Type Here to Get Search Results !

विषय मराठी इयत्ता दहावी कवितेवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न व कृती मार्च२०२४

  विषय मराठी इयत्ता दहावी कवितेवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न व कृती मार्च२०२२     

Ssc परीक्षेत विषय मराठी मध्ये प्रश्न क्रमांक ०२ (आ ) मध्ये कवितेवर आधारित विचारले जाणारे प्रश्न कसे सोडवायचे ते पाहणार आहोत. (विषय मराठी इयत्ता दहावी कवितेवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न व कृती मार्च२०२२)

विषय मराठी इयत्ता दहावी कवितेवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न व कृती मार्च २०२२
विषय मराठी इयत्ता दहावी कवितेवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न व कृती मार्च २०२२     


कविता (toc)

कवितेसाठी कृतीनिहाय गुण विभागणी.

दिलेल्या (०२)दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवणे अपेक्षित असते.(सहापैकी पाच कृती देणे व पाचही सोडवणे )

१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री -             गुण -०१

२) प्रस्तुत कवितेचा विषय -                          गुण -०१

३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश -           गुण -०२

४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन 
ओळींचा सरळ अर्थ लिहिणे  -                      गुण -०२

५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा 
न आवडण्याचे कारण -                                गुण -०२

६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे - गुण -०२

१. अंकिला मी दास तुझा


१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री -    संत नामदेव.         

२) प्रस्तुत कवितेचा विषय -    देवरूपी मातेने बाळाचा सांभाळ प्रेमाने करावे अशी विनवणी  .                   

३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश -   देवाला आपली आई बनवून संभाळ करण्याची विनवणी चा संदेश या अभंगातून मिळतो .       

४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे  -      
      'सर्वेचि झेंपावें पक्षिणी पिलीं पड़तांचि धरणीं। भुकेलें वत्सरावें। घेनु हुंबरत धांवे ।।
अर्थ :   पिल्लू झाडावरून खाली पडताच त्याला वाचवण्यासाठी पक्षिणी जिवाच्या आकांताने खाली झेप घेते. भुकेले वासरू पाहून गाय हंबरत त्याच्याकडे घावते,

५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा 
न आवडण्याचे कारण -     देवानेही आईप्रमाणे आपल्यावर माया (प्रेम) करावे हा विचार मनाला भावला म्हणूनच मला हा अभंग खूप आवडला आहे .                   

६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे - 
 १)  धेनू = गाय.
 २)  धरणी = धरती.
 ३) काज = काम .
 ४) अग्नी = आग.

२. योगी सर्वकाळ सुखदाता



१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री -    संत एकनाथ महाराज.         

२) प्रस्तुत कवितेचा विषय - हा अभंग योगी पुरुषाचे

महत्त्व सांगणारा आहे.                     

३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश -          

४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे  -   
      'वैसे योगियासी खालुते येणें। जे इहलोको जन्म पावणे।
    जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी॥'
 अर्थ:  जेव्हा योगी पुरुष पृथ्वीवर येतात. म्हणजे इहलोकात जेव्हा जन्म घेतो, तेव्हा त्याच्या बोलण्याने,  कीर्तनाने लोकांची मने समाधानी करतात.            

५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याचे कारण -  योगीं च्या सत्संगाने जीवनाचे मार्गदर्शन व मनःशांती मिळते, हे मनोमनी पटते.
                           
६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे .
१) उदक = पाणी .
२) तृषा = तहान .
३) रसना = जीभ .
४) मेघ = ढग.

३.दोन दिवस

१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री -   नारायण सुर्वे.         

२) प्रस्तुत कवितेचा विषय -   कामगाराच्या आयुष्यातील वास्तव खडतर परिस्थितीचे चित्रण.                       

३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश -  जीवन सकारात्मक जगण्याची ऊर्जा ही कविता देते.        

४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे  -                      

५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याचे कारण -            कामगार जीवनाविषयी सहृदयता जागृत होते.
 जीवन समजून घेण्याची ओढ निर्माण होते.                   

६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे -
१) रात्र= निशा

२) दिवस = दिन

३) जिंदगी = आयुष्य

४) शाळा = विद्यालय

 

४.औक्षण


१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री -   इंदिरा संत.         

२) प्रस्तुत कवितेचा विषय -   सीमेवरील जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे.                    

३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश -   जवानांच्या शौर्यगाथेपुढे नतमस्तक होण्याची शिकवण ही कविता सहजपणे देते.
        

४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे  -       'अशा असंख्य ज्योतींची तुझ्यामागून राखण;
             दीनदुबळ्यांचे अर्से तुला एकच औक्षण..
 अर्थ :  डोळ्यांत तेवणाऱ्या अगणित ज्योती तुझी पाठराखण करीत आहेत. 
     अश्रूंच्या ज्योतींनी दीनदुबळी जनता तुला प्रेमभराने ओवाळते.        

५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याचे कारण -
        देशाच्या सीमेवर जागरूकपणे पहारा देणाऱ्या व प्रसंगी जिवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे.                       

६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे - 
१) द्रव्य = पैसा .
२) सामर्थ्य = बळ .
३) जिद्द = हिंमत .
४) राखण = रक्षण.


५.रंग मजेचे रंग उद्याचे


१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री -     अंजली कुलकर्णी.        

२) प्रस्तुत कवितेचा विषय -  संगणक युगातही निसर्गाची दौलत जोपासायला हवी, हे  सांगितले आहे.                     

३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश -
         निसर्गाशी रममाण होऊन जगण्यातच खरा आनंद आहे, हा मौलिक संदेश ही कविता देते.  

४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे  -   
                   

५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याचे कारण -
     यंत्राच्या, संगणकाच्या युगामध्ये निसर्गप्रेमाचा महिमा सांगणारी ही कविता मला खूपच आवडली.
                           

६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे - 

१)हात = हस्त

२) झाड = वृक्ष

३) वृष्टी = वर्षाव

४) पुष्टी = दुजोरा.


६.हिरवंगार झाडासारखं 


१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री -  जॉर्ज लोपीस.          

२) प्रस्तुत कवितेचा विषय -   माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे.                    

३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश -  
         

४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे  -  
       'झाडांच्या पानावरून वहीच्या 
पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब.'
 अर्थ : पहाटे पहाटे झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर उतरलेले दवाचे थेंब कवीला जाणवतात व त्याला कविता सुचते हा भावार्थ सूचित होतो.            

५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याचे कारण -       विविध गुणांनी संपन्न असलेल्या वृक्षासारखे तुम्ही व्हा, हे सहजपणे सांगणारी ही कविता मला भावते.                     

६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे - 
१) व्रत = वसा

२) पक्षी = पाखरू

 ३) पान = पर्ण

 ४) अलगद = हळूच.


७. स्वप्न करू साकार

१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री -   किशोर पाठक.          

२) प्रस्तुत कवितेचा विषय -   देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेततून रेखाटले आहे.            

३) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश -   नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणे या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.   

४)प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहिणे  -   
 'या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार.'
 अर्थ :  या भारत देशातील मातीवर आमचा हक्क आहे. मातृभूमीचे आम्ही सुपुत्र आहोत. 
नवीन येणाऱ्या तरुण पिढीचे व नवीन युगाचे स्वप्न आम्ही सिद्धीला नेऊ.                 

५)प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याचे कारण -       नवीन पिढीसाठी नवी स्वप्ने साकार करण्याचा विचार मांडणारी ही कविता मला आवडली.

६) कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे - 
१) चक्र = चाक
 २) तेज = प्रकाश 
 ३) हस्त = हात 
४) अधिकार = हक्क.

हे  नक्की वाचा -  SSC परीक्षेसाठी महत्त्वाचे  ⬇️ ब्लू ( blue) वर क्लिक करा














Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad