Type Here to Get Search Results !

आर टी ई 25%प्रवेश संपूर्ण माहिती 2025-26 | RTE 25%ADMISSION ALL INFORMATION 2025-26

 आर टी ई 25%प्रवेश संपूर्ण माहिती 2025-26 RTE 25%ADMISSION ALL INFORMATION 2025-26

नमस्कार पालक व विद्यार्थी मित्रांनो आज आपण आर टी ई 25%प्रवेश संपूर्ण माहिती 2025-26  RTE 25%ADMISSION ALL INFORMATION 2025-26 पाहणार आहोत. आर टी ई RTE 2025-26 प्रवेश येणाऱ्या काही दिवसांत सुरू होणार आहे.
     आर टी ई 25%प्रवेश संपूर्ण माहिती 2025-26 | RTE 25%ADMISSION ALL INFORMATION 2025-26 मुलांच्या प्रवेशासाठी संपूर्ण शाळांची माहिती मागवलेली आहे. ही माहिती भरल्यानंतर काही दिवसातच आरटीई 2025 26 प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.
आर टी ई 25%प्रवेश संपूर्ण माहिती 2025-26 RTE 25%ADMISSION ALL INFORMATION 2025-26



आर टी ई 2025-26 प्रवेश (toc)

सन 2025-2026 या वर्षी करिता RTE 25% प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक 18/12/2024 पासून सुरु होत आहे. सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

आर.टी.ई.२५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (वर्ष: २०२५-२०२६)प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे.

1) आर.टी.ई. २५ % online प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी online प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
2) बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर.टी.ई. प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत.

वंचित गटातील बालकांमध्येखालील प्रवर्गाचा समावेश होतोः-

1) जात संवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ),भटक्या जमाती (ब) भटक्या जमाती (क) भटक्या जमाती,(ड) इतर मागास (ओ.बी.सी.) विशेष मागास बालके (एस.बी.सी.)

२) दिव्यांग बालके,

३) एच. आई. व्ही. बाधित किंवा एच. आई व्ही प्रभावित बालके,

४) कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन)
५) अनाथ बालके

वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र (वडिलांचे/बालकाचे)

उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही.

तहसीलदार/ उपजिल्हाधिकारी/उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकाचा (वडिलांचा/बालकाचा) जातीचा दाखला आवश्यक परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.

दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाण पत्राचा पुरावा

जिल्हा शल्य चिकित्सक  वैद्यकीय अधीक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय याांचे ४० टक्के आणि त्या पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.

एच. आय. व्ही. बाधित /प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे

जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र.

आर टी ई अर्ज कसा भरावा आर टी ई 25%प्रवेश संपूर्ण माहिती 2025-26 RTE 25%ADMISSION ALL INFORMATION 2025-26👇

अर्ज कसा भरवा याची संपूर्ण माहिती खालील pdf मधे दिली आहे.
pdf open करण्यासाठी त्यावर click करा.👇

कोव्हिड बालक आर टी ई 25%प्रवेश संपूर्ण माहिती 2025-26 RTE 25%ADMISSION ALL INFORMATION 2025-26


अ) कोव्हीड प्रभावित बालक 
(ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोव्हीड
प्रादुर्भावामुळे झाले) अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागद पत्रे

वंचित गटातील बालकांमध्ये कोव्हीड प्रभावित बालक (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे.

अ) सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्युप्रमाणपत्र

ब) कोव्हीड १९ मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र. (Medical Certification of Cause of Death (Form No.4), (SeeRule7))

सदर मृत्यू कोव्हीड १९ शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणन हे शासकीय/पालिका/महानगरपालिका, रुग्णालय अथवा आय. सी.एम.आर. नोंदणीकृत खाजगी रुग्णालय/प्रयोगशाळा यांचा अहवाल.

ब) अनाथ बालके :-(वंचित घटक)

आवश्यक कागद पत्रे

अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची / बालसुधारगृहाची

कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत.

२) जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील

३) अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला इ. विचारात घेण्यात येऊ नयेत.

क)आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला
तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, salary
स्लीप, कंपनीचा किंवा Employer चा दाखला, (आर्थिक वर्ष २०२१ - २०२२ किंवा २०२२-२०२३ मार्च अखेरचे एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले) उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य  धरण्यात येणार नाही.

घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे

1) न्यायालयाचा निर्णय.
२) घटस्फोटित महिलेचा / बालकाच्या आईचा रहहवासी पुरावा.
३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला.

1) घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा.

२) घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.

३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

विधवा महिला

1) पतीचे मृत्यूपत्र (प्रमाण पत्र)

२) विधवा महिलेचा /बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, ३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र आर टी ई 25%प्रवेश संपूर्ण माहिती 2025-26 RTE 25%ADMISSION ALL INFORMATION 2025-26


आधार कार्ड
- वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक.

आर.टी.ई.२५ टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार
कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे बालक / पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे / पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड है तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधारकार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास आर.टी.इ.२५ टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी.

जन्मतारखेचा पुरावा

(वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक)
ग्रामपंचायत/न.पा./ म.न.पा. यांचा दाखला रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला / आंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला / आई, वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा पत्रा‌द्वारे केलेले स्वयंनिवेदन.

रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा 

(वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक)

रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालविण्याचा परवाना.),

वीज / टेलिफोन बिल देयक, पाणी पट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक/

घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट या पैकी कोणतेही एक.

ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा भाडेकरार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

आर.टी.ई. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५ - २०२६ F.A.Q. (वारंवार विचारण्यात येणारे/उदभवणारे प्रश्न)


महत्वाचे -

आर.टी.ई. २५% प्रवेश पात्र सर्व बालकांना जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड अनिवार्य आहे. 

आर.टी.ई. २५% online प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी online प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत

१) अ) २५% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत ?

उत्तरः- आर्थिकदुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापर्यंत आहे अशा पालकांची बालके, वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके. 

१) ब) वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो ?

उत्तरः- वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि.जा.

(अ), भटक्या जमाती

(ब), भटक्या जमाती

(क), भटक्या जमाती

(ड), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), एच. आय. व्ही. बाधित/एच. आय. व्ही. प्रभावित बालके, कोव्हीड प्रभावित बालके (ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले), अनाथ बालके यांचा समावेश आहे.

दुर्बल गटामध्ये ज्या बालकांच्या पालकांचे ज्या बालकांचे पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न १ लाखाच्या आत आहे अशा बालकांचा सामावेश आहे.

२) कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत? (माध्यम व बोर्ड)

उत्तर- सर्व माध्यमाच्या, सर्व आय.बी.सह) बोर्डाच्या (राज्यमंडळ, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई.व अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक प.बा.सह) उ अनुदानित, क सर्व शाळा जेथे वर्ग १ ली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे. (मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्यांक शाळा वगळून) 

३) पालकांना अर्ज केव्हा करता येईल?
उत्तर- सन् २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या कालावधी मध्येच अर्ज करता येईल.

४) पालकांना सन २०२४-२०२५ या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल?

उत्तर- पालकांना सन२०२४-२०२५ या वर्षात प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येणार आहे.

५) अर्ज कोठून भरावा लागेल?

उत्तर- मदत केंद्रावर किंवा जेथे इंटरनेट सुविधा, संगणक, प्रिंटर इ. उपलब्ध असेल

तेथून भरावा.

६) अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत ?

उत्तर:- अर्ज भरताना कोणतेही कागदपत्रे अपलोड करायची नाहीत. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे.

अ) अर्जामध्ये जो रहिवासी पुरावा सादर करणार आहेत तोच रहिवासाचा पुरावा. (रहिवासी पुराव्यावरीलच पत्ता अर्जावर लिहावा) बालकाचे जन्म दिनांकाची नोंद करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा.

2) बालक वंचित घटकातील असल्यास जातीचे प्रमाण पत्र.

3) आर्थिक दुर्बल संवर्गातून प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला (salary slip), कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल.

बालकाला लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागद पत्रे, असणे आवश्यक आहे अन्यथा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

७) २५% ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची वेब-साईटकोणती आहे ?

उत्तर- १) सदरचा अर्ज https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर (वेब-साईटवर) ऑनलाईन भरावयाचा आहे.

८) प्रवेश अर्जाला किती शुल्क आहे?
उत्तर- शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज मोफत स्वरुपात संकेत स्थळावर (वेबसाईटव्र) उपलबध असून वरील संकेत स्थळावर (वेबसाईटवर) जावून भरावयाचा आहे. 

९) पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतात?
उत्तर- ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून १ कि.मी. व ३ कि.मी. आणि अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही १० शाळांचे पर्याय निवडता येतील.

१०) शाळेपासून किती कि.मी. अंतरातील रहिवासी अर्ज करू शकतात?
उत्तर- पालकांना पाल्याच्या निवास स्थानापासून १ कि.मी., ३ कि.मी. अथवा अधिक अंतरावरील सर्व शाळांचा समावेश करता येईल मात्र शाळेपासून १ कि.मी. परिसरातील अर्जदारांना नियमाने प्राधान्य मिळेल. १ कि.मी. परिसरातील पुरेशा क्षमतेइतकी बालके उपलब्ध न झाल्यास् ३ कि.मी. आणि त्या पेक्षा अधिक अंतराच्या परिसरातील बाल्के संबधित शाळेत प्रवेशास पात्र होतील. मात्र ३ कि.मी पेक्षा अधिक अंतराच्या शाळेकरिता लॉटरी लागली तर त्या वेळेस विद्यार्थ्याच्या वाहतुकीचा खर्च संबधित पालकास करावा लागेल.


















Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad