Type Here to Get Search Results !

शिवराज्याभिषेक दिन सोहळा अष्टप्रधान मंडळ संपूर्ण माहिती मराठी | Shiv Rajyabhishek Day Ceremony Ashtapradhan Mandal Full Information Marathi

शिवराज्याभिषेक दिन सोहळा अष्टप्रधान मंडळ  संपूर्ण माहिती मराठी| Shiv Rajyabhishek Day Ceremony Ashtapradhan Mandal Full Information Marathi


नमस्कार आज आपण शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करताना नियुक्त  केलेल्या अष्टप्रधान मंडळा ची माहिती थोडक्यात पाहणार आहोत. 

शिवराज्याभिषेक दिन सोहळा - अष्टप्रधान मंडळ (toc)
अष्टप्रधान मंडळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या केंद्रिय प्रशासनातील महत्वाचे अंग होते. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात आल्यानंतर वेळोवेळी व गरजेनुसार मंत्र्यांच्या नेमणुका त्यांनी केल्या. राज्याभिषेकाचे वेळी राजांचे परिपूर्ण असे अष्टप्रधान मंडळ अस्तित्वात आले. राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्या कार्यकक्षाही निश्चितः करण्यात आल्या अष्टप्रधान मंडळ हे प्राचीन हिंदु ग्रंथ म्हणजे शुल्कनीतीसार, स्मृति-परंपरा तसेच प्रचलित बहामनी राजवटीतील व्यवस्थचा आधार घेऊन तयार केले होते. अष्टप्रधानांच्या नेमणूका करताना जी प्रचलित फारसी नावे होती ती मात्र बदलून संस्कृत नावे पदांसाठी निश्चित केली छत्रपतींना प्रशासनात मदत करणाच्या या अष्टप्रधानांची नावे राज्याभिषेकाच्या वेळी पुढीलप्रमाणे होती.


शिवराज्याभिषेक दिन सोहळा अष्टप्रधान मंडळ
शिवराज्याभिषेक दिन सोहळा अष्टप्रधान मंडळ 

 शिवराज्याभिषेक दिन सोहळा - अष्टप्रधानांची नावे 

१) मुख्य प्रधान (पेशवा) - मोरोपंत पिंगळे

२) अमात्य ( मुजुमदार) - नारो निळकंठ, रामचंद्र निळकंठ

३) सेनापती (सुरलष्कर ) -  हंबीरराव मोहिते

४) सचिव (सुरनिस ) अण्णाजी दत्तो

५) मंत्री ( वाकनीस ) - दत्ताजी त्रिंबक

६) पंडितराव ( दानाध्यक्ष ) - रघुनाथपंथ

 ७) सुमंत (डबीर) -  रामचंद्र त्रिंबक

८) न्यायाधीश ( न्यायाधिश ) निराजी रावजी

अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांच्या जबाबदा-या पुढीलप्रमाणे :


१) मुख्य प्रधान (पेशवा)

सर्व राजपत्रांवर शिक्का करणे शत्रुसोबत सेना घेऊन युध्द करणे. शत्रूचा पराभव करून नवीन प्रदेश मिळविणे. संपादन केलेल्या प्रदेशाचा बंदोबस्त ठेवणे राजाची व राज्याची निस्वार्थपणे सेवा करणे. मुख्य प्रधान या नात्याने इतर प्रधानांना सांभाळून घेणे ही पेशव्यांची कामे होती. मुख्य प्रधानाला वर्षांला १५,००० होन दिले जात होते.
 २) अमात्य (मुजुमदार) :
राज्याच्या सर्व आर्थिक बाबिकडे लक्ष पुरविणे. राज्याचा जमा खर्च ठेवणे, दम्दार व फडणीस यांच्याकडून आर्थिक हिशेबाचे कामकाज करवून घेणे. इतर महत्त्वाची हिशेब पत्रके, राजांची आज्ञापत्रे यावर संमत अशी मुद्रा करणे. प्रसंगानुरूप युध्दावर जाणे अशा जबाबदान्या अमात्यांवर होत्या. अमात्यांचे काम हे अत्यंत जोखमीचे व प्रामाणिक पणाचे होते. अमात्याला वर्षाला १२,००० होन इतका पगार होता. 

३) सेनापती (सरलष्कर)
सेनापतीने लष्कर म्हणून लष्कराची सर्व देखरेख करणे, लष्करावर नियंत्रण ठेवणे, स्वराज्याचे संरक्षण करणे, लष्कराच्या पगाराची व्यवस्था पाहणे, सैन्यातील कर्तबगार व पराक्रमी सैनिकांचा यथोचित गौरव करणे नवीन प्रदेश जिंकून घेणे, युध्दातील लुटीचा हिशोब देणे, अशी लष्कराच्या संदर्भातील सर्व कामे. सेनापतीकडे होती. सेनापतीला १०,००० होन इतका वर्षाला पगार होता.

