राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण NAS(SEAS)२०२३ PARAKH Exam प्रश्नपत्रिका pdf |State Educational Achievement Survey NAS(SEAS)2023 PARAKH Exam Question Paper pdf|
दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS)२०२३ PARAKH राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी मध्ये इयत्ता ३री, ६ वी व ९ वी मधील विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्र. ५ व ६ अन्वये राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी सदर उपक्रमाचे वेळापत्रक व कार्यवाहीबाबतच्या सूचना या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार संदर्भ क्र. ५ अन्वये राज्यातील काही निवडक शाळांमध्ये इयत्ता ३री. ६ वी. ९ वी मधील विद्यार्थ्याकारीता आहे.
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS)२०२३(toc)
अ) इ.३ री पायाभूत साक्षरता संख्याज्ञान यावर आधारित
आ) इ. ६ वी - भाषा, गणित, EVS (विज्ञान), -
इ) इ. ९ वी भाषा, गणित
या विषयांकरिता सर्वेक्षण होणार आहे असे कळविण्यात आले होते.तथापि संदर्भ क्र. ६ अन्वये विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय सर्वेक्षणातून वगळण्यात आलेले आहेत. फक्त भाषा व गणित या विषयांच्या अनुषंगाने सर्वे घेण्यात येणार आहे.
तसेच सदर सर्वेक्षणाची यशस्वी अंमलबजावणी होणेकरिता जिल्हास्तरावर जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. सर्वेक्षण कालावधीच्या १५ दिवस अगोदर
SCERT. पुणे येथे संदर्भ क्र. ४ अन्वये नियंत्रण कक्ष स्थापन करणेबाबत सूचित केले आहे. या अनुषंगाने आपली नियंत्रण कक्ष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. सर्वेक्षणाची यशस्वी अंमलबजावणी होणेकरीता राज्य स्तर व जिल्हास्तर यामध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.तसेच जिल्हा, तालुका स्तरावरून समन्वयकांच्या शंकांचे निरसन करणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य हेतू असून याबाबत कार्यवाही करण्याच्या दृष्टीकोणातून या कक्षाची स्थापना करण्यात येत आहे.
अध्ययन निष्पत्तीवर आधारित मूल्यांकन हे केवळ विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा स्तर आशयांवरून क्षमतांवर घेऊन जाणार नाही तर शिक्षकांना त्यांचे अध्ययन अध्यापन इच्छित मार्गाने वळवण्यात मदत करेल आणि इतर घटकांना विशेषतः पालक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, समाज, राज्यस्तरीय शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जबाबदार दक्ष राहण्याची हमी देईल. स्पष्ट निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्ती ह्या विविध लाभार्थ्यांना त्यांची जबाबदारी आणि उत्तरदायित्व याविषयीची हमी देण्याकरिता मार्गदर्शक म्हणून मदत करतील.
राष्ट्रीय संपादणूक चाचणी सर्वेक्षण म्हणजे काय ?What is National Achievement Test Survey?
भारत सरकार दर तीन वर्षांच्या अंतराने इयत्ता ३ री ६ वी, ९वी साठी नमुना आधारित राष्ट्रीय संपादणूक चाचणी (NAS) घेते..
NAS हे क्षमतेवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या प्रमाणावरील मूल्यांकन आहे, जे विद्यार्थ्याना अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत याची माहिती प्रदान करण्यासाठी आयोजित केले जाते..
राष्ट्रीय संपादणूक चाचणी सर्वेक्षण कशासाठी What is the National Achievement Test Survey for?
इयत्ता 3, ६ आणि ९वी च्या शेवटी विद्यार्थ्यांना कोणकोणत्या क्षमता प्राप्त झाल्या आहेत याची माहिती प्रदान करते.
शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मूल्यांकन, अध्यापनशास्त्रीय प्रक्रिया आणि अध्ययन
निष्पत्तींची संपादणूक समजून घेण्यासाठी संशोधक, शैक्षणिक नियोजक आणि धोरणनिर्मात्यांसाठी ही चाचणी उपयुक्त अशी माहिती पुरवते.
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण NAS(SEAS)२०२३ PARAKH Exam प्रश्नपत्रिका pdf
प्रश्नपत्रिका स्वरूप
State Educational Achievement Survey NAS(SEAS)2023 PARAKH Exam Question Paper pdf
प्रश्नपत्रिका
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी 2021 प्रश्न संच / प्रश्नपत्रिका
NAS सराव प्रश्न संच / प्रश्नपत्रिका DOWNLOAD करा.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण मुख्याध्यापक ,शिक्षक यांना सूचना या वर क्लीक करा .
सर्वेक्षणासाठी खालील माहिती मुख्याध्यापकांच्या हाताशी असणे अत्यंत आवश्यक आहे.
विद्यार्थी नोंदणी तक्ता
उपयुक्त व्हिडिओ NAS
🔅 NAS चे प्रश्न कसे असतात🔅