Type Here to Get Search Results !

इको क्लब रजिस्ट्रेशन कसे करावे|How to do Eco Club Registration


 इको क्लब रजिस्ट्रेशन कसे करावे|How to do Eco Club Registration 


शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि #Plant4 Mother या अभियान अंतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवार दि.२७/०७/२०२४ रोजी आयोजन करणे. 


इको क्लब (toc)

अ) शाळेमध्ये Eco clubs for Mission LIFE या थीम अंतर्गत Plant4 Mother अभियान आयोजित करण्यासाठी सूचना वृक्षारोपण मोहिमेचे दि.२७/०७/२०२४ रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे. शालेय परिसर, घर, सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे. शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात यावी. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान ३५ रोपे लावावीत.


इको क्लब रजिस्ट्रेशन कसे करावे

विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग:- विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत. यामुळे विद्यार्थी, त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल. नावांचे फलक लावणे : विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा.

रोपाचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे: विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक/अध्यक्ष/सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी, पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करावी.


वृक्षारोपण शपथ ⬇️


हरित शपथ

मी शपथ घेतो की,

मी भारताचा सुजाण नागरिक या नात्याने शपथ घेतो की, स्वच्छ सुंदर, सुजलाम, सुफलाम, भारत घडविण्यास नेहमी कटिबध्द राहील. विविध प्रकारची वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन करून पर्यावरण समतोल राखण्याचा प्रयत्न करेल. हरित भारताचे स्वप्न पुर्ण करेल.


धूरमुक्त भारत होण्यासाठी विविध संकल्पना समोर आणीन व त्याचा वापर करीन, घर, गाव, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः कृती करुन जनजागृती करेल. भविष्याची गरज लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने कमीत कमी वापर करुन पाण्याच्या बचतीचा धडा सर्वासमोर ठेवीन. जमिनीचा स्तर उंचावण्यासाठी प्लास्टिकचा वापर करणार नाही, त्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये हिरारीने भाग घेईन. पृथ्वीच्या रक्षणासाठी व उज्वल भविष्यासाठी या सर्व गोष्टी अंगिकरण्यास मी कटिबध्द असेन.


जयहिंद जयभारत !


How to do Eco Club Registration 


ragistration कसे करावे हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा.⬇️

वरील उपक्रमाच्या अनुषंगाने-

१. जिओटॅग केलेले फोटो अपलोड करणे शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे जिओटॅग केलेले फोटो, सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकर लिंकवर अपलोड करावेत.

https://docs.google.com/spreadsheets/d/13mep- POy8gmyX5HR4D1Swob OztSgb15cORBNrFMwo/edit?gid=15896978#gid=15896978


२. सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे या मोहिमेबद्दल संभाजात जाणीवजागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो #Plant4Mother आणि ॥ एक पेड़ माँ के नाम हे हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करावेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad