मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २ | Chief Minister My School Beautiful School-Phase 2
सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २ |
या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरुपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली. त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला. अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यामध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैत्यन निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकरचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू होता व तो मोठ्या प्रमाणावर साध्य करता आला.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २ Chief Minister My School Beautiful School-Phase 2
उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन २०२४-२५ देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनच्या विचाराधीन होता.
१. अभियानाची व्याप्ती-:मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २
i) राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे.
ii) या अभियानासाठी शाळांची विभागणी
अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व
ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.
सदर अभियान
अ) बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र
ब) वर्ग अव वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच
क) उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर खालीलप्रमाणे राबविण्यात येईल.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा
जिल्हा (२)
मुंबई शहर-१
मुंबई उपनगर-१
मनपास्तर-१
राज्य
विजेता शाळा
वर्ग अव वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्रातील शाळा
युआरसी (तालुका दर्जा) (१६)
जिल्हा (२)
पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनापा कार्यक्षेत्र-१
ठाणे मनपा, नाशिक मनपा व नागपूर मनपा कार्यक्षेत्र-१
मनपास्तर-१
विजेता शाळा