Type Here to Get Search Results !

शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपूर्ण मराठी माहिती २०२३ | Shiv Rajyabhishek Day Ceremony Full Marathi Information 2023

शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपूर्ण मराठी माहिती २०२३ |ShivRajyabhishek Day Ceremony Full Marathi Information 2023

नमस्कार सर्वांना 6 जून रोजी होणाऱ्या शिवशक ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा💐.  हा सोहळा स्वराज्याची राजधानी रायगड या गडावर संपन्न होणार आहे. आज आपण या लेखामध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपूर्ण माहिती मराठी २०२३ Shiv Rajyabhishek Day Ceremony Full Marathi Information 2023  पाहणार आहोत.


शिवराज्याभिषेक दिन सोहळा  संपूर्ण मराठी माहिती २०२३
शिवराज्याभिषेक दिन सोहळा  संपूर्ण मराठी माहिती २०२३


छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक (toc)

शिवराज्याभिषेक दिन सोहळा -  संपूर्ण मराठी माहिती २०२३ Shiv Rajyabhishek day  Ceremony Full Marathi Information 2023

मध्ययुगीन महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना म्हणून शिवाजी महाराजांनी केलेल्या विधियुक्त राज्याभिषेकाकडे पाहिले जाते. राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्यास कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले. भारताच्या बहुतांश भागात मुस्लीम सत्तांचे वर्चस्व असताना त्यांच्याशी सातत्याने संघर्ष करून शिवाजी महाराजांनी शुन्यातूनच नविन स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यांचे हे कार्य असामान्य स्वरूपाचे होते. राज्याभिषेकामुळे मराठी माणसांची अस्मिता जिवंत झाली. शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचे जे असामान्य कार्य केले होते त्याची परिणती शिवराज्याभिषेक सोहळयामध्ये होणे अटळ होते. मुघल, आदिलशहा व कुतुबशहा या राजवटीत चाकरी करून अनेक मराठा सरदार स्वत:ला राजे म्हणवून घेत असत. पण त्यांना स्वतः ला विधीयुक्त राज्याभिषेक मात्र करता येत नसे. राज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी मुघल, आदिलशहा व कुतूबशहा यांना आपण स्वतंत्र व सार्वभौम सत्ताधीश झाल्याचे दाखवून दिले. हिंदू जनतेसाठी एक स्वतंत्र राज्य व राजा आहे याची जाणीव करून दिली.

शिवराज्याभिषेक  करण्याचा विचार नेमका कोणाचा होता ? Shiv Rajyabhishek   Ceremony

शिवराज्याभिषेक करण्याचा विचार नेमका कोणाचा होता व हा विचार शिवाजी महाराजांच्या मनात केव्हा आला याविषयी विविध मते व्यक्त केली जातात.  गागाभट्टाच्या आग्रहामुळे मराठा साम्राज्याच्या छोटया बखरीमध्ये सर्वांचा मनोदय झाला तर चिटणीस बखरीमध्ये शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेण्याचा निश्चय केला असे म्हटले आहे.  "वेदमूर्ति राजेश्री गागाभट म्हणून वाराणशीहून राजियाची किर्ती ऐकून दर्शनास आले... त्यांचे मते, मुसलमान बादशहा तक्ती बसून, छत्र धरून, पातशाही करितात, आणि शिवाजीराजे यांनीही चार पातशाही दबविल्या आणि पाऊण लाख घोडा लकर गडकोट असे ( मेळविले) असता त्यास तक्त नाही. याकरिता महाठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणिले. आणि (ते) राजियासहि मानले" राज्याभिषेक करण्याचा विचार स्वतः शिवाजी महाराजांचाच असला पाहिजे. त्यांच्या या कल्पनेस त्यांच्या सहकान्यांचाही पाठिंबा असला पाहिजे. त्याचबरोबर महत्त्वकांक्षी मनोवृत्तीच्या जिजाबाईंचीही प्रेरणा राज्याभिषेकाबाबत असली पाहिजे. त्यांनी राज्याभिषेक केला नसता तर अनेक संकटावर मात करून मोठ्या कष्टाने व जिद्दीने निर्माण केलेल्या स्वराज्यास अर्थच राहिला नसता. विधियुक्त राज्याभिषेक केल्यामुळे स्वराज्याला खऱ्या अर्थाने कायदेशीर व सार्वभौम स्वरूप प्राप्त झाले. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्यास प्रामुख्याने पुढील कारणे कारणीभूत ठरली.


शिवराज्याभिषेकाची कारणे Reasons for Shiva's coronation - 

१. मध्ययुगीन कालखंडात विधियुक्त राज्याभिषेक केलेल्या राजाचे राज्य हेच खरे कायदेशीर राज्य असे मानले जात होते. मुघल, आदिलशहा व कुतूबशहा हे खरे राज्यकर्ते आहेत. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक न केल्यामुळे मुघल, आदिलशहा, कुतूबशहा या स्थानिक सत्ताधीशांबरो फ्रेंच, पोर्तुगीज, डच हे परकीय व्यापारी त्यांना खरा राजा मानाण्यास तयार नव्हते.

२. शिवाजी महाराजांनी पुणे सुपे, चाकण आणि इंदापूर या प्रदेशातून स्वराज्य स्थापने सुरू केली होती. हा प्रदेश आदिलशहाने शहाजी राजेंना जहागिरी म्हणून दिला होता. राजा राजे स्वत: कर्नाटकात वास्तव्यास असल्याने त्यांनी हा प्रदेश शिवाजी महाराजांकडे सोपवला होता.. आदिलशहा शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे आपल्याच राज्याचा एक भाग आहे असे मानत होता. आदिलशहा शिवाजी महाराजांना स्वतंत्र राजा न मानता आपल्या सरदाराचा एक शक्तीशाली बंडखोर मुलगा समजत असे. आपण बंडखोर सरदार नसून स्वतंत्र राज्यकर्ते आहोत हे दाखवून देण्यासाठी त्यांना राज्याभिषेक करणे गरजेचे होते.


३. मध्ययुगीन कालखंडात वतन किंवा इनामे देण्याचा कायदेशीर अधिकार राजांना होता... सिंहासनाधिष्ठीत राजाचे राज्यच कायदेशीर राज्य व या राजाचे फर्मान हे सरकारी फर्मान मानले जात होते. शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक न केल्यामुळे त्यांचे फर्मान हे सरकारी फर्मान समजले जात नव्हते..


१४. मराठे सरदारांची मानसिकताही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास कारणीभूत ठरली. तत्कालीन परिस्थितीत मराठे सरदार मुघल, आदिलशहा व कुतूबशहा या सत्ताधीशांकडे चाकरी करत असत व स्वतःला राजे हा किताब लावत असत. हे सरदार शिवाजी महाराजांना स्वतंत्र राजा न मानता आपल्यातील एक मराठा सरदार मानत असत. या सरदाराप्रमाणे आपण शाही राजवटींचे सरदार नसून स्वतंत्र राजे आहोत हे सिध्द करण्यासाठी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करणे आवश्यक होते.


५. ब्राम्हण गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा अधिकार फक्त राजालाच होता. शिवाजी महाराजानी स्वतःला विधीयुक्त राज्याभिषेक न केल्याने आपल्या वर्चस्वाखालील प्रदेशातील ब्राम्हण गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला नव्हता. ब्राम्हण गुन्हेगारास शिक्षा देण्यासाठी त्यांना ब्रम्हवृंद जमवून किंवा काशीस्त ब्राम्हणांकडून ते सोडवावे लागत असत..


६. शिवाजी महाराजांनी विधीयुक्त राज्याभिषेक न केल्यामुळे मुघल, आदिलशहा व कुतूबशहा हे राज्यकर्ते शिवाजी महाराजांना खरे राज्यकर्ते मानत नसत. वरील सत्ताधीश शिवाजी महाराजांशी बरोबरीच्या नात्याने तह किंवा मैत्री करत नसत. त्यांची मानसीकता शिवाजी महाराज हे बंडखोर सरदार आहेत अशीच होती. आग्रा भेटिच्या वेळी मुघल दरबारात औरंगजेबाने दिलेली दुय्यम वागणूक ही याच मानसीकतेचा भाग होती. १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी गोवळकोंडयाचा नवा सुलतान अबुल हसनशी तह केला. पण अबुल हसनच्या दृष्टीकोनातून शिवाजी महाराज स्वतंत्र राज्यकर्ते नव्हते.


७. स्वराज्यातील सामान्य लोकांना शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करावा असेच वाटत होते. शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या स्वराज्याला कायदेशीर अधिकार मिळावा असे सामान्य जनतेलाही वाटत होते. मुस्लीम सत्ताधीशांना प्रतिकार करून हिंदूचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात यावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती.


८. विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर बहुतांश भारत मुस्लीम सत्ताधीशांच्या वर्चस्वाखाली होता... या सत्ताधीशांकडून राजसत्तेचा उपयोग करून भारतात मुस्लीम धर्माचा प्रचार व प्रसार केला जात होता. या सत्ताधीशांच्या या धोरणास हिंदूचे स्वतंत्र राज्य स्थापन करून जशास तसे उत्तर देणे गरजेचे होते. शिवाजी महाराजांच्या प्रयत्नातून हिंदूचे एक स्वतंत्र राज्य अस्तित्वात येणार होते. राज्याच्या माध्यमातून हिंदू धर्माचे, हिंदू जनतेचे संरक्षण व हित साधले जाणार होते. या


९. परशुरामने पृथ्वीतलावरील क्षत्रीयांचा एकवीस वेळा नाश केल्यामुळे पृथ्वीतलावर क्षेत्रीय नाहीत असा समज तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजात रूढझाला होता. क्षत्रियांनाच राज्याभिषेक करता येतो असे म्हटले जात होते. समाजात पसरलेला हा गैरसमज राज्याभिषेक करून शिवाजी महाराजांना दूर करायचा होता. आपण शिसोदिया वंशातील रजपूत आहोत हे सिध्द करण्यासाठी शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी, केशवभट पुरोहित, भालचंद्रभट यांना उत्तरेत पाठवले. उत्तरेत जाऊन त्यांनी जयपूरच्या राजघराण्यातून मिळवलेल्या शिसोदिया कुळाच्या वंशावळीनुसार शिवाजी महाराज शिसोदिया वंशातील आहेत हे त्यांनी स्पष्ट केले.

शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक का करून घेतला हे स्पष्ट करताना गो. स. सरदेसाई म्हणतात, "शिवाजीने स्वराज्याचा उपक्रम सन १६४४ त सुरू केला. तीस वर्षांच्या उद्योगाने मराठयांचे स्वतंत्र राज्य निर्माण होऊन त्याचा वचक खुद्द महाराष्ट्रावर व बाहेरच्या सत्ताधीशांवर बसला. तेव्हा या उद्योगास नीतीचे व कायद्याचे कायम स्वरूप देऊन सर्व जनतेच्या ठिकाणी या नूतन राज्याची जाणीव उत्पन्न करण्यासाठी शिवाजीने आपणास यथाविधी राज्याभिषेक करवून घेण्याचा संकल्प ठरविला. "

शिवराज्याभिषेकापूर्वी हालचाली - Movements before the coronation of Shiva

राज्याभिषेक करून घेण्याचे निश्चित झाल्यानंतरही शिवाजी महाराजांच्या राजकीय हालचाली चालूच होत्या. त्यांनी आपल्या राजकीय हालचालीमध्ये कसलाही खंड पडू दिला नव्हता. राज्याभिषेकाची मोठी तयारी रायगडावर सुरू असता दोन दुर्दैवी घटना घडल्या. पहिली दुर्दैवी घटना म्हणजे शिवाजी महाराजांचे सरनोबत प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी नेसरीच्या लढाईत मारला गेला. दुसरी दुर्दैवी घटना म्हणजे शिवाजी महाराजांची पत्नी काशीबाई या १६ मार्च १६७४ रोजी रायगडावर मरण पावल्या. या दुःखद घटनामुळे शिवाजी महाराजांना दुःख होणे स्वाभाविक होते. पण राज्याभिषेक विधी चातुर्मासापूर्वी ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६ या मुहूर्तावर करण्याचे ठरवण्यात आले होते. एप्रिल १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या चिपळून येथील लष्करी तळाची पहाणी केली. हंबीरराव मोहिते यांची मराठयांच्या सरनोबत पदावर नियुक्ती केली. २४ एप्रिल १६७४ रोजी शिवाजी महाराजांनी केळजाकोट जिंकून मोठा विजय मिळवला. मे १६७४ मध्ये त्यांनी चिपळूनच्या लष्करी तळास पुन्हा भेट दिली व तेथून रायगडास आले. आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी शिवाजी महाराज १९ मे १६७४ रोजी रायगडावरून प्रतापगडास आले. देवीचे दर्शन घेऊन देवीला सव्वा मण वजनाचे सोन्याचे छत विधीपूर्वक अर्पण केले. २९ मे १६७४ रोजी शिवाजी महाराजांचे मौजीबंधन (उपनयनविधी) झाले. याच दिवशी प्रायश्चित्त विधी म्हणून तुलादानविधी करण्यात आला.


शिवराज्याभिषेक सोहळा - Coronation ceremony of Shiva

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पुरोगामी विचारसरणीचा विद्वान पंडित गागाभट्ट याच्याकडून करण्याचे निश्चित झाले होते. शिवराज्याभिषेक घटनाक्रम खालील प्रमाणे आहे.

३० मे १६७४ : (शनिवार) - शिवाजी महाराजांचे मौजीबंधन झाल्यामुळे शास्त्रानुसार राण्यांशी पुन्हा विवाह होणे आवश्यक होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी समंत्रक विवाह केले. या विवाहामुळे राजा म्हणून शिवाजी महाराज आणि पट्टराणी म्हणून सोयराबाई यांना राज्याभिषेकासाठी लागणारे हक्क शास्त्रानुसार प्राप्त झाले. वा. सी. बेन्द्रे म्हणतात, "लग्नविधी समंत्रक झाल्याने वैदिक पध्दतीप्रमाणे राज्याभिषेकविधी सपत्नीक करण्यास शास्त्रानुसार मोकळीक झाली. "


३१ मे १६७४ : (रविवार) - रविवारी ऐन्द्रीशांतीच्या कार्यास प्रारंभ झाला. अग्नीप्रतिष्ठा करण्यात आली. इंद्राणीची पूजा, चतुष्कभस्थापन, ऐशानयाग इ. विधी पार पाडण्यात आले. आचार्य आणि ऋत्विज यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली.


१ जून १६७४ (सोमवार) -  ग्रहयज्ञ व त्यानंतर नक्षत्रहोम हे विधी करण्यात आले.


२ जून १६७४ (मंगळवार) -  मंगळवार व नवमी राज्याभिषेकाच्या कार्यास निषिध्द असल्यामुळे या दिवशी कोणताही विधी करण्यात आला नाही..


३ जून १६७४ (बुधवार) -  नक्षत्रयज्ञ करण्यात आला.


४ जून १६७४ (गुरूवार) -  या दिवशी रात्री निर्ऋतियाग हा यज्ञ पार पडला. मांस, मत्स्य व मंदिरा यांची याप्रसंगी आहुती देण्यात आली. यागानंतर स्नान करून पुण्याहवाचन करण्यात आले. 


५ जून १६७४ (शुक्रवार)  -  हा दिवस राज्याभिषेक समारंभाचा सातवा आणि मुख्य दिवस होता. ब्राम्हणभोजन आणि ऐन्द्रीशांतीच्या मुख्य कार्यांची समाप्ती करण्यात आली. राज्याभिषेकाचा मुहूर्तं त्रयोदशीचा असल्यामुळे सायंकाळपासून पहाटेपर्यंत हा मंगलविधी सुरू होता.

 राज्याभिषेक समारंभ शुक्रवार दि. ५ जून रोजी सायंकाळपासून सुरूवात होऊन तो शनिवार दि. ६ जून रोजी सकाळी पूर्ण झाला.


शिवाजी महाराज सिंहासनावर बसले आणि स्वराज्याचे स्वप्न खन्या अर्थाने साकार झाले. रायगड किल्यांवरून तोफांची सलामी देण्यात आली. मंगलवाद्यांच्या जल्लोषामुळे स्वराज्यातील वातावरण मंगलमय झाले. राज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर रायगड किल्याबरोबरच संपूर्ण स्वराज्यात आनंदाचे उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. राज्याभिषेकाचे वर्णन करताना सभासद म्हणतो, "सर्वास नमन करून (महाराज) अभिषेकास सुवर्णचौकीवर बसले. अष्टप्रधान व थोर थोर ब्राम्हणांनी स्थळीस्थळीची उदके करून सुवर्णकलशपात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार घेऊन, सर्व पूज्य मंडळीस नमस्कार करून सिंहासनावर बसले कित्येक नवरत्नादिक सुवर्णकमळे व नाना सुवर्णफुले, वस्त्रे उघड दिधली दानपध्दतीप्रमाणे षोडश महादाने इत्यादिक दाने केली. सिंहासनास अष्ट खांब जडित केले. त्या स्थानी  अष्टप्रधान यांनी उभे राहावे. पूर्वी कृतायुग, त्रेतायुग, द्वापारी कलयुगाचे ठायी पुण्यश्लोक राजे सिंहासनी बैसले" शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन सभासद बखरीप्रमाणेच चिटणीस बखर व हेन्री ऑक्डिांडेनच्या रोजनिशीमध्येही केले आहे.

शिवराज्याभिषेकाचे महत्व - Significance of Shiva Rajabhisheka

मध्ययुगीन महाराष्ट्राच्याच नव्हे तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकडे पाहिले जाते. 

" ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून एका स्वतंत्र व सार्वभौम हिंदू राज्याची स्थापना केली. शिवराज्याभिषेकाचे महत्व स्पष्ट करताना वा. सी. बेन्द्रे म्हणतात, "शिवाजी महाराजांच्या ज्या संघटनात्मक कार्यामुळे महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक व पारमार्थिक संस्कृतिची मूल्ये खोलवर रूजली गेली, याच महाराष्ट्राच्या हत्पटलावर राज्यसंस्थेच्या उत्कान्त, संस्कृतिचे प्रतिबिंब चिरंजीव करण्याचे कार्य या शिवराज्याभिषेकविधीत आहे. कारण त्या घटनेने राज्यव्यवहारात अखिल समाजाला समानतेच्या पातळीवर आणले व धार्मिक व्यावहारिक पारतंत्र्याला आळा घालण्याचे एक तंत्र निर्माण झाले... राज्याभिषेकाचे महत्व सांगताना सेतुमाधराव पगडी म्हणतात, "परकी आणि असहिष्णू सत्तेविरूध्द भारतीय जनतेचा क्षोभ उसळून आला. त्याचे प्रतिक म्हणजे एतद्देशीय अशा स्वतंत्र राज्याची स्थापना हे होय... घटनेने भारतीय अस्मिता जागृत झाली आणि अठराव्या शतकात मोगल साम्राज्य कोसळून पडले. " या


१. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून मराठयांचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य स्थापन केल्यामुळे चारशे वर्षापेक्षा अधिक काळ गुलामगिरीत खीतपत पडलेल्या भारतीय मनोवृत्तीला विलक्षण चेतना मिळाली. 

२  मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षराने नमुद करण्याची है। हाती. शिवराज्याभिषेकामुळे एका नव्या युगाची सुरूवात झाली. मुस्लीम राजवटीच्या वर्चस्वाखाली सर्वस्व हरवून बसलेल्या समाजामध्ये स्वातंत्र्याची स्वाभिमानाची व पराक्रमाची भावना निर्माण करण्याचे कार्य राज्याभिषेकाने केले.


३. शिवराज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या राजपदाला कायद्याची मान्यता मिळाली.  १६४५ पासून सुरू केलेले स्वराज्य स्थापनेचे कार्य खन्या अर्थाने सार्थकी लागले. 


४. राज्याभिषेकामुळे हिंदूना स्वतंत्र राजा मिळाला. त्यांच्यामधील न्यूनगंडाची भावना नाहिशी झाली. मुस्लीम राजवटींशी संघर्ष करून मराठे स्वतंत्र राज्य स्थापन करू शकतात हे शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तत्वातून दाखवून दिले.


५. पृथ्वीवर कोणीही क्षत्रिय नाही त्यामुळे कोणी राजा बनू शकत नाही या विचाराला खन्या अर्थाने मुठमाती मिळाली.


६. राज्याभिषेकामुळे विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर शिवाजी महाराजांच्या माध्यमातून हिंदूंना स्वतंत्र राजा मिळाला. मराठ्यांच्या पराभूत मनोवृत्तीला राज्याभिषेकामुळे नवसंजीवनी प्राप्त झाली. वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या गुलामगिरीच्या शृंखला राज्याभिषेकामुळे गळून पडल्या. 


७. राज्याभिषेकामुळे न्यायदानाच्या संदर्भातील शिवाजी महाराजांची अडचण दूर झाली.. राज्याभिषेकामुळे ब्राम्हण गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा अधिकार शिवाजी महाराजांना मिळाला.


८. संस्कृत भाषेचा सर्वत्र वापर करण्यावर भर देऊन फारशी भाषेचे महत्व कमी झाले.. राज्याभिषेकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी सहयाद्रीच्या कुशीत लावलेले स्वराज्याचे रोपटे पहाता पहाता भारताच्या बहुतांश भागात पसरत गेले.


शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक


२४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केला. पहिला राज्याभिषेक गागाभट्ट याने वैदिक पध्दतीने केला होता तर दुसरा राज्याभिषेक निश्चलपुरी याने तांत्रिक पध्दतीने केला. शिवाजी महाराजांच्या दुसच्या राज्याभिषेकाची माहिती श्रीशिवराज्याभिषेककल्पतरू' या ग्रंथातून मिळते. स्वराज्यातील काहीजणांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसण करण्यासाठी त्यांनी दुसरा राज्याभिषेक केला असावा. गागाभट्टाने वैदिक पध्दतीने केलेल्या राज्याभिषेकात काही त्रुटी राहिल्या आहेत असे निश्चलपुरीने सांगीतले होते. 

दुसरा राज्याभिषेकास प्रामुख्याने पुढीलप्रमाणे कारणे कारणीभूत ठरली.


१. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहून सर्वात अधिक समाधान जिजाबाईंना झाले होते. पण राज्याभिषेक सोहळयानंतर अवघ्या १२ व्या दिवशी १७ जून १६७४ रोजी जिजाबाईंचे निधन झाले. संभाजी राजेंच्या गळयातील मोतीहारातील दोन मोती गहाळ झाले. प्रतापगडावरील घोडयाची पागा जळाली. या सर्व अशुभ घटनांचा संबंध निश्चलपुरीने गागाभट्टाने केलेल्या पहिल्या राज्याभिषेकातील त्रुटींशी जोडला.


२. शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक गागाभट्टाने वैदिक पध्दतीने केला होता. वैदिक पध्दतीस निश्चलपुरीचा विरोध होता. निश्चलपुरीचा तांत्रिक पध्दतीवर विश्वास होता. गागाभट्टाने केलेल्या वैदिक पध्दतीच्या राज्याभिषेकावेळी गृहदेवता, ग्रामदेवता, मंडपदेवता, स्थानदेवता, स्तंभदेवता या देवतांचे पूजन झाले नाही असे निश्चलपुरीने सांगितले.


३. पहिल्या राज्याभिषेकाच्या वेळेस गागाभट्ट व त्यांच्या अनुयायांना शिवाजी महाराजांनी मोठया प्रमाणात दक्षिणा दिल्या होत्या. त्याचबरोबर तांत्रिक पध्दतीकडे पहिल्या राज्याभिषेकात दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे निश्चलपुरी व त्याचे अनुयायी अस्वस्थ झाले होते..


४. पहिल्या राज्याभिषेकाच्या नंतर जे अपशकून झाले होते त्याचा संबंध निश्चलपुरीने पहिल्या राज्याभिषेकातील त्रुटींशी जोडला होता. त्यामुळे सामान्य जनताही शंकाकूल झाली होती.

वरील कारणांमुळे शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केला. दुसरा राज्याभिषेकाच्या संदर्भात वा. सी. बेन्द्रे म्हणतात, "या विधीस महाराजांनी केवळ पूरक विधी म्हणून मान्यता दिली असावी." दुसरा राज्याभिषेक एका दिवसात पूर्ण करण्यात आला.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad