अपार आयडी APPAR ID पालकांचे संमतीपत्र वेबसाईट नमूना फॉर्म |APPAR ID PARENTAL CONSENT FORM WEBSITE SAMPLE FORM
देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच अभ्यासक्रम याची चर्चा सुरू झाली त्यातच एक राष्ट्रीय एक ओळखपत्र या महत्वकांक्षी योजनेचे सुरुवात झाली आहे आधार कार्ड प्रमाणेच अपार कार्ड APPAR CARD हे देशातील विद्यार्थ्यांची नवीन ओळख पत्र असेल.
अपार कार्ड मध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता त्याचे कौशल्य खेळातील प्राविण्य व इतर डाटा अपार कार्ड APPAR CARD
समाविष्ट असेल. अपार कार्ड APPAR CARD हे १२ अंकाचे युनिक कार्ड असेल.अपार कार्ड APPAR CARD एक प्रकारे विद्यार्थ्यांचा सीव्ही (Curriculum Vitae) असेल.
अपार कार्ड APPAR ID CARD |
केंद्र सरकार नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण घेऊन आले आहे या नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे कार्ड तयार करण्यात आले आहे केंद्र सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने अपार आयडी कार्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे याची सुरुवात आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा झालेली आहे हे विद्यार्थ्यांचे ओळखपत्र आहे .
‘राष्ट्र एक विद्यार्थी कार्ड ’या संकल्पनेवर ते आधारित आहे.
काय आहे अपार कार्ड APPAR CARD ?
ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री.( Automated Permanent Academic Account Registry) असे त्याचे सविस्तर नाव आहे. हे कार्ड 12 अंकांचे आहे इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती या कार्डमध्ये जतन करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना शिक्षणच नाही तर नोकरी मिळेपर्यंत या अपार कार्डचा उपयोग होणार आहे .विद्यार्थ्याने शाळा बदलली तरी अपार आयडी कार्ड एकच असणार आहे ते बदलणार नाही . अपार कार्ड हे आधार कार्ड पेक्षा वेगळे असेल .आधार आणि अपार कार्ड हे संलग्न असतील हे दोन्ही कार्ड लिंक केले जाणार आहेत या कार्डमधील माहिती अपडेट होत राहील. डीजी लॉकर मध्ये विद्यार्थ्यांची माहिती अपार कार्डद्वारे जतन केली जाणार आहे.
कोणत्या कामासाठी ठरेल उपयोगी?
'अपार कार्ड' मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येईल. हे कार्ड म्हणजे त्यांचे शिक्षण माहितीपत्रच असेल. विद्यार्थ्याने कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याला कोणती बक्षिसं मिळाली, प्रमाणपत्र मिळाली. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुणता याचा आलेखच हे कार्ड असेल. त्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल तर त्याची माहिती देण्यात येईल. त्यांच्या गुणवत्तेचा आलेख असेल. शाळा बदलली तर ती पण माहिती जतन होईल.
अपार कार्ड APPAR CARD कोणासाठी उपयोगी ठरेल ?
अपार कार्ड मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येईल हे काळ म्हणजे त्याचे शिक्षण माहितीपत्रक असेल विद्यार्थ्यांनी कोणत्याही आतापर्यंत शिक्षण पूर्ण केले त्याला कोणती बक्षीस मिळाली कोणते प्रमाणपत्र मिळाले त्याची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुण्यता याचा आलेखच हे कार्ड असेल त्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल तर त्याची माहिती देण्यात येईल त्यांच्या गुणवत्तेचा उल्लेख आलेख असेल.
अपार कार्ड APPAR CARD कसे तयार होणार?
अपार कार्ड तयार करण्यासाठी विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे डिजिलॉकर व त्याचे खाते असणे आवश्यक आहे त्या आधारे विद्यार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल अपार कार्ड संबंधित शाळा महाविद्यालय नोंदणी करून देतील त्यासाठी आई-वडिलांची संमती घेण्यात येईल.
अपार कार्ड संमती पत्र PDF हिंदी/English/Marathi.
अपार कार्ड APPAR CARD ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया.
अपार कार्ड तयार करण्यासाठी चिंता करण्याची गरज नाही हे कार्ड तयार करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. याचे रजिस्ट्रेशन शाळेचे मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षक करणार आहेत. अपार कार्ड APPAR ID आयडी तयार करण्यासाठी udiseplus.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
यु डायस वर log in करून मुख्याध्यापकांनी अपार कार्ड यावर क्लिक करून विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचे अपार कार्ड तयार होईल. अपार कार्ड तयार करण्यासाठी पालकांचे संमती पत्र असणे आवश्यक आहे. डीजे लॉकर लॉगिन करणे हा पण या प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे.
डीजे लॉकर लॉगिन कसे करावे?
१.Academic Bank of credit वर त्याची नोंदणी करण्यात येणार आहे.
२. ABC च्या साईटवर जाऊन My account वर क्लिक करा.
३.त्यानंतर विद्यार्थी हा पर्याय निवडा.
४.साइन अप करा. साइन अप करताना आधार कार्ड क्रमांक टाकणे व मोबाईल क्रमांक ची नोंद करा.
५. डीजी लॉकर खाते उघडले जाईल.
६. डीजी लॉकर लॉग इन करा.
अपार कार्ड APPAR CARD कसे असेल?
१.देशभरातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अपार कार्ड तयार होईल.
२. विद्यार्थ्यांना बारा अंकाचे अपार कार्ड देण्यात येणार आहे.
३.यामध्ये विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव ,पत्ता ,त्याचा आधार कार्ड याची नोंद असणार आहे.
४. अपार कार्ड वर १२ बारा अंकी कार्ड क्रमांक असेल तसेच क्यू आर कोड असेल तसेच विद्यार्थ्यांचा फोटो असेल.