Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्य दिन भाषण 2024 मराठी हिंदी English| Independence Day Speech 2024 Marathi Hindi English

 स्वातंत्र्य दिन भाषण 2024 मराठी हिंदी English Independence Day Speech 2024 Marathi Hindi English 


 

स्वातंत्र्य दिन भाषण 2024

 भाषण 

स्वातंत्र्य दिन भाषण 2024


आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान  क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा सर्वांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे . मित्रांनो ” भा ” या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का ? ” भा ” म्हणजे तेज आणि ” रत ” म्हणजे रममाण झालेला . तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत देश होय . आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकजुटीने राहतात . त्यामुळे आपला देश सर्वधर्मसमभाव असलेला देश म्हणून ओळखला जातो .

भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशा प्रतिज्ञा आपण अभिमानाने आणि गर्वाने करतो . ही प्रतिज्ञा आपण आज म्हणू शकतो कारण आपल्या महान नेत्यांनी ,क्रांतिवीरांनी ब्रिटीशांशी लढून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतातील हजारो शूरविरांनी अथक संघर्ष करावा लागला होता .

गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा, 

चमक रहा आसमान में देश का सितारा, 

आजादी के दिन आओ मिलकर करें दुआ,

 बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा।

देशातील हजारो शूर वीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली . या अन्यायाच्या व अत्याचाराच्या विरोधात लोकमान्य टिळक ,महात्मा गांधी ,पंडित जवाहलाल नेहरू ,भगतसिंग ,चंद्रशेखर आजाद ,सरदार वल्लभभाई पटेल ,वीर सावरकर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक शूर वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले . मंगल पांडे , सुभाष चंद्र बोस , राजगुरू ,सुखदेव , लाला लजपतराय , झाशी ची राणी लक्ष्मीबाई व अनके महिला क्रांतिकारक अश्या हजारो शूर वीरांनी , क्रांतीकारांनी देशासाठी खूप मोठे योगदान आहे. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad