Type Here to Get Search Results !

परीक्षा पे चर्चा २०२४ नोंदणी कशी करावी |Exam Pay Discussion 2024 How to Register

 परीक्षा पे चर्चा २०२४ नोंदणी कशी करावी Exam Pay Discussion 2024 How to Register 

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्याथी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबतचा अनोखा संवादात्मक कार्यक्रम "परीक्षा पे चर्चा" ची ७ वी आवृत्ती तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे टाऊन हॉल स्वरूपात होणार आहे. जानेवारी/फेब्रुवारी, २०२४. हा कार्यक्रम गेल्या सहा वर्षांपासून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालयाकडून यशस्वीपणे आयोजित केला जात आहे.
परीक्षा पे चर्चा २०२४(toc)

परीक्षा पे चर्चा २०२४ नोंदणी कशी करावी 

परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी आणि त्यांची निवड करण्यासाठी, १२डिसेंबरपासून https://innovateindia.mygov.in/ppc-२०२४/
येथे ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्पाँ आयोजित केली जात आहे. १२ डिसेंबर, २०२३ ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये इयत्ता ६ वी ते १२ वी वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी, शिक्षक आणि पालकांसाठी सहभाग घेण्याकरीता ऑनलाईन लिक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सहभागी विद्यार्थी, पालक व शिक्षक देखील प्रश्न विचारू शकतात. सर्व सहभागींना संचालक, NCERT यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळेल. सन २०२४ करीता सहभाग नोंदविण्याची प्रक्रीया अधिक सुलभ करण्यात आलेली आहे.

Exam Pay Discussion 2024 How to Register 


आपणास यापत्राद्वारे असे निर्देश देण्यात येत आहे की, आपल्या जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी मधील सर्व माध्यमाच्या व सर्व बोर्डाच्या शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थी प्रस्तुत उपक्रमामध्ये आपला सहभाग सुनिश्चित करतील याची आपण खात्री करावी, प्रस्तुत उपक्रम यशस्वी करणेकरीता खालील कार्यवाही आपल्यास्तरावरुन करण्यात यावी.

१. तालुका तसेच जिल्हा स्तरावरील सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत सर्व कर्मचा-यांना संबंधित क्षेत्रातील मोठ्या पटांच्या शाळांमधून परिक्षा पे चर्चा उपक्रमाकरीता नोंदणी करण्यासाठी शाळा नेमून देण्यात याव्यात.
 २. "परीक्षा पे चर्चा" या उपक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षकांबरोबर पालक देखील आपला सहभाग देऊ शकतात याकरीता, संबंधित शाळांनी पालकांशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पालकांना याकरीता आवाहन करावे, जेणेकरुन अधिकाधिक पालक सहभागी होऊ शकतील.

३ . नियमितपणे जिल्हास्तरावरुन दैनंदिन सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थी व शिक्षकांची माहिती संकलित करुन संचालनालयास सादर करावी.
४. "परीक्षा पे चर्चा" उपक्रमाची वर्तमानपत्र तसेच समाज माध्यमातून आवश्यक ती प्रसिध्दी करण्यात यावी.

५. शाळांनाही त्यांच्या संकेतस्थळावर "परीक्षा पे चर्चा" उपक्रमासंबंधित प्रसिध्दी देणेकरीता सुचना देण्यात याव्यात.

६. प्रस्तुत उपक्रमाकरीता नोडल अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे काम पाहतील.
 ७. क्षेत्रीय अधिका-यांची बैठक घेऊन "परीक्षा पे चर्चा" उपक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदविला जाईल, याकरीता आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
विद्यार्थ्यांच्या दृष्टिने प्रस्तुत उपक्रम अत्यंत महत्वाचा असल्याने, "परीक्षा पे चर्चा" या उपक्रमाबाबत आपण स्वतः लक्ष द्यावे व प्रस्तुत उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबविला जाईल, याची आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

परीक्षा पे चर्चा २०२४ नोंदणी कशी करावी .

परीक्षा पे चर्चा २०२४ नोंदणी कशी करावी यासाठी संपूर्ण माहिती खालील pdf मधे दिली आहे.दिलेल्या माहिती नुसार तुम्ही तुमच्या मुलांचे रजिस्ट्रेशन सहज करू शकता.⬇️

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad