छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र व शिकवण मराठी हिंदी इंग्रजी Chhatrapati Shivaji Maharaj Life Biography and Teachings Essay Writing Marathi Hindi English Pdf
छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र व शिकवण मराठी हिंदी इंग्रजी
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी रयतेच्या रक्षणकर्त्याने जन्म घेतला आणि सह्याद्रीला जाग आली.म्हणून म्हणावे वाटते की
" *सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभूराजा; दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा..."*
त्यांनी शौर्याची मशाल पेटवली. त्यांच्या पराक्रमाची, निश्चयाची, निर्धाराची गाथा ऐकतच आपण सर्व मोठे झालो आहोत .
Chhatrapati Shivaji Maharaj Life Biography and Teachings Essay Writing Marathi Hindi English Pdf
*"निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी!"*एक महान भारतीय राजा, परकीयांशी संघर्ष करून जिद्दीने, मावळ्यांच्या साथीने ,हिंमतीने शून्यातून स्वतःचे राज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याच्या स्वराज्याचा भगवा रोवला.
**"भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही.
भगवा म्हणजे सह्याद्री, भगवा म्हणजे स्वराज्य, भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती होय."**
शिवाजीराजांच्या जन्मदिवशी 'शिवजयंती'ला शिवरायांचा जयघोष करणे सोपे आहे. त्याऐवजी शिवाजी महाराजांचे समाजाला जीवदान देणारे विचार, जे त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा होती. ती त्यांची शिकवण चरित्रातून जाणून घेऊन त्याचा रोजच्या आयुष्यात उपयोग करू.
लहानपणीच बालशिवाजीला युद्धाभ्यास, रणनीतीचे शिक्षण गुरुवर्य दादाजी कोंडदेवांकडून लाभले. शौर्याचा वारसा पिता शहाजींकडून आणि मातोश्री जिजाऊने शिवाजीच्या हृदयात स्वराज्य निर्माणाची ज्योत प्रज्वलित केली.
Chhatrapati Shivaji Maharaj Life Biography and Teachings Marathi Hindi English
शिकवणीत शिवाजीराजे म्हणतात...
१ 'सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरू, नंतर पालक, नंतर देव!' सर्वप्रथम स्वतःकडे न पाहता राष्ट्राकडे पाहा.
२. 'राज्य छोटं का असेना स्वतःच असावं. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व निर्माण कर, तरच जग तुमचा आदर करेल'. मित्रांनो! आयुष्यात कोणाच्या सावलीखाली उभे राहू नका. झगडल्याशिवाय स्वतःचे अस्तित्व निर्माण होत नाही आणि अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही. त्याचबरोबर स्वतःचे अस्तित्व अबाधित राखता आले पाहिजे.
३ 'शत्रूची फौज मोजण्यापेक्षा आपल्याजवळील फितूर किती ते मोजा.' संख्येला महत्त्व कधीच नसते (उदा. कौरवांचे सैन्य). पाय खेचणारे शत्रू (फितूर) नेहमी आपल्याजवळच असतात.
४ 'शत्रूला दुर्बल समजू नका. पण अधिक बलवान समजून घाबरूही नका' प्रत्येकाने स्वतःच्या क्षेत्रात काम करताना आजूबाजूच्यांना कमी लेखू नका, स्पर्धेत कोणीही पुढे जाऊ शकतो. न घाबरता काटशह देणे महत्त्वाचे असते. शिवाजी महाराजांची प्रत्येक लढाई प्रेरणादायी होती. कारण महाराजांच्या मावळ्यांची संख्या कमी आणि तुलनेने शत्रुपक्षाचे सैनिक व युद्धसामग्रीचे बळ नेहमीच प्रचंड असायचे.
५ "समोर संकट दिसले, तर लढायचं. मरण आले तरी चालेल, शत्रूला शरण जाणार नाही की, माघारी फिरायचे नाही" हे त्यांचे ब्रीद होते. त्याच्याच पुढे ते म्हणतात, "विजय त्याचाच होतो, जो विजयासाठी साहस करतो." शत्रूच्या छावणीत घुसून बोटे छाटणारे, वाघनखे घुसवणारे निर्भीड शिवराय आठवा. आयुष्यात लढा देताना प्रत्येक प्रसंगी 'मी जिंकणार' या भावनेतून खेळलात, तरच पुढे जाल.