Type Here to Get Search Results !

11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२४ संपूर्ण माहिती पुस्तक pdf | 11th online admission process 2024 complete information book pdf

 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२४ संपूर्ण माहिती पुस्तक pdf | 11th online admission process 2024 complete information book pdf  


इयत्ता ११वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत परिपूर्ण माहिती देणारी ही माहितीपुस्तिका डिजीटल स्वरूपात आपल्या हाती सोपविताना आनंद होत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम पुणे शहर परिसरात इ. ११वीची प्रवेश प्रक्रिया सन १९९६-९७ पासून केंद्रीव पद्धतीने सुरू करण्यात आली. सन २००९-१० पासून मुंबई महानगर (MMR) क्षोशल इ. ११ वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले. त्यानंतर सन २०१४-१५ पासून मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात इ. ११वीचे प्रवेश केंद्रीव ऑनलाईन पद्धतीने सुरू केले.

सन २०१७-१८ पासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसोबतच नागपूर, अमरावती, नाशिक वा महानगरपालिका क्षेत्रातही इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. सन २०२४-२५ मध्ये मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे व पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक महानगरपालिका क्षेत्रांतील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत.

यापूर्वीच्या ऑफलाईन प्रवेश पद्धतीने विदयार्थ्यांना अर्ज भरणे व प्रवेशाबाबत इतर माहिती जाणून येण्यासाठी वारंवार संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अथवा स्वीकृती केंद्रावर जावे लागत होते. त्याऐवजी त्यांना आता आपला प्रवेश अर्ज स्वतःच्या घरामधून ऑनलाईन पढ्यतीने सादर करता येईल. त्यामुळे इयत्ता ११वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विदद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे श्रम, पैसा व वेळ वाचणार आहे. राज्यस्तर प्रवेस नियंत्रण समिती च्या वतीने संबंधित विभाणीव शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जात आहे.

11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२४ संपूर्ण माहिती पुस्तक pdf 








हे वेब पोर्टल तसेच क्षेत्रनिहाव स्वतंत्र वेब पोर्टले निर्माण करण्यात आली आहेत. विद्याध्यर्थ्यांनी, आपणास ज्या क्षेत्रात प्रवेश व्यावयाचा आहे त्या वेब पोर्टलचा वापर करावा. यावर्षीपासून वेब पोर्टल Mobile Compatible करण्यात

आलेले आहे. ज्यामुळे प्रवेश प्रक्रिया आणखी सहज व सुलभ होईल.

इ. ११वी व १२थी हर उच्व माध्यमिक स्तर म्हणजे पुढील महाविद्यालयीन शिक्षणाची पायाभरणी

असणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यास त्याच्या भविष्याचा मार्ग Career निवडण्यास मदत करावी व वेब पोर्टलवर अथवा संक्षिप्त संदेशाद्वारे (SMS) वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नियमित अवलोकन करावे. शाळा / महावि‌द्यालये विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्य करतीलच. या प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक घटकास सुलभ होईल अशी कार्यपद्धती अवलविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

शासनाने विहित केलेल्या पाच ऑनलाईन प्रवेश क्षेत्रांमधील महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रवेश ह्या प्रवेश प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत. अन्य मंडळाच्या उच्छ माध्यमिक विद्यालयांमधील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार शाळास्तरावरून करण्यात येतील. तथापि, इतर मंडळांच्या विदयार्थ्यांनाही ह्या प्रक्रिवेद्वारे राज्य मंडळाच्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेता बेतील.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad