महाराष्ट्रात 21नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार | महाराष्ट्रातील नवीन 21 जिल्हे
महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे 1960 रोजी झाली त्यावेळी फक्त महाराष्ट्र मध्ये 25 जिल्हे होते कालांतराने जिल्ह्यांची संख्या हळूहळू वाढत गेली जसे की 2014 मध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या समितीने नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुके तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
महाराष्ट्रातील नवीन 21 जिल्हे |
महाराष्ट्रातील नवीन 21 जिल्हे(toc)
महाराष्ट्रात प्रशासकीय सुधारणा आणि विकासासाठी नवीन जिल्ह्यांची निर्मिती करणे गरजेचे आहे . म्हणून यावर्षी नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा विचार या सरकारचा आहे .नवीन जिल्ह्यांमुळे नागरी सुविधांमध्ये वाढ होईल तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत होतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
सन 2017 18 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली या प्रस्तावावर विचार झाला होता त्यांनी राज्याच्या प्रशासकीय गरजानुसार नवीन जिल्ह्यातील निर्मिती होणे आवश्यक असल्याचे सांगितले होते.
२१ नवीन जिल्ह्याचे फायदे काय असतील?
सुलभ प्रशासन
जिल्ह्याचे क्षेत्रफळ कमी झाल्याने प्रशासन अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम होईल तसेच स्थानिक पातळीवर समस्या सोडवण्यास याचा भरपूर उपयोग होईल.
विकासाला गती व चालना मिळेल.
नवीन जिल्ह्यांमुळे शहर व गावपर्यंत विकास पोहोचणार आहे रोजगार, शिक्षण व आरोग्य या सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल
नागरिकांच्या समस्या अधिक जलद सोडवल्या जातील. तसेच प्रत्येक विभागातील नागरिकांच्या समस्या जलद गतीने सोडवल्या जातील.
२१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती व त्यापुढील आव्हाने व अडचणी काय असतील.
नवीन जिल्ह्याची निर्मिती करायचे म्हटलं तर त्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागेल तसेच प्रशासकीय पुनर्रचना करावी लागणार आहे. जो नवीन जिल्हा तयार होणार आहे त्या जिल्ह्याचे मुख्यालय सरकारी कार्यालय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता भासणार आहे.
नवीन 21 जिल्ह्यांची नावे
भुसावळ (जळगाव)
उदगीर (लातूर )
आंबेजोगाई (बीड )
मालेगाव (नाशिक )
कळवण (नाशिक )
किनवट (नांदेड )
मीरा-भाईंदर( ठाणे )
कल्याण (ठाणे )
माणदेश (सांगली/ सातारा /सोलापूर)
खामगाव (बुलढाणा)
बारामती ( पुणे )
पुसद ( यवतमाळ )
जव्हार (पालघर )
अचलपूर (अमरावती)
साकोली (भंडारा )
मंडणगड (रत्नागिरी)
महाड (रायगड)
शिर्डी (अहमदनगर)
संगमनेर (अहमदनगर)
श्रीरामपूर (अहमदनगर )
अहेरी (गडचिरोली)