४) सचिव (सुरनिस) - छत्रपतींचा व एकूणच राज्याचा पत्रव्यवहार सचिव पाहत असे. राजपत्रे स्वत: काळजीपूर्वक वाचणे व त्यातील मजकुर तपासून पाहणे हे मुख्य काम सचिवाचे होते. वेळप्रसंगावर युध्दावर जाणे, नवीन प्रदशांचा कारभार पाहणे. ही इतर कामेसुध्दा सचिवाकडे होती. सचिव राजपत्रावर संमत असे चिन्ह करीत असे. सरकारी दप्तरांची नीट शिस्तीने व्यवस्था ठेवण्याचे काम सचिवाचे होते. सचिवाच्या मदतीला अनेक कारकून  होते. त्याच्या शिक्क्याशिवाय कोणताही पत्रव्यवहार होत नव्हता. सचिवाला वर्षाला १०,००० होन इतका पगार होता.

५) मंत्री (वाकनीस)

मंत्री म्हणजे जणू काही राजांचा खाजगी चिटणीस होता. राज्याच्या अनेक जबाबदान्या मंत्र्याला सांभाळाव्या लागत होत्या. यात राजनैतिक, दैनंदिन घडामोडी पाहुण्यांचे स्वागत हेर व्यवस्थेवर देखरेख करणे, छत्रपतींची दैनंदिन व्यवस्था पाहणे यामध्ये छत्रपतींच्या भोजनाचीही व्यवस्था पाहणे इ. समावेश होता. वाकनीसाच्या मदतीला हेरखात्यातील गुप्तहेर होते. राजांचा पत्रव्यवहार, त्यांना भेटायला येणाच्या लोकावर ते नजर ठेवत असत. मंत्र्यालाही वर्षाला १०,००० होन इतका पगार होता..
 
६) पंडितराव (दानाध्यक्ष)

पंडितरावाकडे धर्माधिकार होता. धार्मिक बाबतीत निर्णय देण्याचे काम पंडितरावांकडे होते. राज्यातील सर्व धार्मिक कृत्ये करणे, विद्वानांची संभावना करणे, दानपत्र, अनुष्ठान करणे, रूढी परंपरा, आचार व्यवहार याबाबतच्या राजपत्रांवर संमत चिन्ह करण्याचे काम पंडितरावाकडे होते. छत्रपतींनी स्वतः करावयाचे दानधर्म, शांती, अनुष्ठान यांचे आयोजन करणे अशी जबाबदारी पंडितरावांकडे होती.

 ७) सुमंत (डबीर) :

सुमंत म्हणजे परराष्ट्र मंत्री होता. त्याच्याकडे परराष्ट्रव्यवहाराची कामे पाहणे, परराज्याशी पत्रव्यवहार ठेवणे, परराज्यातून आलेल्या व्यक्तींचे स्वागत करणे व त्यांची व्यवस्था पाहणे, परराज्यांची सर्व माहिती मिळवून ती छत्रपतींना सादर करणे, परराज्यांशी संबंध प्रस्थापित करणे व परराज्यात आपल्या राज्याचा दर्जा व प्रतिष्ठा वाढविणे अशा जबाबदा-या सुमंतांवर होत्या. वेळप्रसंगी सैन्याचे नेतृत्व करून त्याला युध्दावरही जावे लागत होते. वर्षांला १०००० होन पगार होता. 

८) न्यायाधीश

राज्यातील न्यायनिवाडयाचे काम पाहण्याची महत्त्वाची जबाबदारी न्यायाधिशा 87/180 आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या खटल्यातील न्यायदानाचे कामकाज व्यवस्थित चालले आहे का नाही हे पाहण्याचे काम न्यायाधिश करीत असत. गोतसभेने किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेला न्यायनिवाडा मान्य नसल्यास रयतेला राजदरबारी अर्ज करता येत असे अशा वेळी अशा खटल्यांचा निवाडा करण्याची जबाबदारी न्यायाधीशाची होती. जमिनींचे हक्क ग्रामाध्यक्षांचे हक्क इत्यादी न्यायनिवाडे न्यायाधीशाच्या सहीने होत होते. राज्यातील न्याय न्यायनिवाड्यांच्या न्याय अन्यायांच्या बाबी तपासून पाहणे, त्याचे निवेदन छत्रपतींना करणे ही कामे न्यायाधिशाही होती. वर्षाला १०००० होन पगार होता. 

प्रत्येक प्रधानाला त्याचे कामकाज योग्य रितीने पार पाडण्यासाठी आठ कारकून दिले होते. ते पुढीलप्रमाणे होते.


 १) दिवाण 

२) मुजूमदार -  हिशेब तपासणीस

 ३) फडणीस  - महसूलाचा हिशेब ठेवणारा

 ४) सबणीस दप्तरदार - 

५) कारखानीस - पुरवठा अधिकारी,

 ६) चिटणीस, 

७) जामदार - खजिनदार,

 ८) पोतनीस -  नाणेतज्ञ.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad