विषय मराठी इयत्ता दहावी कवितेवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न व कृती मार्च२०२२
Ssc परीक्षेत विषय मराठी मध्ये प्रश्न क्रमांक ०२ (आ ) मध्ये कवितेवर आधारित विचारले जाणारे प्रश्न कसे सोडवायचे ते पाहणार आहोत. (विषय मराठी इयत्ता दहावी कवितेवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न व कृती मार्च२०२२)
विषय मराठी इयत्ता दहावी कवितेवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न व कृती मार्च २०२२ |
कवितेसाठी कृतीनिहाय गुण विभागणी.
दिलेल्या (०२)दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवणे अपेक्षित असते.(सहापैकी पाच कृती देणे व पाचही सोडवणे )
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री - गुण -०१
२) प्रस्तुत कवितेचा विषय - गुण -०१
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश - गुण -०२
४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन
ओळींचा सरळ अर्थ लिहिणे - गुण -०२
५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा
न आवडण्याचे कारण - गुण -०२
६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे - गुण -०२
१. अंकिला मी दास तुझा
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री - संत नामदेव.
२) प्रस्तुत कवितेचा विषय - देवरूपी मातेने बाळाचा सांभाळ प्रेमाने करावे अशी विनवणी .
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश - देवाला आपली आई बनवून संभाळ करण्याची विनवणी चा संदेश या अभंगातून मिळतो .
४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे -
'सर्वेचि झेंपावें पक्षिणी पिलीं पड़तांचि धरणीं। भुकेलें वत्सरावें। घेनु हुंबरत धांवे ।।
अर्थ : पिल्लू झाडावरून खाली पडताच त्याला वाचवण्यासाठी पक्षिणी जिवाच्या आकांताने खाली झेप घेते. भुकेले वासरू पाहून गाय हंबरत त्याच्याकडे घावते,
५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा
न आवडण्याचे कारण - देवानेही आईप्रमाणे आपल्यावर माया (प्रेम) करावे हा विचार मनाला भावला म्हणूनच मला हा अभंग खूप आवडला आहे .
६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे -
१) धेनू = गाय.
२) धरणी = धरती.
३) काज = काम .
४) अग्नी = आग.
२. योगी सर्वकाळ सुखदाता
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री - संत एकनाथ महाराज.
२) प्रस्तुत कवितेचा विषय - हा अभंग योगी पुरुषाचे
महत्त्व सांगणारा आहे.
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश -
४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे -
'वैसे योगियासी खालुते येणें। जे इहलोको जन्म पावणे।
जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी॥'
अर्थ: जेव्हा योगी पुरुष पृथ्वीवर येतात. म्हणजे इहलोकात जेव्हा जन्म घेतो, तेव्हा त्याच्या बोलण्याने, कीर्तनाने लोकांची मने समाधानी करतात.
५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याचे कारण - योगीं च्या सत्संगाने जीवनाचे मार्गदर्शन व मनःशांती मिळते, हे मनोमनी पटते.
६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे .
१) उदक = पाणी .
२) तृषा = तहान .
३) रसना = जीभ .
४) मेघ = ढग.
३.दोन दिवस
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री - नारायण सुर्वे.
२) प्रस्तुत कवितेचा विषय - कामगाराच्या आयुष्यातील वास्तव खडतर परिस्थितीचे चित्रण.
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश - जीवन सकारात्मक जगण्याची ऊर्जा ही कविता देते.
४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे -
५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याचे कारण - कामगार जीवनाविषयी सहृदयता जागृत होते.
जीवन समजून घेण्याची ओढ निर्माण होते.
६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे -
१) रात्र= निशा
२) दिवस = दिन
३) जिंदगी = आयुष्य
४) शाळा = विद्यालय
४.औक्षण
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री - इंदिरा संत.
२) प्रस्तुत कवितेचा विषय - सीमेवरील जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे.
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश - जवानांच्या शौर्यगाथेपुढे नतमस्तक होण्याची शिकवण ही कविता सहजपणे देते.
४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे - 'अशा असंख्य ज्योतींची तुझ्यामागून राखण;
दीनदुबळ्यांचे अर्से तुला एकच औक्षण..
अर्थ : डोळ्यांत तेवणाऱ्या अगणित ज्योती तुझी पाठराखण करीत आहेत.
अश्रूंच्या ज्योतींनी दीनदुबळी जनता तुला प्रेमभराने ओवाळते.
५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याचे कारण -
देशाच्या सीमेवर जागरूकपणे पहारा देणाऱ्या व प्रसंगी जिवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे.
६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे -
१) द्रव्य = पैसा .
२) सामर्थ्य = बळ .
३) जिद्द = हिंमत .
४) राखण = रक्षण.
५.रंग मजेचे रंग उद्याचे
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री - अंजली कुलकर्णी.
२) प्रस्तुत कवितेचा विषय - संगणक युगातही निसर्गाची दौलत जोपासायला हवी, हे सांगितले आहे.
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश -
निसर्गाशी रममाण होऊन जगण्यातच खरा आनंद आहे, हा मौलिक संदेश ही कविता देते.
४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे -
५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याचे कारण -
यंत्राच्या, संगणकाच्या युगामध्ये निसर्गप्रेमाचा महिमा सांगणारी ही कविता मला खूपच आवडली.
६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे -
१)हात = हस्त
२) झाड = वृक्ष
३) वृष्टी = वर्षाव
४) पुष्टी = दुजोरा.
६.हिरवंगार झाडासारखं
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री - जॉर्ज लोपीस.
२) प्रस्तुत कवितेचा विषय - माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे.
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश -
४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे -
'झाडांच्या पानावरून वहीच्या
पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब.'
अर्थ : पहाटे पहाटे झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर उतरलेले दवाचे थेंब कवीला जाणवतात व त्याला कविता सुचते हा भावार्थ सूचित होतो.
५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याचे कारण - विविध गुणांनी संपन्न असलेल्या वृक्षासारखे तुम्ही व्हा, हे सहजपणे सांगणारी ही कविता मला भावते.
६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे -
१) व्रत = वसा
२) पक्षी = पाखरू
३) पान = पर्ण
४) अलगद = हळूच.
७. स्वप्न करू साकार
१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री - किशोर पाठक.
२) प्रस्तुत कवितेचा विषय - देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेततून रेखाटले आहे.
३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश - नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.
४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे -
'या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार.'
अर्थ : या भारत देशातील मातीवर आमचा हक्क आहे. मातृभूमीचे आम्ही सुपुत्र आहोत.
नवीन येणाऱ्या तरुण पिढीचे व नवीन युगाचे स्वप्न आम्ही सिद्धीला नेऊ.
५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याचे कारण - नवीन पिढीसाठी नवी स्वप्ने साकार करण्याचा विचार मांडणारी ही कविता मला आवडली.
६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे -
१) चक्र = चाक
२) तेज = प्रकाश
३) हस्त = हात
४) अधिकार = हक्क.
हे नक्की वाचा - SSC परीक्षेसाठी महत्त्वाचे ⬇️ ब्लू ( blue) वर क्लिक करा
वाक्प्रचार
लेखननियमांनुसार अचूक वाक्य लिहा
लेखननियमांनुसार अचूक शब्द लिहा
लिंग बदल व वचन बदल
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
विरामचिन्हे
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
लेखननियमांनुसार अचूक वाक्य लिहा
लेखननियमांनुसार अचूक शब्द लिहा
लिंग बदल व वचन बदल
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
विरामचिन्हे
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द