Type Here to Get Search Results !

आनंददायी शनिवार माहिती | Happy Saturday information

 आनंददायी शनिवार माहिती  Happy Saturday information

नमस्कार आज आपण आनंददायी शनिवार हा उपक्रम शाळेत कसा राबवावा या विषयी माहिती पाहणार आहोत
तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. यानुषंगाने "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळामध्ये इयत्ता १ ली ते ८ वी या इयत्तांसाठी राबविले जाणार आहे.


आनंददायी शनिवार 

आनंददायी शनिवार(toc)

विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार हा उपक्रम शाळेत राबविले जाणार आहे.

 आनंददायी शनिवार  - उपक्रमाचा उद्देश.


१. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.

२. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे

३. शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे

४. विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.

५. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्येवरमात करण्याची क्षमता निर्माण करणे.
६. विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे.

आनंददायी शनिवार कृती - Happy Saturday 


 या उपक्रमामध्ये खालील कृर्तीचा समावेश असेल.

१. प्राणायाम / योग/ ध्यान-धारणा / श्वसनाची तंत्रे

२. आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण

३. दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन

४. स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना
५. रस्ते सुरक्षा

६. समस्या निराकरणाची तंत्रे

७. कृती, खेळ यावर आधारित उपक्रम

८. Mindfulness वर आधारित कृती व उपक्रम

९. नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य.

आनंददायी शनिवार माहिती पुस्तिका pdf Happy Saturday information book pdf.



आनंददायी शनिवार माहिती  Happy Saturday information शासन निर्णय ⬇️







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad