दहावी नंतर काय करावे | दहावी नंतर चे कोर्स | दहावी नंतर करियर ची संधी | What to do after 10th | Courses after 10th Career opportunity after 10th
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आतुरता आहे ती
दहावीचा निकालाची हा निकाल कधी लागतो याची सर्व विद्यार्थी पालक वाट पाहत आहेत . दहावी निकाल लागला की पालक विद्यार्थी यांच्या पुढे प्रश्न ? येतो की दहावी नंतर काय करावे ? दहावी नंतर चे कोर्स दहावी नंतर करियर ची संधी (What to do after 10th Courses after 10th Career opportunity after 10th ) कोण कोण ती असेल .त्या संधी मला स्वप्न पूर्ण होणार का असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडतात . याच प्रश्नांची थोडक्यात उत्तरे देणारा हा लेख आहे.
|
दहावी नंतर काय करावे दहावी नंतर चे कोर्स दहावी नंतर करियर ची संधी |
दहावी नंतर काय करावे (toc)
विद्यार्थी मित्रांनो शालेय शिक्षण हे जीवनाला शिस्त आणि वळण लावणारे असते. शालेय जीवनात शिक्षक प्रत्येक मुलाला घडवण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करत असतात. हा विद्यार्थी परिपूर्ण झाला की दहावी ची परीक्षा देऊन पक्ष्या सारखा या बाहेरच्या जगामध्ये मनात स्वप्न घेऊन मुक्त संचार करायला निघून जातो. पण नक्की कुठे जावे ? स्वप्न पूर्ण कसे करावे ? या मध्ये गोंधळून जातो.
दहावी बारावी पास झाले की आपली मन स्थिती असेच होती नक्की काय करावे ? दहावी नंतर कोणता कोर्स करावा ? दहावी नंतर करीयर काय ? या विषयी चर्चा तुम्ही घरी व मित्रांसोबत करत असता. आई बाबा चे स्वप्न असते की आपण जो कोर्स सांगेल तो मुलाने करावा मुलाला कोणता वेगळा कोर्स करावयाचा असतो. आई बाबांनी मुलाला ज्या क्षेत्रात आवड आहे ते क्षेत्र निवडण्यास मुलाला मदत करावी म्हणजे मुलगा आवडीने त्या क्षेत्रात पुढे ही जाईल आणि करियर करेल.
दहावी नंतर चे कोर्स Courses after 10th
दहावी पास झाले की प्रत्येकाला वाटते की आपण अकरावी प्रवेश कॉलेज ला जावे .कारण कॉलेज विश्व शालेय जीवणापेक्षा खूप वेगळे असते ना पार्थना , प्रतिज्ञा , आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉलेज ला जाताना तुम्हाला युनिफॉर्म घालावा लागत नाही तुम्ही तुमच्या इच्छे प्रमाणे कपडे परिधान करू शकता थोडक्यात काय तर कॉलेज ला तुम्ही तुमच्या मना प्रमाणे वागत असता.
कॉलेज ला प्रवेश घायचा आहे म्हणजे काय करावे ? कोणती शाखा निवडावी हा प्रश्न तुम्हाला पडतो .
कॉलेज शाखांविषयी माहिती घेऊया
या मध्ये तीन शाखा असतात तसेच इतर ही डिप्लोमा व कोर्सेस
1) कला
2) वाणिज्य
3) विज्ञान
4) डिप्लोमा कोर्सेस
5) आय टी आय :
या तीन शाखेतील कोणती शाखा निवडावी हा ही प्रश्न मनात निर्माण होतो?
कला शाखा : कला शाखेतून खूप मार्ग निवडतात येतात.या शाखेची ओळख करून घेतली पाहिजे या मधून सुद्धा तुम्ही तुमचे करियर करू शकता टाईमपास म्हणून ही शाखा निवडू नका.
या शाखेमधून तुम्ही समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास , असे अनेक विषयात पदवी घेऊ शकता .
अनिमेशन, अभिनय किंवा इतर कुठल्याही क्रिएटीव्ह क्षेत्रात पदवी घेऊन असंख्य मार्ग तुमच्या पुढे उपलब्ध होतात. या साठी तुम्हाला परिश्रम करावे लागणार.
वाणिज्य :
वाणिज्य शाखा या मध्ये आर्थिक व्यवहारांशी संबंधित संपूर्ण अभ्यासक्रम आहे .त्यामुळे येथे काटेकोरपणा आणि अचूकतेला खूप महत्त्व असते.या मध्ये तुम्ही पदवी नंतर CA ची परीक्षा देऊ शकता.
संधी : बँक क्षेत्रात करियर करण्यासाठी .
विज्ञान : जास्तीत जास्त पालकांची इच्छा असते की आपल्या मुलाने विज्ञान शाखे ची निवड करावी . कारण यानंतर मार्ग भरपूर आहेत जसे की डॉक्टर, इंजिनियर . यासाठी मार्क्स तसे पाहिजेत .
पण या मध्ये तुमची ईछ्या ,आवड असणे गरजेचे आहे. पालक म्हणतात म्हणून करायचे असे करू नका.
अति महत्वाचे सर्व प्रथम तुम्हाला कश्या मध्ये आवड आहे , कश्या मध्ये करियर करायचे आहे या बाबत आई वडील यांच्या बरोबर चर्चा करा व नंतर मार्ग निवडा.
डिप्लोमा कोर्सेस :
डिप्लोमा कोर्सेस मध्ये : कृषी , इंजिनिअर , कॉम्पुटर,सिरॅमिक ,इलेक्ट्रॉनिक व कॅमुनिकेशन अजून अनेक कोर्सेस आहेत .
फॅशन डिजाइनिंग कोर्सेस :
हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. या मध्ये तुम्ही तुमचे करियर करू शकता फॅशन ची आवड असेल तर .
या मध्ये डिओलॉम इन फॅशन टेकनॉलॉजि , फूट वेअर, लेदर डिझाइन .असे अनेक विविध कोर्सेस करु शकता.
आय टी आय :
आयटीआय म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था होय . या मध्ये विविध व्यवसाय चे प्रशिक्षण दिले जाते . विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासावर आयटीआय व्यवसाय आणि अभ्यासक्रम आहे.
आय टी आय - डिझेल मेकॅनिकल , ट्रॅक्टर ,फिटिंग ,वेल्डिंग असे अजून वेगवेगळे आय टी आय प्रकार आहेत ते तुम्ही करू शकता.
प्रोग्रामिंग भाषा कोर्सेस :
या मध्ये ग्रोफिक डिझाइन,क्रिएटिव्ह डायरेक्टर ,Ms ऑफिस ,
C++ . असे अनेक कोर्स तुम्ही करू शकता.
शाखा निवडताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात .
१)आवड व ईच्छा :
तुम्ही जी शाखा निवडणार आहे या मध्ये तुम्हाला आयुष्य भर काम करावे लागणार आहे हे काम आपण इतक्या मोठ्या कालावधीसाठी करू शकणार आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण आपल्या ज्या मध्ये आवड असते त्या मध्ये काम करायला आपल्याला कंटाळा येते नाही. यासाठी तुम्हाला जो विषय आवडतो तो निवडा
२) व्यक्तिमत्व अभ्यास : आपल्यात काय कौशल्ये आहेत हे जाणून घेणे.
३) अनुभवी लोकांशी चर्चा :ज्या विषयात आपल्याला आवड आहे .त्या मध्ये कोणी पहिले करियर केलेलले अश्या लोकांशी चर्चा करणे.
४) क्षमता : तुम्ही तुमच्या करियर चा निर्णय घेतला पाहिजे . बाकी लोकांवर अवलंबून राहू नका. तुमच्या करियर चा निर्णय तुम्ही घ्या या मधून तुमची निर्णय क्षमता दिसते.