रमाई जयंती संपूर्ण माहिती मराठी हिंदी इंग्रजी pdf Ramai Jayanti complete information Marathi Hindi English pdf
त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा .
त्यागमुर्ती माता रमाई जीवन परिचय Introduction to the life of Tyagamurthy Mata Ramai
दि. ७.५.१७९९ साली रमाबाईंचा जन्म झाला. रमाबाईंचे माहेरचे नाव 'रामीबाई', ती गरीब पण सच्छील घराण्यातील असून आपल्या वडिलांचीती आवडती होती. रमाबाईंचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आईचे नाव रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर) ते दापोली तालुक्यात 'वंणद' या गावचे रहवासी होते. दापोलीला मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. मुरूड-हर्णे बंदरावर मासळ्याच्या टोपल्या वाहण्याचे ते काम करीत होते. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशावर ते सहा माणसांचे कुटुंब चालवित असेत. रमाबाईंची आई सतत आजारी असे. त्यातच त्यांचा मृत्यु झाला.
त्यांचे कुटुंब म्हणजे मातृविहीन चार मुले. तीन मुली व एकमुलगा. सर्व मुलांमधे मुलगा लहान, पहिली मुलगी दाणोलीकरांना दिली होती. बाकीची तीन मुले रामीबाई, गौराबाई व शंकर .
पुढे काही दिवसांनी एक भयंकर घटना घडली. भिकूजी वलंगकर माश्यांच्या टोपल्या समुद्रापासून मार्केटपर्यंत धावत धावत आणण्याचे काम करीत असताना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यातच त्यांचा अंत झाला. रमाबाई व तिची सर्व भावंडे अक्षरशः उघड्यावर पडली. त्यांना कोणी सांभाळायचे हा प्रश्न उपस्थित झाला. मृत्यु समयी रामीबाई, गौराबाई व शंकर ही मुले अगदी लहान होती. ती चुलत्याने व मामाने मुंबईत नेली. चुलता व मामा भायखळा मार्केटजवळ असलेल्या चाळीत राहत असत. चुलता लाकडाच्या वखारीत लाकडे तोडण्याचा धंदा करीत असे. मामा गोविंदपूरकर हे ११६ व्या पलटणीचे पेन्शनर हवालदार होते व ते बी.पी.एस.सी. सोसायटीत कामाला होते. ही तीन मुले चुलत्याकडे राहत असत. रमाबाई लग्रात ९-१० वर्षाची होती. भिवा त्यावेळी इंग्रजी पाचवीत शिकत होता. गौराबाईचे लग्न गंगाराम येलमकर यांच्याशी झाले. चुलता व मामा वारल्यानंतर गौराबाई व शंकर हे सुभेदारांकडे राहावयास आली. अस्पृश्यांच्या चळवळीचे आद्यजनक गोपाळबुवा वलंगकर रमाबाईच्या घराकडून नाते संबंध असल्याने ते आंबेडकर घराण्याचे नातलग होते.
भिमराव - रमाबाईंचा विवाह
भिमराव व रमाबाईंचा विवाह दि. ४.४.१९०६ साली संपन्न झाला. विवाह स्थळ भायखळ्याचा बाजार ठरले. तेथील उघड्या छपरात एका कोपऱ्यात मुलीकडील वऱ्हाड जमले, दुसऱ्या कोपऱ्यात नवऱ्याकडील वन्हाडी जमले. पायाखालील गटारातून घाण पाणी वाहत होते. चबुतऱ्याचा उपयोग बाक म्हणून करण्यात आला. सर्व बाजाराचा विवाह स्थळ म्हणून उपयोग झाला. लग्रकार्य आनंदात आणि उत्साहात पार पाडले. सकाळी बाजारात कोकणी येण्यापूर्वी वऱ्हाड घरी परतले. रमाबाई स्वभावाने शांत आणि सुस्वभावी होत्या.
