Type Here to Get Search Results !

९ ऑगस्ट क्रांती दिन मराठी भाषण | 9 August Revolution Day Marathi Speech | 9 August kranti din marathi bhashan

 

  ९ ऑगस्ट क्रांती दिन मराठी भाषण | 9 August Revolution Day Marathi Speech | 9 August kranti din marathi bhashan 

नमस्कार आज आपण ९ ऑगस्ट क्रांती दिन विषयी भाषण पाहाणार आहोत.  दिनांक 8 ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणून स्मरण केला जातो. महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाला या दिवशी सुरुवात झाली होती. त्यानंतर, 9 ऑगस्ट रोजी गांधींसह ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण भारत इंग्रजांविरुद्ध एकवटला होता. देशावासियांच्या या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 9 ऑगस्ट हा दिन क्रांती दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. 
    

                 ९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण



 ९ ऑगस्ट क्रांती दिन  (toc)

९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण

 देशभरात आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा होत आहे इंग्रजांनी भारताला स्वातंत्र करण्यासाठी दिलेले शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाची सुरुवात झाली होती.आठ ८ ऑगस्ट 1942 रोजी भारताला स्वातंत्र्य करणार असल्याचे इंग्रजांनी म्हटले होते मात्र ऐनवेळी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र देणार नसल्याचे स्पष्ट सांगितले त्यामुळे महात्मा गांधींनी देशभर ऑगस्ट  क्रांती आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाला “भारत छोडा”असे नाव   देण्यात आले. तसेच या आंदोलनाची घोषणा म्हणून त्यांनी करो या मरो हा नारा दिला.

नारायण दाभाडेंची स्मृती दिन 

9 ऑगस्ट 1942 रोजी "चले जाव' या महात्मा गांधींच्या स्फूर्तिदायी घोषणेने लाखो लोक देशात रस्त्यावर उतरले. त्यातीलच पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या पुणे शहरातील नारायण दाभाडे या शाळकरी मुलाने काँग्रेस भवन येथे झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला आणि पोलिसांच्या बंदुकांना न घाबरता पुढे सरसावून तेथील युनियन जॅक खाली फेकून त्याने तेथे तिरंगा फडकावला. मात्र, वंदेमातरम्चा जयघोष करीत असतानाच पोलिसांनी केलेल्या अमानवी गोळीबारात बंदुकीच्या तीन गोळ्या लागून तेथे तो शहीद झाला. 9 ऑगस्ट 1942 रोजी शहीद झालेल्या नारायण दाभाडेंची स्मृती आज 78 वर्षांनंतरही प्रत्येकाला प्रेरणा देत आहे.

 9 ऑगस्ट क्रांतिदिनाचे महत्त्व

आजच्या युवा पिढीला 9 ऑगस्ट क्रांतिदिनाचे महत्त्व तसेच स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पूर्णपणे माहीत असणे गरजेचे आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, तात्या टोपे यांचा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा उठाव, काँग्रेसच्या स्थापनेपासूनचा स्वातंत्र्यलढा, लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद फौज, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, वासुदेव बळवंत फडके, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, चापेकर बंधू अशा क्रांतिकारकांचे हौतात्म्य असे अनेक महत्त्वपूर्ण टप्पे स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे बनले होते. 9 ऑगस्ट 1942 चा “चले जाव' आणि “करेंगे या मरेंगे' हा महात्मा गांधींनी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर काँग्रेस अधिवेशनात दिलेला नारा म्हणजे स्वातंत्र्याचे विजयबिगुल ठरले.
महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद, मौलाना अबूल कलाम आझाद, रफी अहमद किडवाई, राजगोपालाचारी चक्रवर्ती अशा साऱ्या महत्त्वाच्या नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली. मात्र, त्यामुळे आंदोलन शमले नाही तर उफाळून आले. 9 ऑगस्ट 1942च्या सकाळी गवालिया टँक मैदानावर लाखोंच्या गर्दीवर पोलिसांनी निष्ठुरपणे लाठीहल्ला केला. त्याला न डगमगता अरुणा असफअली या युवतीने “वंदेमातरम्'च्या घोषणा देत तिरंगा फडकवला आणि नवा इतिहास घडला. स्वातंत्र्यासाठी आतूर झालेल्या भारतीय जनतेने ब्रिटिश सत्तेविरुद्ध जणू उठावच केला होता. साऱ्या देशभर पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिसेस यावर हल्ले झाले. टेलिफोनच्या तारा तोडल्या गेल्या, रेल्वेच्या फिशप्लेट्स काढून रेल्वे वाहतूक रेल्वेच्या फिशप्लेट्स काढून रेल्वे वाहतूक रोखली गेली. लाखोंनी तुरूंगवास भोगला. हजारो शहीद झाले. मात्र, स्वातंत्र्यासाठीचा हा वणवा पेटतच राहिला.

कवी व शाहीर यांचे योगदान - ऑगस्ट क्रांती दिन 

महाकवी ग. दि. माडगुळकर, वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, क्रांतिवीर अण्णा भाऊ साठे अशांची क्रांतीची गीते खेडोपाडी पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम क्रांतिवीर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर दत्ता गव्हाणकर यांनी करून मोठ्या प्रमाणावर जनमत संघटित केले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी “प्रतीसरकार' स्थापन केले. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, भाई वैद्य असे अनेक नेते पुण्यात भूमिगत झाले व भूमिगत राहूनच स्वातंत्र्याचा वणवा पेटत राहिला.
 

 क्रांतिकारक पांडूरंग कर्णिक   योगदान आणि बलिदान सदैव स्फूर्तिदायकच राहिले.


पुण्यात कॅपिटल बॉम्ब खटला गाजत होता. सहकऱ्यांची नावे उघड करावी लागू नयेत यासाठी फरासखाना पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या पांडूरंग कर्णिक या ऍम्युनिशन फॅक्टरीतील 'युवक क्रांतिकारकाची आत्महत्या साऱ्यांचेच रक्त तापवून गेली. क्रांतिकारक पांडूरंग कर्णिक यांचे फरासखाना पोलीस ठाण्याबाहेरील स्मारक आजही प्रेरणा देत आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी भोगलेल्या हालअपेष्टा, त्यांनी दिलेले योगदान आणि बलिदान सदैव स्फूर्तिदायकच राहिले.
   या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करून त्यांना वंदन करण्याचे अनेक कार्यक्रम काँग्रेस भवनमध्ये घडत राहिले. 9 ऑगस्ट 1942 च्या लढ्यानंतर देशभर पसरलेल्या आंदोलनामुळेच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीयांनी पराभूत केले.

बलिदान देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली

दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत केली. त्यावेळी, इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचे वचन दिले होते. मात्र, ऐनवेळी दिलेला शब्द न पाळता इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यास नकार दिला. त्यामुळे, 8 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबईतील अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यानंतर, इंग्रजांनी गांधींजींना पुण्यातील आगा खाँ तुरुंगात कैद केले. तसेच, स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांनाही अटक करण्यात आली. त्यावेळी, तरुण कार्यकर्ता अरुणा असिफ अली यांनी 9 ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानात तिरंगा फडकावत भारत छोडो आंदोलनाचा शंखनाद केला. मात्र, गांधीजींनी हेही आंदोलन अहिंसक मार्गानेच करावे, असे आवाहन देशवासियांना केले होते. तरीही, देशातील अनेक भागात हिंसा आणि तोडफोड करण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटीश सरकार अगोदरच खिळखिळे बनले होते. तर, या आंदोलनामुळे ब्रिटीशांची उरली सुरली ताकदही लोप पावत गेली. त्यानंतर देशवासियांनी इंग्रजांना हाकलून लावेपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवले. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. या आंदोलनात आपले बलिदान देणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad