वाचावी असे मला वाटते .
आपल्याला आपल्या धर्मा विषयी माहिती असणे आवश्यक आहे आणि ही माहिती तुम्हाला या पुस्तकातून मिळेल असे मला वाटते जय भीम 🙏
१. त्रिपिटक सार संग्रह - सुत्तपिटक विनयपिटक अभिधम्मपिटक संपादक अनुवादक- व्याख्याकार * आचार्य सूर्यकान्त भगत डॉ. राजेंद्र भस्मे
२. बौद्ध धर्माचे सार -दि एसेंस ऑफ बुद्धिजम लेखक - प्रो. पी. लक्ष्मी नरसु मराठी अनुवादक - अॅड. प्रमोदकुमार इन्द्रजीत भगत
३. बुद्ध चरित्र - धर्मानंद कोसंबी.
४. जातक कथासंग्रह - धर्मानंद कोसंबी.
५. बुद्ध आणि त्यांचा धम्म - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
६. सुत्तपिटकातील जगप्रसिद्ध ग्रंथ -धम्मपद गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा - अनुवादक-संपादक - आचार्य सूर्यकान्त भगत डॉ. राजेंद्र भस्मे
७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर - बौद्ध धर्म हाच मानवधर्म