सुशील, नम्र व प्रेमळ रमाबाई
बाबासाहेब विलायतेतून दिनांक ०३/०४/१९२३ रोजी परत आले. तेव्हा त्यांच्या घरी दररोज कोणी ना कोणी जेवावयास असत. या सर्वांची योग्य ती बडदास्त त्या ठेवीत, त्यावेळी कोल्हापूरचे श्री. दत्तोबा संतराम पवार, पुण्याचे कदम बंधू वगैरे साहेबांचे मित्र नेहमी घरी येत असत. रमाबाई त्यांच्याशी दाराआड उभ्या राहून बोलत. साहेबांच्या कोणाही मित्रासमोर त्या येत नसत वा समोर बसून बोलत नसत. ज्या - त्या वेळी कोणास त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग येई. तेव्हा तेव्हा त्या दाराआडून बोलत. मग तो लहान असो वा मोठा! अशा बाळबोध व मराठमोळ्या वळणाच्या सुशील नम्र व प्रेमळ रमाबाई होत्या.
Ramai Jayanti complete information Marathi Hindi English pdf
कुटुंबाची काळजी
बाळारामाने मुलगी शोभणाऱ्या मुलीबरोबर विवाह करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, "हे बरोबर नाही. एखाद्या विधवेशी लग्न कर." यावरून वाद विकोपाला गेला, बाबसाहेबांनी 'घरातून' चालता हो.' असे सांगितले. तेव्हापासून बाळाराम नायगावला राहू लागले.
घरी काही मिष्टान्न केले तर रमाबाई बाळारामासाठी छोट्या डब्यात ते मिष्टान्न नायगावला पाठवीत. हा डबा घेऊन यशवंत व मुकुंद जात. मुलांना शेजारी बसवून बाळाराम त्यांच्यासह जेवण घेत. "माझी भावजय म्हणजे एक रत्न आहे." असे बाळाराम नेहमी म्हणत.
माता रमाई व बाबासाहेब आंबेडकर यांची मुले
रमाबाईंना तीन मुले व एक मुलगी होती. सर्वात मोठा यशवंत नंतर गंगाधर, इंदिरा, रमेश आणि राजरत्न.
गंगाधर आजारी होता. आर्थिक स्थितीमुळे त्याचे औषधपाणी व्यवस्थित झाले नाही. त्यातच गंगाधर याचा अंत झाला. त्यावेळची परिस्थिती तर खूपच हलाखीची होती. 'गंगाधर' यांचे अंतिम कार्य करायचे होते. लोक बाबासाहेबांकडे 'कफन' आणण्यासाठी पैसे मागायला आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितले. अंतिमतः रमाबाईंनी आपल्या स्वतःच्या अंगावरील साडीचा एक पदर फाडून दिला आणि मग सर्वजण गंगाधरला त्यामध्ये गुंडाळून स्मशानामध्ये घेऊन गेले व त्यास मूठमाती दिली. वैवाहिक जीवना सुरुवातीचा काळ अपत्यसुखास पोरकं होण्याचा प्रसंगास दोघा उभयताला पहिल्याता आला होता.
बाबासाहेबांना इंदिरा खूपच आवडत असे. परंतु दुदैवाने यशवंत यास सोझ इतर तीनही बालके दीड-दोन वर्षांची होऊन मरण पावली. ही बालके सुंदर, गोजिरवाणी, भाग्यवंत आणि वंशाला भूषणवत होती. ही तीन अपत्ये सन १९१३ ते १९२० या सात वर्षांच्या कालावधीत वारली. या घटनेमुळे बाबासाहेबांना भयंकर दुःख झाले. मुलीबद्दल त्यांना एवढे प्रेम होते की, त्यांना वाटे आपल्या नशिबात मुलगी नाही. निदान आपल्या मुलाला तरी मुलगी व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. बाबासाहेब सर्वांशी प्रेमाने वागत. बाबासाहेबांना संतती सौख्य मिळाले नाही.
'सिंहाचा मुलगा - राजरत्न' चा जन्म -
रविवार ता.१५/०५/१९२४ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रमाबाई प्रसूत झाल्या, त्यांना मुलगा झाला. सर्वांना आनंद झाला. साहेबांनी मुलाचे नाब राजरत्न ठेवले, राजरत्न रंगाने निमगोरा पण चेहऱ्यामोहऱ्यात थेट बाबासाहेबांसारखा होता. हातापायाचे पंजे व त्यांची बोटे ही जणू काही वडिलांच्या पंजाच्या वबोटांच्या छोट्या मुसा होत असत. नर्स मिळणे कठीण बाबासाहेबांना वाटत होते आपली तीन बालके आपल्याला सोडून गेलीत. आता 'राजरत्न'ची काळजी चांगली घ्यायची असे ठरविले. त्यासाठी एका नर्सची योजना केली. सिमेंटच्या चाळीत आणि महारांच्या कुटुंबात हिंदू नर्स येण्यास तयार होईना. पण एक ख्रिस्ती नर्स मिळाली. ती आठवड्यातून दोन वेळा रमाबाईंना व राजरत्नाला पाहत असे व योग्य ते औषधोपचार व टॉनिक देत असे.
'सिंहाचा बच्चा'
बाबासाहेब मुलांना खेळविताना, "तू सिंहाचा बच्चा आहेस. तू लढवय्यांचा वंशज आहेस, तू सम्राटाचा राजरत्न पुत्र आहेस. अन् तू पराक्रम केला पाहिजे." वगैरे शब्द बोलत ते मुलांना खेळवीत, हे सर्व पाहून रमाबाईंचा आनंद गगनात मावेना. रमाबाई राजरत्नाकडे एकटक सारखे पाहत बसत. राजरत्नाला थोडा जरी ताप आला तरी रमाबाई आसपासच्या कुटुंब-वत्सल बाया जे जे गावठी उपाय सुचवित ते ते त्या करीत असत. राजरत्न दीड-पावने दोन वर्षांचा होईपर्यंत रमाबाईंनी त्यांच्या दंडात व गळ्यात अनेक काळे दोरे व ताईत बांधलेले होते. रमाबाईच्या मानसिक समाधानासाठी साहेब हे सर्व प्रकार रमाबाईंना करू देत.
राजरत्नाचा शोक
अनेक त-हेचे इलाज करून देखील राजरत्नाला सन १९२६ च्या जुलै महिन्यात डबल निमोनिया झाला. साहेब, रमाबाई, लक्ष्मीबाई व शंकरराव रात्रभर जागरण करीत. दि. १९ जुलै १९२६ च्या दुपारी चार वाजता तो चिरनिद्रेत गेला. राजरत्नाचा अंत बाबासाहेबांच्या मांडीवर झाला, त्यांचा मृतदेह ते काही केल्या आपल्या मांडीवरून खाली ठेवीनात. त्यांची समजूत घालता-घालता त्यांचे आप्तमित्र मेटाकुटीस आले. तो मुलगा गेला नि त्यांचे संसारातील मन उडाले. ज्या खोलीत राजरत्नाचा अंत झाला, त्या खोलीकडे ते फिरकले सुद्धा नाहीत.
रमाबाई उघड्या जमिनीवर व्याकुळ व हताश अवस्थेत पडलेल्या दिसल्या. चाळारामला पाहून त्या स्फुंदत पडून राहिल्या. बाळाराम ही रडू लागले. बाळाराम रडत रडतच म्हणाले, "तू अशी हताश होऊन बसलीस तर हे घर कसे चालेल? तू दुःख गिळ व धीर धर. तुझे हे दुःख पाहून भीवाचा धीर खचून जाईल." अशा शब्दात रमाबाईंची समजूत बाळारामांनी घातली.