क्रीडा शपथ शिक्षण सप्ताह | Sports Pledge Education Week
नवीन राष्ट्रीय धोरण (NEP 2020) गध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व कीडा आधारित अध्ययन याचा महत्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती, लोककला र्याचा परिचय उत्तम रितीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे.
या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने २१ ऑगस्ट २०२३ रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत.
क्रीडा शपथ शिक्षण सप्ताह Sports Pledge Education Week
उद्दिष्ट्ये:- विद्यार्थ्याच्या पायाभूत अवस्थेपासून खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे यासाठी-
१. खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्वावद्दल जागरुकता घाढविणे.
२. समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे.
३. तरुणांच्या गनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे.
४. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे
५. खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनच्णे.
६. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी. (विशेषतःभारताचे स्वदेशी खेळ)
७. विद्यार्थ्यांमध्ये अभिमान, खिलाडूवृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे .
८.विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या तंदुरुस्त बनवणे.
९. विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढवणे.
१०. खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजविणे.
शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे. त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे .