Type Here to Get Search Results !

योग दिन २०२४ योगासने पद्मासनास कमलासन संपूर्ण माहिती | Yoga Day 2024 Yogasane Padmasanas Kamalasana Complete Information

योग दिन २०२४ योगासने पद्मासनास कमलासन संपूर्ण माहिती | Yoga Day 2024 Yogasane Padmasanas Kamalasana Complete Information

योगाच्या अष्टांगांपैकी पहिली चार अंगे याच हेतूने मांडली गेली आहेत. त्यांत यम व नियम अंतर्बाह्य सुचितेकरिता आवश्यक आहेत. बहिरंग साधन व अंतरंग साधन या दृष्टिने त्यांचे महत्त्व स्पष्टच आहे. ऐच्छिक व पारमार्थिक अशा दोन्ही दृष्टींनी यमनिबमांचा अभ्यास अनिवार्य आहे हे सहज समजून येण्यासारखे आहे. यानंतरचे तिसरे अंग आसन याची योगसाधनेच्या दृष्टीने व्याख्या आनंदी सुटसुटीत व सोप्पी "स्थिरसुखमासनम्" अशी असली तरी मन एकाग्र करण्याकरीता एका आसनांत स्थिरपणे त्रास न होता पुनः आसन मांडण्याची व बदलण्याची आवश्यकता न पडता पुरेसा वेळ निश्चल बसता येणे आवश्यक असते. ह्याच कारणाने शरीर सुदढ पण लवचिक ठेवण्याकरिता, व्याधिमुक्त सक्षम व उत्साहपूर्ण बनविण्याकरिता, योगी महात्म्यांनी अनेक प्रकारची आसने शोधून काढली आहेत. योग दिना निम्मित त्या पैकी एक  पद्मासनास कमलासन याची माहिती आपण पाहणार आहे.

पद्मासनास कमलासन (toc)

योगासन - पद्मासनास कमलासन

  •  पद्मासनास कमलासनही म्हणतात. 
  • पद्मासन हे सर्व ध्यानस्थितीमधील एक प्रमुख आधार असणारे आसन आहे.
  • पद्मासनामध्येसुद्धा वेगवेगळे प्रकार करता येतात 
  • पद्मासन, बद्ध पद्मासन, अर्ध पद्मासन, पर्वतासन इत्यादी.
  •  ही आसने केल्याने अंगाची लवचिकता हळूहळू पण निश्चित वाढते, मन शांत होते. 
  • ध्यान लावण्यासाठी तसेच प्राणायामासाठी हे आसन उपयुक्त आहे. 
या आसनास पद्मासन" किंवा "कमलासन" असे का म्हणतात.?
या आसनाच्या अंतिम स्थितीत पायांची व हातांची रचना अशी केली जाते की जांघेत पक्के बसविलेले पायांचे तळवे किंवा गुडच्याजवळ वा पायांच्या टाचेवर ठेवलेले तळहात कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे भासतात, म्हणून या आसनास "पद्मासन" किंवा "कमलासन" असे म्हणतात.

आसन पध्दत : योग दिन आसन - पद्मासनास कमलासन 


१. चटई सतरंजी अंथरुन त्यावर बसावे.

२. दोन्ही पाय पुढे सोडावेत.

३. आता कोणताही एक पाय दुसऱ्या पायाच्या मांडीवर घ्यावा.

४. मग दुसरा पाय पहिल्याच्या मांडीवर घ्यावा.

५. दोन्ही पायांचे गुडघे जमिनीला टेकलेले असावे. जर टेकत नसतील तर थोडा जोर गुडघ्यावर देऊन ते टेकविले तरी चालते.

६. दोन्ही हात मांड्यांवर घ्यावेत. छाती, मान सरळ करावी. खांदे मागे खेचावेत.

७. डोळे हळूहळू बंद करा व मनात कोणताही विचार न आणता, फक्त आपल्या श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करा.

८. दोन्ही हातांचे तळवे उलट करुन एकावर एक ठेवून ते पोटाजवळून नेत दोन्ही पायांच्या गुडघ्यांवर ठेवा. डोळ्यांनी भुवयांच्या मध्यभागी व नाकाच्या अग्राकडे बघत बघत डोळे बंद करून श्वासोच्छ्‌वासावर लक्ष केंद्रित करा. हे पद्मासन होय.

आसन केल्यावर :

आसन नियमित केल्यावर मन एकाग्र होऊ लागते.

आसनाचे फायदे : Yoga Day  Asana - Padmasana Kamalasana


१. आसनामुळे श्वासोच्छ्वास दीर्घ व मंद होतो. त्यामुळे भावना नियंत्रित होतात.

२. मन एकाग्र करण्यासाठी व लक्ष केंद्रित करण्यासाठी हे उत्तम आसन आहे. या आसनाच्या नित्य अभ्यासाने चित्त शांत होण्यास व मनाची चंचलता कमी होण्यास मदत होते.
३. शरीराचे कमरेखालील भाग, घोटे व गुडघे यांचे सांधे लवचिक होतात, तसेच त्या त्या भागातील लहान स्नायू व स्नायुबंध कार्यक्षम बनतात.

४. ओटीपोट व पोट या भागातील रक्तपुरवठा वाढतो व त्यामुळे पचन व उत्सर्जन संस्थांचे काम चांगले चालते.

५. मेरुदंडास ताठ राहण्याची सवय लागते. मेरुदंडातील वक्रतेचा दोष नाहीसा होतो तसेच त्यातून व कमरेतून जाणाऱ्या नाड्या या आसनाने प्रभावित होतात.

६. हे आसन रोज केल्यावर अनेकांना समाजापासून अलिप्त होण्याचा अनुभव येतो.

७. मानसिक तसेच शारीरिक तणाव दूर होतात. या आसनाने मनःशांती लाभते.

८. या आसनामुळे चिडचिड कमी होते तसेच मनुष्य बऱ्याच अंशी समाधानी आयुष्य जगू लागतो.

९. या आसनस्थितीत नाड्यांना मिळणारा आराम, मनास मिळणारी शांती व श्वासप्रश्वासात येणारा दीर्घपणा तसेच मंदपणा यामुळे हे आसन ध्यानधारणेकरिता सवर्वोत्तम समजले जाते.

वेळ व श्वसनस्थिती :

सदर आसनाच्या अंतिम स्थितीत किमान १० मिनिटे बसावे. एक मिनिटापासून अनेक तासांपर्यंत पद्मासनात राहता येते. मात्र सरावाने वेळ वाढवत न्यावा. पद्मासन हे ध्यानासन असल्याने श्वासाची गती आपोआपच मंद होते व श्वास दीर्घ चालू लागतो.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad